' सर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं?! जाणून घ्या – InMarathi

सर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं?! जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या संपूर्ण जग कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहे. यावर्षी भलेही थंडी जास्त पडत असली तरी, ही थंडी सर्वांनाच हवी-हवीशी असते. सकाळी सकाळी अंगाला झोंबणारा तो गार वारा आपलं मूड अगदी फ्रेश करून जातो. दिवसभर वातावरणात वावरणारी ती थंडी एक सुखद अनुभव देऊन जाते, आणि रात्री जागोजागी पेटलेल्या शेकोट्या आणि त्याभोवती शेकोटीची उब घेत या मोसमाचा आनंद घेणारी मंडळी. एकूणच काय तर इतर ऋतूंपैकी एक वेगळाच आणि हवा-हवासा अनुभव असतो ह्या मोसमाचा… नाही का?

 

winter-inmarathi
colors.couponrani.com

पण या थंडीत घरातून बाहेर निघालं की, अचानक आपल्या नाकातून पाणी वहायला लागतं. मग आपल्याला सर्दी असो किंवा नसो, नाकातून पाणी हे येतचं. पण असे का होत असेल बरं… का थंडीच्या दिवसात नाकातून पाणी वहात.. कधी विचार केलाय?

 

Runny-Nose-inmarathi
wikihow.com

आपल्याला वाटत असत की, ‘थंडी आहे, मग नाक तर वहाणारच…’ पण का ? याचा आपण विचारच करत नाही. आणि असेही नाही की, केवळ थंडीच्या दिवसांतच आपलं नाक वहातं. असे अनेक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्या नाकातून पाणी येते. आज आपण याचंच कारण जाणून घेणार आहोत.

 

Runny-Nose-inmarathi02
babycenter.com

जर आपलं नाक वहात असेल तर आपण इन्फेक्शन किंवा सर्दीच्या नावावर ते खपवून घेतो. पण असे का होत असेल. इन्फेक्शन मुळे नाक वहात आणि त्यालाच सर्दी असे म्हणतात. पण त्याचं काही कारण पण असेल ना?

तर होतं असं की, जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपल्या नाकात काही बॅक्टेरिया जन्म घेतात. त्या बॅक्टेरियाशी लढण्याकरिता नाकातील म्यूकस मेम्ब्रेन एका विशिष्ट प्रकारच्या म्यूकसचे कॉम्बिनेशन तयार करते. आणि याच्याचमुळे आपल्या नाकातून पाणी वाहात.

तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल की, जेव्हाही आपण रडत असतो तेव्हा आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या नाकातून देखील पाणी येतं. याचं कारण म्हणजे, जेव्हा आपण खुप रडतो तेव्हा आपल्या पापण्यांच्या आतील भागातील डक्टमधून अश्रू वाहत नाकातील कॅविटीज मध्ये येतात आणि आपलं नाक वाहायला लागतं.

 

cryingchild-inmarathi

 

आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या नाकातून आत जाणाऱ्या हवेला आपलं नाक ओलावा देते. कारण तीच हवा आपल्या फुफ्फुसांपर्यंत जाते.

थंडी जास्त असल्याकारणाने जेव्हा ती थंड हवा आपल्या नाकात प्रवेश करते तेव्हा जास्त प्रमाणात ओलावा तयार होतो, ज्यामुळे आपल्या नाकातून पाणी वाहायला लागते.

तसं तर आपल्या नाकात नेहमीच पाण्याचे काही थेंब असतात. तेव्हा तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होते तेव्हा ते सर्व थेंब एकत्र येतात आणि त्यामुळे आपले नाक वाहू लागते. याचं हे देखील एक महत्वाच कारण आहे की, थंडीच्या दिवसात आपले नाक मोठ्या प्रमाणात म्युकस तयार करते.

 

Runny-Nose-inmarathi03
beautystat.com

अनेकांना धूळ, माती, लोकरी कपडे, प्राण्यांचे केस अश्या काही वस्तूंच्या संपर्कात येताच शिंका यायला लागतात. या प्रकारच्या वस्तूंना ‘एलरजेन’ असे म्हणतात, म्हणजेच ज्या वस्तूंपासून एलर्जी होईल अश्या वस्तू. अश्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने आपल्या नाकात मोठ्या प्रमाणात म्युकस तयार होतो ज्यामुळे आपले नाक वाहायला लागते.

काही लोकांना असे देखील वाटते की थंडीत जास्त वेळ बाहेर राहिल्याने सर्दी होते. पण तसं काही नाहीये. जेव्हाकी थंडीच्या दिवसांत सर्दी होण्याचं मुख्य कारण म्हणजे अधिक वेळ घरात घालवणे हे आहे. घरात आपल्यापैकी कुणालाही सर्दी असली की, त्याच्या शिंके मार्फत बॅक्टेरियाज हवेत मिसळतात. आपणही घरात असल्याने त्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्याला सर्दी होते.

 

woman-wearing-winter-scarf-inmarathi
bt.com

जर तुम्हाला तुमचे नाक वाहण्यापासून थांबवायचे असेल तर थंडीच्या दिवसांत घरातून बाहेर निघताना नेहेमी नाकाला झाकून ठेवा. ज्यामुळे नाकात उब राहिलं आणि नाकातून पाणी येणार नाही.

यावरून आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल की आपलं नाक का वाहत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?