Site icon InMarathi

कर्णी सेनेचं नवं हिंसक आवाहन! WhatsApp वर संदेश व्हायरल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही कर्णी सेना आणि इतर संघटनांनी चित्रपटाला विरोध करण्याचे आणि कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचे सत्र थांबवलेले नाही. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याच्या बातम्या आल्या तेव्हापासून सातत्याने कर्णी सेना भन्साळी आणि चित्रपटातील इतर कलाकारांना धमकावून कायदा धाब्यावर बसवून विरोध करत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवत सर्व राज्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले.

त्यानुसार हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शनाच्या आधी असणारा विरोध नंतर आणखीनच तीक्ष्ण झाल्याचे दिसून येत आहे. जमावशाही दाखवत रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणे हा मार्ग सर्रास अवलंबला गेला आणि त्याचे परिणाम काय असतात हे येता काळ सांगेल.

 

jammulinks.news

सुरुवातीला या चित्रपटाचे चित्रीकरण जयगडच्या किल्ल्यात सुरू होते. चित्रपटाच्या कथेविषयी अनेक बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत होत्या. गेल्या जानेवारी महिन्यात चित्रिकरणादरम्यान कर्णी सेनेचे लोक जयगडच्या किल्ल्यात घुसले, आणि आंदोलन करण्याच्या नावाखाली थेट चित्रपट दिग्दर्शक संजय भन्साळी यांच्या कानाखाली मारली.

 

s3.india.com

चित्रपटात चुकीचा इतिहास दखवला जाऊ नये असे कर्णी सेनेचे म्हणणे होते. त्यानंतर पुन्हा एकदा मार्च महिन्यात चित्तोडच्या किल्ल्यातील पद्मिनी महालात चित्रीकरण चालू असताना कर्णी सेनेच्या आंदोलकांनी महालात लावलेल्या आरशाचे निमित्त करत सेटवर तोडफोड करत दहशत निर्माण केली.

त्यानंतर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि सप्टेंबर मध्ये “चित्रपटात राणी पद्मिनीचे चारित्र्यहनन करण्यात येत असल्याचा आरोप करत थेट दिग्दर्शक आणि कलाकारांना शारीरिक इजा करण्याच्या धमक्या दिल्या.

विशेष बाब म्हणजे हे होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्राला पत्र लिहून आवाहन करत होते की कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी. राजकीय पक्षांकडून मिळणारा सपोर्ट पाहून कर्णी सेनेची मजल “दिपिका पदुकोणचे नाक कापू” असे म्हणण्या पर्यंत गेली. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला.

 

amazonaws.com

 

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी कर्णी सेनेन ज्या चित्रपटगृहात पद्मावतीचा ट्रेलर दाखवला जाणार होता त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली. चित्रपटगृहाच्या मालकांना चित्रपट दाखवू नका म्हणून धमक्या दिल्या. जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब फेकून रस्त्यावर गोंधळ माजवला. याच्यावर कडी म्हणजे दिल्लीत गुर्गराम येथे शाळकरी मुलांच्या बसवर केलेली दगडफेक.

पण कर्णी सेनेची दादागिरी आणि धमक्यांना न जुमानता अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशीच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत कमाई केली. हे लक्षात आल्यानंतर कर्णी सेनेने आता एक नवीन संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. या संदेशात राजपूत जनतेला आवाहन करत

“पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरा आणि तुमची ताकद दाखवून द्या. चित्रपट चालायला नको.. आणि तो चालणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”

असे सांगून थेट हिंसेचे आव्हान केले आहे. रस्त्यावर उतरून युध्द पुकारले की त्याचे परिणाम काय असतात हे आपल्याला नव्याने सांगायला नको.

