घरी देवांचे फोटो-मूर्ती ठेवताना हे नियम पाळायला हवेत! अन्यथा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्याला भारतामध्ये विविध संस्कृतीचे लोक आणि अगणित धार्मिक स्थळे पाहायला मिळतात. प्रत्येक धर्माची एक स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते. ती त्या धर्माच्या श्रद्धा, तात्विक बाजू यांवर अवलंबून असते.
हिंदू धर्माच्या देखील स्वतःच्या अशा वेगळ्या चालीरीती आहेत.
देवी देवतांच्या आणि धार्मिक स्थळांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान असते.
त्यामुळे आपल्याला घराघरामध्ये या देवी – देवतांचे फोटो पाहायला मिळतात.
सर्वांच्याच घरामध्ये देवी – देवतांच्या अनेक मुर्ती आणि छायाचित्रे असतात. पण या मूर्ती किंवा छायाचित्रे वास्तुनुसार घरामध्ये सुख – समृद्धी आणण्यासाठी अनुकूल आहेत की नाहीत, हि गोष्ट मात्र कोणालाही माहित नाही.
वास्तुशास्त्रानुसार, देवी–देवतांच्या मूर्ती घरामध्ये कोणत्या रुपात आहेत आणि कोणत्या जागेवर स्थापन करण्यात आलेल्या आहेत, ही गोष्ट घरातील सुख – समृद्ध आणि संपत्ती इत्यादींवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करते.
त्यामुळे घरामध्ये देवी – देवतांच्या मूर्ती किंवा छायाचित्रे प्रस्थापित कराल, तेव्हा काही आवश्यक गोष्टी आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
आम्ही तुम्हाला याच गोष्टींबाबत काही माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला देवांच्या मूर्ती प्रस्थापित करताना मदत होईल.
१. घराच्या मंदिरामध्ये भगवान कृष्णाची बाळरुपी बसलेली मूर्ती ठेवणे सर्वात चांगले मानले जाते. याव्यतिरिक्त श्रीकृष्ण आणि राधेची जोडीने उभी असलेली मूर्ती देखील देवघरात ठेवली जाऊ शकते.
२. घरामध्ये देवी लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कुबेर यांची मूर्ती कधीही उभी नसावी. त्यांच्या बसलेल्या मुद्रेला शुभ आणि लाभदायक मानले जाते. भगवान कुबेर आणि लक्ष्मीची मूर्तीला मंदिराच्या उत्तर दिशेला प्रस्थापित करणे सर्वात शुभ असते.
३.घरामध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीला केसरी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असावे, कारण अशा वस्त्रांच्या गणपतीच्या मूर्तीला शुभ मानले जाते.
गणेशाला जास्वंदीचे फुल आवडते. हे फुल दररोज सकाळी गणपतीला वाहणे लाभदायक असते.
४. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शंकराची स्थापना करू इच्छित असाल तर, शिवलिंग म्हणजेच शंकराच्या पिंडीऐवजी शंकराची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवा. घरामध्ये शंकराची मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते.
५. घरातील देव्हाऱ्यात सूर्यदेवाची स्थापना जर तुम्ही करणार असाल, तर सूर्याच्या मूर्ती किंवा छायाचित्राऐवजी तांब्याची सूर्याची आकृती ठेवल्यास ते जास्त लाभदायक मानले जाते.
६. जर तुम्ही घरामध्ये श्रीरामाची मूर्ती ठेवू इच्छित असाल, तर काळजीपूर्वक ठेवा. श्रीरामाबरोबरच माता जानकी आणि भगवान हनुमानाची स्थापना नक्की करा. यामुळे घरामध्ये कलह होत नाहीत.
७. जर घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवले असेल, तर हे नेहमी लक्षात ठेवा की, भगवान विष्णूंबरोबर लक्ष्मी देवीची स्थापना देखील अवश्य करण्यात यावी.
भगवान विष्णू तिथेच राहतात, जिथे देवी लक्ष्मी त्यांच्याबरोबर असेल. त्यामुळे ही चूक कधीही करू नये.
८. काली मातेची विक्राळ रूप असलेली मूर्ती, ज्यामध्ये काली मातेचा डावा पाय भगवान शंकराच्या वरती असतो, अशी मूर्ती देखील घरामध्ये असणे चांगले मानले जात नाही.
अशा मूर्तीना स्मशान काली मानले जाते, जे विध्वंसाचे एक प्रतिक आहे.
९. तुमच्या घरामध्ये जर हनुमानाची मूर्ती असेल तर हे नक्की लक्षात घ्या की, त्या मूर्तीमध्ये हनुमान पर्वत उचलताना किंवा आपल्या शक्तीचे प्रदर्शन करताना दिसावे.
१०. मंदिरामध्ये विशेष लक्षात घेण्याची गोष्ट ही, की देवांच्या मूर्तीला किंवा छायाचित्राला सरळ जमिनीवर ठेऊ नये. असे करणे अशुभ मानले जाते. या मूर्तींना एखाद्या स्वच्छ वस्त्रावर किंवा ताटामध्ये प्रस्थापित करा.
या घरामध्ये देवी – देवतांच्या मूर्ती किंवा छायाचित्रे प्रस्थापित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या लक्षात ठेवून आचरणात आणणे खूप गरजेचे आहे.
तुमच्याही घरामध्ये सुख शांती नांदावी अशी तुमची इच्छा असेल तर याप्रकारे देवी – देवतांची घरामध्ये स्थापना करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.