“ही” दिनचर्या आणि आहार आत्मसात करून मधुमेही जगू शकतात सामान्य जीवन
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मागील भागाची लिंक : मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी
===
‘मधुमेह’ हा भारतात जोमाने फोफावणारा व्याधी आहे. त्याबाबत एक सर्वसामान्य ज्ञान असावे या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ही केवळ basic guideline असुन तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Diabetes हा जीवनशैलीत काही बदल करून बराच control होवु शकतो. त्यामध्ये आहार, जेवनाच्या वेळा, झोपेच्या वेळा, व्यायाम, तणावाचे नियमन या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

सर्व प्रथम आपण जेवणाच्या वेळा कशा असाव्यात हे पाहुया.
मधुमेहींनी किमान ३ वेळा खावे. तसेच जेवनाच्या वेळा पाळाव्यात. योग्य नाश्ता ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे.
- त्यामुळे चयापचय क्रिया ऊत्तम राहाते.
- दिवसभराच्या भुकेवर नियंत्रण राहते.
- रात्रीच्या १०-१२ तासांच्या उपवासानंतर शरीरास ऊर्जेची गरज असते.
- नाश्ता हा भरपुर fibers नी युक्त असावा. ज्यामुळे अन्नाचे पचन होवुन Blood sugar level चे नियमन होते.
- सफरचंद ,पेर या फळांमध्ये calories कमी वfibers भरपुर असतात.
- Diabetes चे रूग्ण दिवसभरात २ कप फळे खाऊ शकतात.
- त्याचप्रमाणे आहारात whole grains चा समावेश असावा. बाजरी, नाचणि हे छान पर्याय आहेत.
काकडी, गाजर, मुळा यांचा अवश्य समावेश असावा.

- एखादे फळ किंवा low fat dairy product जेवनात असावा. ताक हा देखील चांगला विकल्प आहे.
- वजन जर प्रमाणात असेल तर दही, टोफु, पनीर हे देखील खाऊ शकतो.
- Whole grains चा समावेश म्हणुन चपाती, भाकरी, bread(brown), भात ईत्यादी पर्याय आहेत.
- स्टार्च नसणाऱ्या भाजांचा समावेश आहारात असावा. पालक, टोमॅटो, शिमला मिर्ची, फ्लावर, भेंडी, फरसबी, मशरूम हे चांगले पर्याय आहेत.
- Lean protein आहारात समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्याचे शाकाहारी पर्याय आहेत. छोले, राजमा, दाळी, पनीर, सोयाबीन.
- तर मांसाहारी पर्याय आहेत, अंडी (egg white), चिकन, मिट.

असा परीपुर्ण आहार मधुमेहींनी घ्यायला हवा.
- Fats-omega 3, fatty acids चा समावेश असावा. स्त्रोत-बदाम,अक्रोड, तुप, ऑलिव्ह ऑईल, शेंगदाना तेल
- तर saturated fat (High dairy product,animal protein) टळावे.
- Transfat (processed food, bakery itoms) टाळावेत.
- Cholesterol ची मर्यादा २००miligram/day आहे. ती पाळावी.
- ऊपवास, कमी झोप, तणाव या गोष्टी टाळाव्यात.
- वनस्पतीजन्य fats चा समावेश करून घ्यावा. ऊदा.-olive oil, जवस
- आठवड्यातुन किमान १५० मिनिटे व्यायाम करावा.

आयुर्वेदानेही “प्रमेह”असे diabetes चे वर्णन केले आहे. कफदोषाच्या अधिक्याने हा व्याधी होतो.
प्रमेहात व्यायाम अवश्य करावा असे सांगितले आहे. पश्चिमोत्तासन, हलासन ही आसने ऊपयुक्त ठरतात.
प्रमेहाच्या रुग्णाने आहारात समाविष्ट करावयाचे अन्नपदार्थ :
जांभुळ, चणे, कारले, दोडका, दुधी, मेथी, हळद, भगर, मुग, कुळीथ…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.