 

===

#जरूरी_सूचना -:

27 जनवरी करणी सेना #सम्मान_दिवस

-: श्री राजपूत करणी सेना के शीर्ष संस्थापक लोकेन्द्र सिंह जी कालवी व राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना का समस्त राजपूत संगठनो और क्षत्रिय समाज,और हमारा समर्थन करने वाले सभी सामाजिक संगठनों से निवेदन:-

राजपूतों की एकता से फिल्म पद्मावत को 50% सिनेमाघरों में रोकने में हम सफल हुये है,अभी संघर्ष जारी रहेगा, आज गणतंत्र दिवस है आज सभी भाई एक मीटिंग करें और जहाँ फिल्म रिलीज हुई है उन सिनेमाघरों के आगे 27 जनवरी को भारी प्रदर्शन किया जाये! 27 जनवरी भंसाली को थप्पड़ मारने की बरसी है, इस दिन को यादगार बनाने के लिये एक बार फिर पूरी ताकत से विरोध किया जाये! हमारा संघर्ष ही हमारी पहचान है,खासकर उत्तरप्रदेश, दिल्ली,मुम्बई जैसी जगहों पर फिल्म का लगना हमारे लिये शर्मनाक है! अतः आपसे निवेदन है कि जहाँ फिल्म पुलिस पहरे में लगाई है उन सिनेमाघरों के मालिकों के घरों पर भी हजारों की संख्या में जाये! अभी लड़ाई जारी है!

27 जनवरी को पूरे देश में एक साथ ऐतिहासिक प्रदर्शन होगा!एक बार फिर लाखों लोग सड़कों पर उतरकर महासती माँ पद्मनी के सम्मान की लड़ाई लड़ेंगे,और इतिहास को विखंडित करने वालों को मुँह तोड़ जवाब देंगे!!

इस मैसेज को आगे #फॉरवर्ड_करें!!

===

या संदेशाचा अन्वयार्थ थोडक्यात असा-

“सर्व राजपूत आणि क्षत्रिय संघटनांना निवेदन करण्यात येते की, राजपुतांच्या एक्तेमुळे पद्मावत या चित्रपटाला पन्नास टक्के जागांवर रडर्षित करण्यापासून आपण रोखू शकलो आहोत. हा संघर्ष सुरूच राहील. आज गणतंत्र दिवस आहे. आज सर्वांनी आठनिक लोकांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात आणि २७ जानेवारीला चित्रपटगृहासमोर मोठ्या संख्येने जमून ताकद दाखवून द्यावी. मागच्याच वर्षी २७ जानेवारीला आपल्या कार्यकर्त्यांनी पद्मावती च्या सेटवर भन्सालीच्या कानाखाली मारली होती.

या दिवसाचे निमित्त साधून याही वर्षी पद्मावत ला शक्य त्या मार्गांनी विरोध करावा. विशेषतः दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होणे ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे. तरी सर्वंना सूचित करण्यात येते की, २७ जानेवारी या दिवशी संपूर्ण देशात प्रखर निदर्शने करावीत. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून राणी पद्मिनीचे चारित्र्याचे हनन करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना धडा शिकवावा.”

कर्णी सेनेचे हे आव्हान साधेसुधे नाही. त्यांची अस्मिताबाजी रस्त्यावर येते तेव्हा काय होते हे आपण गेल्या एक वर्षापासून पाहत आलो आहोत. त्यात नव्याने आलेला हा संदेश म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन हिंसेचा बाजार मांडण्यासाठी उघड उघड चिथावणी आहे.

 

i.ndtvimg.com

भारताच्या पंतप्रधानानांनी जागतिक पातळीवर सहिष्णू देश म्हणून भारताची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करावा त्याच वेळी देशात अनेक ठिकाणी जाळपोळ, राडेबाजी चालू असावी याहून दुर्दैव नाही.

झुंडीपुढे न झुकता कायदा वापरून झुंडीला जागेवर राहायला भाग पडायचे असते हे आपल्या व्यवस्थेला अजून शिकावे लागेल हे या प्रकरणातून प्रकर्षाने दिसून आले आहे. अस्मितांचा उद्रेक रस्त्यावर उतरतो तेव्हा दंडुकेशाहीची गरज असते हे लक्षात न घेता आपले राज्यकर्ते त्यांच्या भावना कुरवाळण्यात धन्यता मनात आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही.

कर्णी सेनेच्या या आवाहनानंतर सार्वजनिक मालमत्तेची अथवा जीविताची हानी झाल्यास त्याला राज्यकर्ते आणि त्याहीपेक्षा या प्रकरणावर सरकारला धारेवर धरण्या ऐवजी मौन बाळगणारे तटस्थ नागरिक जबाबदार असतील हे स्पष्ट आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version