Site icon InMarathi

सलाम : भारताला काश्मिरसारखं रत्न मिळवून देणा-या पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा

paramveer chakra featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्या भारत देशावर अनेकांनी राज्य केले. आपल्याच देशात येऊन आपल्यावर अन्याय केले आपल्याला गुलामगिरीत ठेवले. पण आज आपला देश हा देशातील महासत्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

आज आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाचीही हिम्मत नाही, एवढं आपण मजबूत झालो आहोत.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्रांणांची आहुती दिली. आणि आजही आपल्या देशाला शत्रूंच्या नजरेपासून वाचविण्यासाठी अनेक सैनिक सीमेवर आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या देशाचे रक्षण करत आहेत.

आज काश्मीरचा जो भाग आपल्याकडे आहे, त्याचं श्रेय देखील ह्याचं वीर जवानांना जाते. ह्यापैकीच एक होते “मेजर सोमनाथ शर्मा”…

 

dailyhunt.in

 

यांचा जन्म ३१ जानेवारी १९२२ साली हिमाचलच्या डाढ ह्या गावात झाला. मेजर अमरनाथ शर्मा हे त्यांचे पिता होते.

सैनिक कुटुंबात जन्मलेले सोमनाथ हे लहानपणीपासूनच वीरता आणि देशासाठी सैनिकांनी दिलेले बलिदान ह्याच कथा ऐकत मेजर सोमनाथ शर्मा मोठे झाले. सैनिक कुटुंबातून असल्या कारणाने देशभक्ती ही त्यांच्या रक्तात होती.

 

mythicalindia.com

मेजर सोमनाथ याचं प्राथमिक शिक्षण हे नैनिताल येथे झाले. त्यानंतर त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिट्री कॉलेज, देहरादून येथून सैन्य प्रशिक्षण घेतले.

 

२२ फेब्रुवारी १९४२ साली यांची कुमाऊ रेजिमेंट च्या चवथ्या बटालियन मध्ये सेकण्ड लेफ्टनंट ह्या पदावर नियुक्ती झाली. याच वर्षी यांना डिप्टी असिस्टेण्ट क्वार्टर मास्टर जनरल म्हणून बर्मा येथे पाठविण्यात आले.

येथे त्यांनी मोठ्या साहस अनु कुशलतेने आपल्या सैन्य तुकडीचे नेतृत्व केले.

१५ ऑगस्ट, १९४७ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. कारण ह्याच दिवशी भारताला अधिकृतपणे स्वतंत्रता मिळाली होती.

पण ह्या आनंदाच्या क्षणी दुधात विरजण घालावं अशी देखील एक घटना घडली होती, ती म्हणजे भारताचे विभाजन. ह्यावेळी भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग पडले.

 

aajtak.intoday.in

 

त्यासोबतच काश्मीर वाद देखील भडकला.

जम्मू-काश्मीर येथील राजा हरीसिंह मोठ्या दुविधेत सापडले. त्यांना त्यांचें राज्य स्वतंत्र ठेवायचे होते. याच दुविधेत दोन महिने निघाले. याचाच फायदा घेत पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीर काबीज करण्यासाठी हल्ला चढवला.

तिथे सक्रीय असलेला शेख अब्दुल्ला काश्मीरला स्वतःची जागीर म्हणून ठेवायचे होते. पण जोवर तेथील राजा भारतात कायदेशीरित्या जम्मू-काश्मीर सामील करत नाही तोवर भारतीय शासन काहीही करू शकत नव्हते.

जेव्हा राजा हरीसिंह यांनी जम्मू-काश्मीरला पाकिस्तानच्या हातात जाताना बघितले तेव्हा त्यांनी भारतासोबत विलीनीकरणाचा करार केला.

 

mythicalindia.com

 

त्यानंतर भारत सरकारने आपल्या सेनेला सक्रीय होण्याचे आदेश सुनावले. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीला श्रीनगर जवळ बडगाव हवाई पट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या तुकडीत केवळ १०० सैनिक होते.

जे त्या हवाई पट्टीचे रक्षण करत होते. तर दुसऱ्या बाजूने सातशेहून अधिक सैनिक घात लावून बसले होते. त्यांच्याजवळ शस्त्रात्रे देखील अधिक होती.

पण भारतीय सैनिक हा कशालाही घाबरत नाही, मग त्यासमोर ७०० शत्रू असो वा ७०००.

मेजर सोमनाथ शर्मा देखील असेच एक भारतीय साहसी सैनिक होते. त्या ७०० सैनिकांना बघून देखील ते घाबरले नाही, तर त्यांनी आपल्या १०० सैनिकांना घेऊन एक शौर्यकथा रचली.

त्यांनी आपल्या ब्रिगेड मुख्यालयाला एक संदेश पाठवला की,

“The enemies are only 50 yards from us. We are heavily outnumbered. We are under devastating fire. I shall not withdraw an inch but will fight to our last man and our last round.”

“शत्रू आमच्यापासून फक्त पन्नास योजने दूर आहे. आमची संख्याही कमी आहे. पण जोवर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेल आणि माझ्याजवळ माझा शेवटचा सैनिक असेल मी तोवर लढत राहील”

 

1ias.com

 

ह्यावेळी दोन्ही कडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता. कमी सैनिक आणि गोळाबारूद असून देखील मेजरची तुकडी शत्रूंवर भारी पडत होती. ३ नोव्हेंबर, १९४७ ह्या दिवशी शत्रूंना झुंज देत असताना त्यांच्या हाताला इजा झाली.

तेव्हा त्यांच्या हाताला प्लास्टर बांधण्यात आले. पण तरी देखील ह्या जखमी वाघाने लढणे सोडलं नाही. ते लढत राहिले.

एवढ्यात एक ग्रेनेड त्यांच्याजवळ येऊन फुटला. त्यांच्या शरीरातून रक्ताचा सडा वाहू लागला. अश्या स्थितीत देखील त्या वीराने स्वतःची पर्वा न करता आपल्या सैनिकांना हवाई पट्टीचे संरक्षण करण्याचे निर्देश सुनावले.

ते सैनिकांना म्हणाले की,

“माझी काळजी करू नका. धाव पट्टीचे रक्षण करा. शत्रू कुठल्याही परिस्थितीत जिंकायला नको”

आणि एवढे सांगून त्यांनी त्यांचे प्राण त्यागले.

 

wikipedia.org

 

त्यांचे हे बलिदान बघून इतर सैनिकांचं रक्त उफाळले, त्यांनी शत्रूंवर धावा केला. आणि अश्याप्रकारे ती झुंज भारताने अखेर जिंकली.

जर तेव्हा आपण हरलो असतो, जर तेव्हा आपल्या सैनिकांनी आणि मेजर सोमनाथ शर्मा यांनी पाकिस्तानला हरवले नसते तर आज जेवढा काश्मीर आपल्या कडे आहे त देखील पाकिस्तानने काबीज केला असता.

मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांच्या ह्या शूर धाडसी कामगीरीकरिता मरणोपरांत “परमवीर चक्र” देऊन सन्मानित करण्यात आले. साहस आणि शूरतेची ग्वाही देणाऱ्या परमवीर चक्राने सन्मानित केलेले ते पहिले सैनिक होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version