आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
अमेरीकेला जगामध्ये एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. अमेरिकेने आपले बलाढ्यपण जगाला वेगवेगळ्या युद्धांमध्ये दाखवून दिलेच आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये खूप मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या आहेत. पण तुम्हाला अमेरिकेबद्दल एक गोष्ट कदाचित माहित नसेल, ती म्हणजे ही की, अमेरिकेला इतिहासामधील एका घटनेमुळे अंकल सॅम असे टोपणनाव नाव पडले.
१८१३ मध्ये अमेरिकेला अंकल सॅम टोपणनाव पडले होते. हे नाव न्यूयॉर्कच्या ट्रॉयमध्ये राहणारे मिट पॅकर सम्युअल विल्सन यांच्याशी संबंधित आहे. सम्युअल विल्सन हे १८१२ च्या युद्धा दरम्यान अमेरिकन सैन्याला बीफ बॅरल्स पोहोचविण्याचे काम करत होते.
विल्सनने अमेरिकेला बॅरेल्स तयार करून देण्याचा करार केला होता, पण अमेरिकन सैनिकांनी या अन्न पुरवणाऱ्या सम्युअल विल्सनला अंकल सॅम म्हणून संबोधले.
स्थानिक वृत्तपत्रांनी या गोष्टीला उचलून धरले आणि अमेरिकेच्या फेडरल सरकारने अंकल सॅम या टोपण नावाची व्यापक स्वीकृती करण्यात आली.
१८६० आणि १८७० च्या उत्तरार्धात राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नस्ट यांचे अंकल सॅमचे चित्र लोकप्रिय झाले होते. त्यांनी हे चित्र त्यांच्या काळामध्ये हळूहळू त्यांच्या वयानुसार विकसित केले होते. त्यांनी पांढरी दाढी–मिशी आणि स्टार्स आणि स्ट्रीपचा सूट जो आताच्या वर्णाशी संबंधित आहे तो त्यांच्या चित्रात अंकल सॅम यांनी घातला आहे असे दाखवले होते. नस्ट यांना मॉर्डन सांता क्लॉजची आधुनिक प्रतिमा तयार केली.
डेमोक्रेटिक पार्टीचे प्रतिक गाढव आणि रिपब्लिकन पार्टीचा हत्ती यांच्या कल्पनेमधूनच आले आहेत. त्याचप्रमाणे थॉमस नस्ट याने अजून खूप वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढली होती. अंकल सॅमचे कदाचित सर्वात प्रसिद्ध चित्र जर कुणी काढले असेल, तर ते म्हणजे जेम्स मॉन्टगोमेरी फ्लॅग याने काढलेले चित्र होय.
फ्लॅगने काढलेल्या चित्रातील अंकल सॅमने एक उंच टोपी आणि निळे जॅकेट घातले होते. या चित्रातील अंकल सॅम हा पाहणाऱ्या प्रेक्षकांकडे बोट करताना दिसून येतो. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान हे पोट्रेट तयार केले होते आणि त्यामध्ये काही शब्द लिहिलेले होते.
“मला तुम्ही हवे आहात, अमेरिकन सैन्यासाठी”
असे त्यावर लिहून याचे पोस्टर तयार करण्यात आले होते. हे चित्र खूपच लोकप्रिय झाले होते. १९१६ च्या जुलैमधील एका साप्ताहिकाच्या कव्हरवर
“तुम्ही तुमच्या सज्जतेसाठी काय करता ? ”
असे लिहले होते. त्यानंतर हे पोस्टर वेगवेगळ्या कॅप्शनने वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आले होते.
सप्टेंबर १९६१ मध्ये अमेरिकी कॉंग्रेसने सॅम्युअल विल्सन यांना
“अंकल सॅम, अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रतिकाचे पूर्वज”
म्हणून मान्यता देण्यात आली. विल्सन हे १८५४ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी मरण पावले आणि न्यूयॉर्क येथील ट्रॉयच्या ऑकवूड स्मशानभूमीत त्यांची पत्नी बेत्से मन हिच्या बाजूला त्यांना दफन करण्यात आले. आता या शहरातील लोक या शहराला अंकल सॅमचे घर म्हणून संबोधतात.
अशाप्रकारे अमेरिकेला अंकल सॅम हे टोपणनाव पडले आणि अमेरिकेला पडलेले हे नाव खूप लोकप्रिय झाले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.