Site icon InMarathi

१७ वर्षाच्या ह्या मुलाचा ‘जगावेगळा’ विक्रम पाहून भल्याभल्यांची “झोप” उडाली आहे…!

randy gardner inmarathi

twitter.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नमस्कार वाचकहो, काल रात्री कशी झाली झोप?

व्यवस्थित झोप लागली नाही की दिवस कसा गणित चुकल्यासारखा जातो हे सर्वांना माहितच असेल. झोप ही माणसाची मुलभूत गरज आहे असे म्हटले तरी तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

जगण्यासाठी जितके तहान भूक लागल्यानंतर खाणे आणि पिणे गरजेचे आहे, तितकीच झोप गरजेची.

आपण एखादे काम तेव्हाच योग्यप्रकारे करू शकतो, जेव्हा आपण पूर्णपणे फ्रेश असतो. तोच आराम मिळवण्यासाठी ज्याची गरज असते, ती म्हणजेच झोप.

 

 

झोपेचे महत्त्व काय असते हे तुम्ही एखाद्या रात्रपाळी करणाऱ्या माणसाला विचारू शकता, तो तुम्हाला नक्की सांगेल.

आपली झोप अपुरी राहिली, तर येणारा दिवस आपला तितकासा चांगला जात नाही. कामात लक्ष देखील लागत नाही. त्यामुळे एक दिवस जरी झोप झाली नाही, तर आपली चिडचिड होते आणि भेटेल तिथे झोपण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाबद्दल सांगणार आहोत, जो तब्बल अकरा दिवस न झोपता राहिला होता.

रॅन्डी गार्डनर आणि ब्रुस मॅकएलिस्टर यांना विज्ञान मेळाव्यासाठी एका कल्पनेची आवश्यकता होती.

त्यांनी अशा एका माणसाबद्दल ऐकले होते, ज्याने सध्याच सर्वात जास्त काळ जागे राहण्याचा विश्व रेकॉर्ड बनवला होता आणि त्यांनी त्या माणसाला हरवण्याचा ठरवले.

त्यानंतर त्यांनी न झोपल्यास कोणत्या प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावर होतात, यांच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली.

 

gettyimages.in

 

त्याच्यानंतर त्यांनी टॉस उडवून हे ठरवेल की, रॅन्डी गार्डनर हा या प्रयोगाचा भाग बनणार आणि तो हे काम १९६३ मधील ख्रिसमसच्या शालेय सुट्टीमध्ये करणार.

ही गोष्ट वर्तमानपत्रांना समजताच त्यांनी यावर स्टोरी तयार केली आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे स्लीप रिसर्चर डॉ. विल्यम डेमेंट हे गार्डनरच्या घरामध्ये त्याला पाहण्यासाठी आले होते.

ही गोष्ट त्या फक्त वय वर्ष १७ असलेल्या मुलाच्या पालकांना दिलासा देणारी होती, कारण त्यांना आपल्या मुलाच्या आरोग्याची आणि सुरक्षेबद्दल काळजी वाटत होती.

हे सर्व होत असताना प्रसार माध्यमांनी सर्वांचे लक्ष या मुलांच्या प्रयोगाकडे वेधून घेण्यास सुरुवात केली. त्या काळात सर्वांचेच लक्ष या मुलांच्या प्रयोगाच्या हालचालींकडे होते.

थोड्या काळात अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रेसमध्ये ‘जॉन एफ केनेडी हत्याकांड’ आणि ‘द बीटल्सने भेट देणे’ या दोन गोष्टींनंतर या मुलांचा हा प्रयोग त्या काळी सर्वात जास्त लोकप्रिय होता.

 

neatorama.com

 

या प्रयोगाच्या बाबतीत ही मुले खूपच गंभीर दिसत होती. त्यांनी त्यांना जमेल तसे प्रत्येक प्रयत्न हा प्रयोग पूर्ण करण्यासाठी केले.

शेवटी लागोपाठ २६४ तास न झोपल्यानंतर सर्वात जास्त वेळ जागे राहण्याचा विश्व रेकॉर्ड मोडला आणि त्या मुलांचा प्रयोग संपला. प्रयोग पूर्ण झाल्यानंतर शेवटी त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

रॅन्डी गार्डनरचा जन्म ७ ऑगस्ट १९४९ मध्ये झाला होता. रॅन्डी गार्डनरचा हा जास्त काळ न झोपण्याचा विश्व विक्रम अजूनही कायम आहे.

मुख्य म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची समिती आता या प्रयोगामुळे होत असणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन असा प्रयोग करण्याची मुभा देत नाही.

त्यानंतर कितीतरी लोकांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

या प्रयोगानंतर रॅन्डी गार्डनरच्या शारीरिक आणि संरचनात्मक कार्यपद्धतीवर या प्रयोगाचा काय परिणाम झाला आहे, याची तपासणी करण्यात आली.

तसेच, त्यानंतर त्याला ब्रेन स्कॅनिंग करण्यासाठी आणि त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पहिल्यासारखे करण्यासाठी नेव्हल (नौदल) रुग्णालयात पाठवण्यात आले.

 

2il.org

 

रॅन्डी गार्डनरवर रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या तपासणीच्या परिणामांवर अभ्यास करण्यासाठी अॅरीझोनाला पाठवण्यात आले. मॅकएलिस्टर म्हणतो की, या परिणामांतून असा निष्कर्ष काढण्यात आला की,

“रॅन्डी गार्डनरचा मेंदू प्रत्येकवेळी कॅटनॅपिंग करत होता, त्याचा काही भाग कधी झोपत होता तर कधी जागा होता.”

आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी रॅन्डी गार्डनर हा १७ वर्षाचा मुलगा २६४.४ तास म्हणजे तब्बल ११ दिवस २५ मिनिटे जागा राहिला होता.

हा प्रयोग केल्यानंतर सर्वात जास्त काळ जागे राहण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

तब्बल अकरा दिवस जागे राहण्याच्या त्याच्या या प्रयोगाने अनेक तज्ञ आणि संशोधकांना कोड्यात टाकले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version