' कोणत्याही उपकरणाविना तिबेटचा नकाशा तयार करणा-या या कलाकाराचं कौतुक करावं तितकं कमीच! – InMarathi

कोणत्याही उपकरणाविना तिबेटचा नकाशा तयार करणा-या या कलाकाराचं कौतुक करावं तितकं कमीच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेम ऑफ थ्रोन्स – “GoT” ह्या शॉर्टफॉर्म आणि हॅशटॅगने गाजत असलेली एक अमेरिकन, फँटसी, टी  व्ही सिरीज. A Song of Ice and Fire (By George R. R. Martin) नामक नॉव्हेल सिरीजचं अडाप्टेशन.

दरवर्षी एक ह्याप्रमाणे 2011 पासून ह्या सिरीज चे सात हंगाम (म्हणजे सिझन्स) येऊन गेलेत आणि प्रेक्षक आठव्या सीझनची चातकासारखी वाट पाहत आहेत.

ह्या सिरीजमधे असं काय आहे ज्यामुळे लोक अक्षरशः ‘कट्टर’ fans झाले आहेत?

ह्या सिरीजच्या लोकप्रियतेच्या कारणांचा हा धावता आढावा…!

 

got-pic-marathipizza

 

ह्या सिरीजचं ´रसग्रहण´ करायचं म्हणजे वाईन प्राशन करण्यासारखंच आहे. ह्या मालिकेतली मंडळी सतत वाईन पीत असतात म्हणून हा संदर्भ नाही हं! – वाईन एक-दोन घोटात चढत नाही…एक ग्लास संपवल्यावरच ती आपला अंमल दाखवायला सुरुवात करते आणि पिणाऱ्याला हळूहळू एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

तसंच काहीसं ह्या सीरीजचं देखील.

पहिला एपिसोड संपता संपता याची नशा चढत जाते आणि पुढच्या एपिसोडची चटक लागते. मालिकेच्या नावात तिचं सार आहे.

७ राजघराणी आणि त्यांच्या सामूहिक राज्यगादीवर (Iron throne) बसण्यासाठी लोकांची चाललेली धडपड, त्यासाठीच हा खेळ मांडला.

ह्या खेळाचे हायलाईट्स वाचून प्लॉटची क्लिष्टता आणि interesting मांडणी लक्षात येईल:

1. राजकारण, युद्ध, दगाबाजी, प्रामाणिकपणा, कर्तव्य, हाव, डाव, मोह, शौर्य, क्रौर्य, प्रेम, मत्सर, जादूटोणा, सेक्स…! “टोकाचं” हे विशेषण मागे लावून ह्यातला प्रत्येक पैलू पाहायला मिळणं = GoT.

2. रक्ताचे पाट वाहणे ह्या वाक्प्रचाराचे तंतोतंत पालन = GoT.

3. स्क्रिप्टला साजेसे भव्य-दिव्य सेट्स आणि “हे कसं काय मॅनेज केलं असेल” असा प्रेक्षकाला हमखास पडणारा प्रश्न = GoT

 

game-of-thrones-set-01-marathipizza

 

game-of-thrones-set-02-marathipizza
4. कास्टिंग आणि प्रत्येक कॅरेक्टरची वाखाणण्याजोगी ऍक्टिंग, देहबोली आणि जोडीला तगडे संवाद = GoT
5. 3 ड्रॅगन्स आणि त्यांची मनुष्यजातीतली आई = GoT

daenerys-dragon-game-of-thrones-marathipizza

 

daenerys-dragon-game-of-thrones03-marathipizza

 

daenerys-dragon-game-of-thrones02-marathipizza
6. एखाद्या कॅरेक्टरच्या प्रेक्षक प्रेमात पडला की त्याचा शेवट आलाच म्हणून समजा, असं नॉर्मली मालिकांमध्ये ´नसलेलं´ समीकरण = GoT

ह्यातलं माझं सर्वात आवडतं कॅरेक्टर म्हणजे Tyrion Lannister.

इम्प (an evil spirit) ह्या टोपणनावाने ओळखला जाणारा आणि dwarf म्हणून हिणवला जाणारा Tyrion. ही भूमिका Peter Dinklage ह्यांनी केलेली आहे. जबरदस्त हा शब्द त्यांच्या अभिनयाची पुसटशी पावती देऊन जातो.

tyrion-lannister-01-marathipizza

 

वडिलांनी आणि बहिणीने तिरस्कृत, समाजाने बहुतांशी बहिष्कृत अश्या एका बुटक्या, दारुड्या, बाईलवेड्याची ही भूमिका. पण हा फक्त (कारण ते ही केलंय त्याने) गटारात लोळणारा बेवडा नाही तर ह्याच्या जोडीला आहे धारदार वाणी आणि त्याहून धारदार बुद्धी.

स्वतःच्या गुणांबरोबर दोषांचाही माज असणारा, आपल्यावर स्वतःच्याच लोकांनी केलेल्या अन्यायाची सल बाळगणारा, तरीही दुसऱ्यांसाठी मनात असलेली संवेदना जपणारा, काय बरोबर आणि काय चूक ह्याची जाणीव राखणारा, झोपेतून उठल्याबरोबर ते झोपेपर्यंत वाईन पिणारा, पुस्तके वाचणारा, सतत वासनेची भूक भागवत असूनही प्रेमासाठी उपाशी असलेला, दरवेळी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडणारा इम्प मनाचा हळवा कोपरा होऊन जातो.

 

tyrion-lannister-02-marathipizza

 

प्रत्येक एपिसोड बघताना “देवा, ह्याला जिवंत ठेव” असा पुसटसा धावा चालू राहतो.

ह्याच्या वाटेला मालिकेतले काही तुफान संवाद आहेत आणि त्याने त्यांना अर्थातच पुरेपूर न्याय दिलेला आहे.

ह्या लेखाला पूर्णविराम देत असताना त्यांची एक झलक:

 

game-of-thonres-tyrion-lannister-i-drink-and-i-know-things

 

“Never forget what you are, the rest of the world will not. Wear it like the armor and it can never be used to hurt you”

तुम्ही काय आहात हे (म्हणजे, तुमच्यातील वैगुण्य, कमतरता) कधीही विसरू नका. त्या कमतरतांना चिलखतापणे परिधान करा म्हणजे त्यांचा वापर करून कुणी तुम्हाला दुखवू शकणार नाही.

“A mind needs books just like a sword needs a whetstone.”

तलवारीस धार देणाऱ्या दगडाची गरज असते – अगदी तशीच – बुद्धीला पुस्तकांची गरज असते!

तळटीप: मालिकेतली काही दृश्ये आणि संवाद आपल्या मुलांबरोबर किंवा आपल्या पालकांबरोबर पाहताना संकोच वाटण्याची शक्यता आहे. तेवढं पथ्य पाळल्यास GoT is an absolutely, deliciously, entertaining bite!

===

नमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?