Site icon InMarathi

लॅटिन अमेरिकन सिनेविश्वाच्या या सुपरस्टारला बॉलीवुडने एकेकाळी नाकारले होते यावर विश्वास बसणार नाही

sharan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बॉलिवूड चित्रपटसृष्टी ही  भारतामधील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी होणे सर्वांनाच जमत नाही.

आपण बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री पहिल्या असतील ज्यांनी एक किंवा दोन चित्रपट करून त्यानंतर ते कधीही आपल्याला कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.

 

wonderopolis.org

त्यामुळे त्यांची बॉलिवूडमधील कारकीर्द या एक – दोन चित्रपटानंतर संपुष्टात आली.

पण यातीलच काही जणांना दुसऱ्या चित्रपट सृष्टींमध्ये यशस्वी होता आले आहे.

रजनीकांतसारखा दिग्गज अभिनेता देखील पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये यशस्वी झाला नाही, त्यानंतर तो टॉलिवूडकडे वळला आणि तिकडे त्यांने घसघशीत यश मिळवले. आज रजनीकांतला तेथील लोक देव म्हणून पूजायला देखील मागे – पुढे पाहत नाही.

 

 

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला बॉलीवूडने नाकारले. तो सध्या अभिनेता लॅटिन अमेरिकन सिनेमा गाजवतोय.

आपल्या भारतीय लोकांच्या डोक्यामध्ये बिहारविषयी एक वेगळी मानसिकता निर्माण झालेली आहे. पण कलेच्या बाबतीत बिहार बाकी राज्यांपेक्षा थोडे पुढे असल्याचे असल्याचे दिसून येते.

प्रभाकर शरण नावाच्या एका बिहारच्या अभिनेत्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीची भारतापासून कोसो दूर असलेल्या लॅटिन अमेरिकन चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवात केलेली आहे.

आऊटलूक मॅगजीनच्या एका बातमीनुसार, २०१७ च्या फेब्रुवारीमध्ये आलेला सिनेमा  ‘Enredados: La Confusion’ हा लोकांना खूप आवडला आहे.

 

 

बॉलिवूडच्या स्टाईलने तयार करण्यात आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आहे आणि निर्मात्यांना देखील या चित्रपटाने चांगला फायदा मिळवून दिलाय. या चित्रपटाचे हे भरघोस यश पाहता निर्माते मार्च किंवा एप्रिलमध्ये या चित्रपटाला अमेरिकेच्या इतर भागांमध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

बातम्यांनुसार, भारतामध्ये हा चित्रपट हिंदी आणि भोजपुरीमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोस्टा रिकाच्या कमिश्नर जोसे कॅस्ट्रो यांचे म्हणणे आहे कि, कोस्टारिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच कोणतातरी अशा प्रकारचा चित्रपट बनवण्यात आलेलॆ आहे. ज्याने यशाची वेगळीच उंची गाठली आहे.

 

 

अर्थातच आज प्रभाकर एक वेगळ्या उंचीवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. पण त्यांच्या या यशाची गोष्ट देखील एखाद्या चित्रपटासारखीच आहे.

द वायरच्या रिपोर्टनुसार, प्रभाकरला बॉलिवूडमध्ये कोणताही ब्रेक मिळाला नाही, त्यामुळे त्याने अमेरिकेला जाण्याचे पक्के केले. पण तो अमेरिकेला जाण्याऐवजी कोस्टा रिकाला पोहोचला.

तिथे प्रभाकरचे एका स्थानिक मुलीशी प्रेम झाले आणि त्या दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्याने स्वतःचे काम सुरु करण्याचे ठरवले, पण प्रत्येक कामात त्याला अपयश आले.

 

 

२०१० मध्ये प्रभाकर आपल्या पत्नी सोबत परत बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या इच्छेने भारतात परतला. पण तरीही बॉलिवूडने तेव्हाही त्याला साथ दिली नाही.

जेव्हा अपयशाने आणि तणावाने प्रभाकर विचलित झाला, तेव्हा त्याचे लग्न देखील तुटण्याच्या मार्गावर आले होते. आपले लग्न वाचवण्यासाठी प्रभाकर आपल्या पत्नी आणि मुलीसोबत २०१४ मध्ये परत कोस्टा रिकाला परतला.

 

 

प्रभाकरने सांगितले कि, त्याची पत्नी Teresa Rodriguez Cerdas ने त्याच्या स्वप्नाला आपले स्वप्न बनवले आणि शेवटी दोघांनी मिळून जवळपास १.५ मिलयन  डॉलर म्हणजे १० कोटी जमवले आणि चित्रपटासाठी पैसा उभारला.

ही प्रभाकरचीच मेहनत आहे ज्याचा बळावर ‘Enredados: La Confusion’  एक सुपरहिट फिल्म ठरली.

 

 

अशाप्रकारे या बिहारच्या प्रभाकरने आशा न सोडता, आपल्या पत्नीच्या मदतीने स्वत: ला एक अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version