आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर इतकी वर्ष राज्य केलं, ते तर आता नाहीत, पण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत!
त्यांची जिद्द चिकाटी, देशभक्ती, शिस्त अशा गोष्टी खरंच वाखण्याजोग्या आहेत, आपल्या इथे त्यांनी बांधलेल्या काही वास्तु तर आजही जशाच्या तशा उभ्या आहेत!
आज इतकी वर्ष उलटून गेली तरी साऱ्या जगाला ब्रिटिश लोकांबद्दल, त्यांच्या राज्यकारभाराबद्दल, त्यांच्या राणीच्या जीवनशैलीबद्दल खूपच कुतूहल असतं!
अर्थात त्यांची राणी राहते सुद्धा अगदी वेगळ्या थाटात त्यामुळे लोकांना तिच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायची उत्सुकता नेहमीच असते!
भारतातील देखील प्रत्येक मोठ्या अधिकाऱ्याकडे आणि राजकारण्याकडे त्याची स्वतःची अशी किंवा सरकारने दिलेली सुरक्षा व्यवस्था दिलेली असते.
या सुरक्षा रक्षकांना आपल्या जीवावर उदार होऊन त्या नेत्याची किंवा अधिकाऱ्याची रक्षा करायची असते. तुम्ही भारताच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या आजूबाजूला असे सुरक्षारक्षक पहिले असतील.
या सुरक्षा रक्षकांची कठोर नजर आजूबाजूच्या परिसरावर असते.
हे सुरक्षा रक्षक हत्यांरे चालवण्यामध्ये देखील पारंगत असतात. सुरक्षा रक्षकांना त्यांना जराही नजरेपासून दूर न करण्याची सक्त ताकीद दिलेली असते आणि ते आपली ही ड्युटी योग्यपणे निभावत असतात.
–
- पंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या “बॅगेमध्ये” काय असते?
- या ‘एका झाडाची’ रक्षा करायला २४ तास पोलीस राबत असतात…!!
–
ब्रिटिश राणीच्या सुरक्षेसाठी देखील खूप मोठी सुरक्षा व्यवस्था आहे.
पण कितीतरी चित्रपटांमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की, हे राणीचे सुरक्षा रक्षक बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर आपली ड्युटी करत असताना कधीही जागचे हलत नाही.
पण हे खरोखरच सत्य आहे का? हे आज आपण जाणून घेऊया.
राणीच्या सुरक्षा रक्षकांना राणीची आणि राणीच्या निवासस्थानाची विशेषतः काळजी घ्यायची आहे. या सुरक्षा रक्षकांची निवड राणी स्वतःच्या इच्छेनुसार करते.
ब्रिटिश सैन्यात असलेल्या पाच एलिट रेजिमेंटमधील सैनिक राणीचे सुरक्षा रक्षक म्हणून निवडले जातात. या सुरक्षा रक्षकांची ड्युटी ही सहसा दोन तासांची असते आणि पुढील चार तास त्यांना आराम दिला जातो.
त्यांचा पेहराव देखील खूप वेगळा असतो. ते लाल रंगाचा कोट घालतात आणि डोक्यावर एक टोपी घालतात. या टोपीमुळे त्यांचे डोळे हे अर्धे झाकले जातात.
हे सुरक्षा रक्षक बंदूकधारी असून ते एका विशेष पोझमध्ये उभे असतात. राणीचे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यदक्ष आणि आपल्या कामामध्ये समर्पित असलेल्या लोकांना निवडले जाते.
या राणीच्या सुरक्षा रक्षकांना खूप कडक ट्रेनिंग देखील दिले जाते, कारण त्यांना कोणत्याही वातावरणामध्ये खचून न जाता राणीची आणि तिच्या निवास्थानाची सुरक्षा करायची असते.
पण ते प्रत्येकवेळी एकाच ठिकाणी तसेच्या तसे उभे राहत नाही तर दर १० मिनिटांनी ते त्यांना निवडून दिलेल्या भागामध्ये फिरतात आणि त्यानंतर परत त्याच जागेवर येऊन उभे राहतात.
या सुरक्षा रक्षकांची शिस्त खूप कडक असते. या सुरक्षा रक्षकांना उन्हाळाच्या दरम्यान त्यांच्या ड्युटीवर जाण्याच्या अगोदर काही खूप प्रमाणात पाणी पिण्यास सांगितले जाते, जेणेकरून ते आपल्या ड्युटीच्या काळामध्ये उष्माघाताचा त्रास होऊ नये!
येथे येणारे पर्यटक या राणीच्या सुरक्षारक्षकांसोबत सेल्फी देखील काढतात. या सुरक्षा रक्षकांना महिन्याला १२०० ते २००० पौंड म्हणजेच जवळपास १ लाख ते १ लाख सत्तर हजारापर्यंत पगार दिला जातो.
राणीच्या एका सुरक्षा रक्षकाला एवढा वेळ एकट्याने गप्प उभे राहण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की,
“कधी-कधी मी येथे येणाऱ्या लोंकाना पाहत असतो. तर कधी आपल्या मनामध्येच गाणी गुणगुणत असतो. कधी-कधी तर आम्ही एक संपूर्ण चित्रपट सुरवातीपासून शेवटपर्यंत स्वतःच्या मनामध्ये आठवतो, त्यामुळे काहीही वाटत नाही.”
हे गप्प असणारे सुरक्षा रक्षक येथे येणाऱ्या पर्यटकांनी जर काही चुकीचे वर्तन केले, तर ते त्यांना ओरडायला देखील मागे पुढे पाहत नाहीत.
त्यांच्यासाठी येथील सुरक्षा आणि शांतता ही नेहमी टिकून ठेवणे, हे महत्त्वाचे काम आहे. या राणीच्या सुरक्षा रक्षकांची परेड देखील येथे होते. ही परेड खूप शिस्तप्रिय असते.
राणीच्या या महालामध्ये परवानगीशिवाय कुणालाही जाऊ दिले जात नाही. संपूर्ण शाही कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी याच सुरक्षा रक्षकांची असते.
या सर्व माहितीवरून हे लक्षात येते की, अनेक चित्रपटात दाखवले जाते तसे राणीचे हे सुरक्षा रक्षक फक्त एकाच ठिकाणी उभे राहत नाही, तर ते इतर ठिकाणी पाळीपाळीने फिरून परिसराची शाहनिशा करत असतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.