' स्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या तापदायक गोष्टींवर सोपे उपाय! – InMarathi

स्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या तापदायक गोष्टींवर सोपे उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादा खाद्यपदार्थ बनवणे, जेवढे आपल्याला सोपे वाटते तेवढे ते नक्कीच सोपे नसते. आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा घरी एखादा पदार्थ खातो, तेव्हा त्या रेस्टॉरंटमधील शेफची किंवा आपल्या घरातील स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीची खूप मेहनत दडलेली असते. आपल्याला एक दिवस जरी जेवण बनवायचे झाले, तरी ते आपल्याला खूप अवघड जाते.

आपला रोजचा स्वयंपाक करतान घरातील गृहिणींना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे या गृहिणींचे काम थोडे सोपे होईल.

१. लिंबू कापल्यानंतर कालांतराने खराब होणे.

 

Best Food Hacks.Inmarathi

तुम्हाला लिंबू सरबत बनवायचे असल्यास किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये लिंबूचा वापर करायचा असल्यास आपण लिंबू कापतो आणि त्यातील काही भाग वापरतो. पण कालांतराने त्याचा उरलेला भाग हा खराब होऊन काळा पडतो.

 

Best Food Hacks.Inmarathi1

पण तुम्ही हे थांबवू शकता. तुम्ही लिंबूचा वापर करताना तो न कापता त्याला एका बाजूने छिद्र पाडून त्याच्यातील रस काढू शकता. असे केल्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग देखील होईल आणि त्याचा उर्वरित भाग खराब देखील होणार नाही.

२. अंडी खराब आहेत की चांगली हे पाहणे.

 

Best Food Hacks.Inmarathi2
netdna-cdn.com

कधी–कधी आपण बाजारातून आणलेली अंडी ही दिसायला चांगली असतात. पण आपण जेव्हा त्याचा वापर करायला जातो त्यावेळी आपल्याला समजते की, ती आतून खराब झालेली आहेत. असे खराब झालेले अंडे जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला आजाराला सामोरे जावे लागू शकते.

 

Two eggs in two glasses of water, one floating near the surface
timeinc.net

त्यामुळे कधीही अंड्यांचा वापर करत असताना ती खराब आहेत कि चांगली हे नक्की जाणून घ्या. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारातून आणलेली अंडी उपयोगासाठी घेत असाल, तेव्हा ती अंडी पाण्यामध्ये टाकून पहावीत. जी अंडी पाण्यामध्ये बुडतील ती खाण्यास योग्य असतील आणि जी अंडी पाण्यात बुडणार नाहीत ती खराब झालेली असतील. त्यामुळे पुढच्या वेळेस याची नक्की खबरदारी घ्या.

३. उकडलेल्या बटाट्यांची साले काढणे.

 

Best Food Hacks.Inmarathi4

उकडलेल्या बटाट्यांची साले काढणे ही एक स्वयंपाक करताना समस्या नेहमी येते आणि यामध्ये गृहिणींचा खूप वेळ वाया जातो. काहींना तर हे काम अजिबात आवडत नाही.

 

Best Food Hacks.Inmarathi5

जर तुम्हाला उकडलेल्या बटाट्यांची साले जास्त कष्ट न घेता काढायची असल्यास तुम्ही बटाटे उकडायला टाकण्याच्या अगोदर त्याच्याभोवती एक सुरीने एक गोलाकार कट करावा. असे केल्यास बटाटे उकडल्यानंतर त्यांची साली सहजपणे निघतील.

४. लसूण सोलणे

 

Best Food Hacks.Inmarathi6

लसून ही जेवण बनवताना खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे. डाळ, भाजी यांसारख्या रोजच्या जेवणामध्ये देखील आपल्याला लसणीची गरज भासते. पण ही लसून सोलण्याचे काम देखील तेवढेच अवघड आणि वेळेचा अपव्यय करणारे असते.

 

Best Food Hacks.Inmarathi7

पण जर तुम्हाला यामध्ये वेळ वाया घालवायचा नसल्यास तुम्ही लसणीला एका काचेच्या बरणीमध्ये टाकून जोरजोराने शेक करा. त्यानंतर त्या काढून पाहा, त्यांच्या साली निघालेल्या असतील.

५. फ्रीझ झालेले बटर मूळ रुपात  आणणे.

 

Best Food Hacks.Inmarathi8

 

आपण बाजारातून आणलेले बटर खराब होऊ नये, यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटरला जेव्हा आपण उपयोग करण्यासाठी काढतो, तेव्हा ते पूर्णपणे फ्रीझ झालेले असते. त्यामुळे त्याचा वापर करणे थोडे कठीण जाते. अशावेळी आपण ते ओव्हनमध्ये ठेवतो, परंतु ओव्हनमध्ये जास्त हिट असल्यामुळे त्याचे पाणी होण्याची शक्यता वाढते.

 

Best Food Hacks.Inmarathi9

 

त्यामुळे यावर सर्वात योग्य उपाय म्हणजे आपण हे बटर परत मूळ स्वरूपात आणण्यासाठी ओव्हनमध्ये न ठेवता, चीजसारखे किसणीने त्याचा कीस काढू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो.

या अशा काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणि पदार्थ लवकरात लवकर बनवू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?