प्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील? हे घ्या उत्तर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
प्रत्येक सजीव हा उत्सर्जन करतोच. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेस उत्सर्जन म्हणतात.
उत्सर्जन ही क्रिया प्रत्येक सजीव अखंडपणे करत आलेला आहे. पण यातून एक प्रश्न उपस्थित होतो, की जर प्राणी-पक्षी शी-शू करून त्यांची उत्सर्जन क्रिया पार पडतात तर मग झाडे काय करत असतील?
झाडेदेखील सजीव आहेत, मग ते कशा प्रकारे उत्सर्जन करत असतील. काय झाडेदेखील विष्ठेद्वारे उत्सर्जन करतात?
तर हो झाडे देखील उत्सर्जन करतात, म्हणजेच त्यांच्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात.
===
- हा धातू खाणींतून नव्हे, तर चक्क झाडांमधून मिळतोय, वाचा अगदी नवं संशोधन!
- झाडांच्या खोडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग देतात – जाणून घ्या ‘शास्त्रीय’ कारण!
===
तसं पाहिलं तर जगातील प्रत्येक सजीव हा उत्सर्जन करत असतो आणि जर त्याने असे केले नाही, तर त्याचा त्या सजीवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतो.
छोट्याश्या सिंगल सेल जीवापासून ते विशाल ब्लू व्हेलपर्यंत सर्वच सजीव हे उत्सर्जन करतात. पॅरामेशियम हा सूक्ष्म जीवाश्म देखील घन, द्रव आणि वायु या अवस्थेत उत्सर्जन करताना आढळून आला आहे.
सजीवांत अखंड सुरू असलेल्या चयापचय क्रियांमुळे पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड आणि अमोनिया अशी क्षेप्यद्रव्ये प्रामुख्याने निर्माण होत असतात. ती शरीरात राहणे आरोग्यास अपायकारक असते, म्हणून उत्सर्जन अत्यावश्यक ठरते.
त्यापैकी वायुरूप पदार्थ श्वसन तंत्रामार्फत (श्वासोच्छ्वासाच्या इंद्रियांकडून) आणि पाणी, हे श्वसन तंत्रातर्फे, तसेच घामाच्या रूपाने त्वचेमार्फत आणि विष्ठेबरोबर पचन तंत्राकडून (पचन संस्थेकडून) बाहेर टाकले जाते.
म्हणजेच पाण्याबरोबर, म्हणजे लघवीवाटे, प्रथिनांपासून होणारी नायट्रोजनी क्षेप्यद्रव्ये ही प्रामुख्याने उत्सर्जन तंत्रातील किडनी मार्फत टाकली जातात.
त्याचबरोबर उत्सर्जन तंत्र शरीराला आवश्यक असलेली महत्त्वाची द्रव्ये ठेवून आणि रक्तातील आम्ल आणि क्षार यांचे प्रमाण योग्य राखून अनावश्यक घटक, जास्तीचे पाणी, लवणे, चयापचय द्रव्ये इत्यादी बाहेर टाकून आणि तर्षण नियमन करून अंतःपरिस्थिती समतोल राखते. या महत्त्वाच्या क्रियेस होमिओस्टॅसिस असे म्हणतात.
त्याप्रमाणे झाडेदेखील स्थायू, वायू आणि द्रव्य रुपात उत्सर्जन करत असतात. वनस्पतींच्या अपित्वचेवर असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांना रंध्र (stomata) असे म्हणतात.
यामधून वायूंची देवाण-घेवाण होत असते. दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेत निर्माण झालेला ऑक्सिजन वायू तसेच रात्री श्वसन क्रियेत निर्माण झालेला कार्बनडायऑक्साईड वायू रंध्राद्वारे वातावरणात सोडला जातो.
वनस्पती स्थायू आणि द्रव्य रुपात देखील उत्सर्जन करतात. जसे की झाडे रेजीन, डिंक, इत्यादी प्रकारचे द्रव्य बाहेर टाकत उत्सर्जन क्रिया पार पाडत असतात.
===
- या झाडांच्या सानिध्यात चुकून सुद्धा आलात तरी मृत्यू निश्चित!
- विकासकामात झाड जातंय? उचलून दुसरीकडे लावा!- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..
===
तसेच झाडांची सुकलेली पाने गळून पडणे हा देखील त्यांच्यातील उत्सर्जन क्रियेचाच एक भाग असतो.
वनस्पती उत्सर्जित करत असलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ मानवाच्या अतिशय उपयोगाचे आहे. म्हणजेच झाडांची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगाची असते.
जसे की टर्पेटाइन, फेनॉल्स, मॉर्फीन, निकोटीन इत्यादी पदार्थांना व्यापारीदृष्ट्या खूप महत्व आहे.
तर काही वनस्पतींमधील टाकाऊ पदार्थ कॅल्शिअम ऑक्झॅलेट ह्यामुळे खाज सुटते.
प्रत्येक सजीव हा तीन स्तिथीत उत्सर्जन करत असतो तसेच झाडेही करतात. हा निसर्गाचा नियम आहे. पण त्यांच्या उत्सर्जन करण्याच्या पद्धती जरा वेगळ्या असतात. वनस्पतीच्या उत्सर्जन करण्याच्या पद्धती विचित्र वाटल्या तरी त्या पूर्णतः नैसर्गिक आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.