Site icon InMarathi

लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत? दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं…

या दोन ओळीत प्रेमाचे वर्णन करण्याचा प्रयत्न पाडगावकरांनी केलाय. प्रेम नावाची भावना अशी बंदिस्त करता येते की नाही याबद्दल अनेक मतांतरे आहेत. अणि ती कायम राहणार आहेत! प्रेम ही भावनाच खूप वेगळी असते. प्रियकर आणि प्रेयसी हे जवळपास असतील, दररोज भेटत असतील. तर त्यांच्यातील प्रेम आणखी वाढते, असे म्हणतात. ते त्यांच्यातील समज – गैरसमज एकत्र भेटून, एकमेकांना समजून घेऊन दूर करतात.

पण जी जोडपी एकमेकांच्या जवळ राहत नाहीत. ज्याला आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप म्हणून ओळखतो. त्यांच्यातील गैरसमज दूर कसे करणार?

 

yourtango.com

अशा जोडप्यांमध्ये कधी – कधी खूप गैरसमज निर्माण होतात. नेहमी त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असते. अशा जोडप्यांच्या होणाऱ्या भांडणाला पाहिले कारण म्हणजे त्यांचे एकमेकांपासून खूप दूर राहणे हेच असते.

त्यामुळे यांचे नाते तुटण्याचा देखील धोका निर्माण  होतॊ. पण यावर देखील आपण काही उपाय करू शकतो, जेणेकरून आपले हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप तुटणार नाही. काही सोप्या आणि सहज ट्रिक्स वापरून तुम्ही हे करू शकता.

१. एकमेकांवर विश्वास ठेवा

एकमेकांवर असलेला विश्वास हा तुमचे नाते टिकून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. जर तुमचा एकमेकांवर विश्वास नसेल, तर तुमच्यातील मत्सर किंवा असुरक्षितता तुमच्या या नात्याला नष्ट करू शकते.

 

onesidedlove.com

तुम्ही करणारी कामे एकमेकांशी शेयर करा. आपल्या जोडीदारास आपल्या मित्रांबद्दल सांगा आणि त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवा.

२. आपल्या प्रवासाबद्दल सांगा

इतर व्यक्तींवर अवलंबून राहिल्यास तुमच्या नाते  संबंधावर आणि स्वतः तुमच्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे कधीही जास्त कसला विचार न करता कुठेतरी फिरायला जा आणि मज्जा करा. त्यानंतर तुमच्या प्रवास वर्णनाची माहिती तुमच्या जोडीदाराला द्या. तुमच्या नाते संबंधाला जीवनाचा केंद्र बनवू नका. बाहेर जा आणि जीवनाची मज्जा घ्या.

 

relrules.com

३. आपल्या  भावनांबद्दल खुलासा करा.

लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपसाठी एकमेकांमध्ये संभाषण असणे खूप गरजेचे आहे. तुमच्या याच संभाषणामुळे तुमच्यामध्ये एक बाँड तयार होईल. तुम्ही एकमेकांना आपल्या भावना त्यामुळे खुलून सांगू शकता आणि त्यातूनच तुमच्या रिलेशनशीपमध्ये एक विश्वास निर्माण होईल.

४. कधीही गप्प राहू नका.

कोणतेही नाते संबंध हे विश्वास आणि एकमेकांमधील असलेल्या संभाषणावरच मजबूत होत असते. त्यामुळे कधीही समोरच्या माणसाला उत्तर न देता गप्प बसून नका किंवा त्याला टाळू नका.

 

twiniversity.com

असे करणे हे कोणत्याही नाते संबंधासाठी नुकसान दायक असते आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपसाठी तर हे प्राणघातक ठरते. जर तुम्ही उदास असाल, तर तुमच्या जोडीदाराकडून विचार करण्यासाठी थोडा वेळ मागा आणि त्यानंतर त्याला आपल्या समस्येबद्दल सांगा.

 

५. गंभीर गोष्टींबद्दल बोला

पैसा, नोकरी, शिक्षण आणि भविष्यबद्दल एकमेकांशी बोलणे आणि त्याविषयी चर्चा करणे खूप आवश्यक आहे. नाते संबंध यशस्वी होण्याकरिता या विषयावर विचार करून दोघांचे एकमत होणे खूप गरजेचे आहे.

६. शुभ सकाळ आणि शुभ रात्री बोलणे.

आपले नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि अजून मजबूत बनवण्यासाठी दररोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट आपल्या जोडीदाराला बोलून आपल्या जोडीदाराची आठवण काढावी.

 

hercampus.com

७. एकमेकांना भेट द्या.

जेव्हा कधी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वेळ मिळेल, तेवहा तुमही भेटण्याचा नक्की प्रयत्न करा. पण एकमेकांच्या घरी जाऊन भेटण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर भेटा. जेणेकरून तुम्हाला मनसोक्त बोलण्यासाठी योग्य वेळ मिळेल.

८. व्हिडीओ चॅट

फोनवर मॅसेज करणे आणि बोलणे चांगले आहे. पण व्हिडीओ चॅटद्वारे एकमेकांना पाहून संवाद साधणे, अधिक घनिष्ट आणि अर्थपूर्ण असते.

 

wikihow.com

यामुळे चुकीच्या संवादाची शक्यता कमी होते आणि आपण यावरून एकमेकांच्या चेहऱ्यावरील संकेत देखील  पाहू शकतो. त्यामुळे जेवढा वेळ जमेल, तेवढा वेळ व्हिडीओ चॅट करा. पण तुमचे संपूर्ण नाते एका मोबाईलच्या स्क्रीनवर आणणे टाळा.

९. मल्टीप्लेयर गेम्स

तुमच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये जवळीक आणण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्स खेळू शकता.

 

blogsolute.com

या गेम्सच्या सहाय्याने तुम्ही आपल्या जोडीदारबरोबर काही मजेचे क्षण घालवू शकता आणि त्यामुळॆ तुमच्यामधील जवळीक वाढेल.

१०. एकमेकांना सरप्राईज द्या.

तुम्हाला जसा वेळ मिळेल आणि जसे जमेल त्यानुसार तुम्ही तुमच्या जोडीदाराला नकळत भेट देऊन किंवा एखादी गोष्ट गिफ्ट करून सरप्राईज देऊ शकता.

 

wallpaperclicker.com

कधीतरी असे सरप्राईज दिल्यास तुमच्या नात्यामधील आनंद आणि एकमेकांवर असलेले प्रेम वाढण्यात मदत होईल.

आपले नाते कसे टिकवून ठेवावे याची प्रत्येकाची वेगळी गणिते असतात. ते टिकवण्यात कोणी यशस्वी होतो तर कुणी अयशस्वी. पण ते टिकून राहायला हवं ही प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते. ही इच्छा असली तरी त्याचे टिकणे न टिकणे समोरच्या व्यक्तीवरही तितकेच अवलंबून असते. या सगळ्या गुंत्यात वर सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच मदत करतील!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version