Site icon InMarathi

हॉटेलिंग करून सुद्धा फिट रहायचंय? ह्या टिप्स फॉलो करा!

junk-food-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी

===

“रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी।
यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।”

अर्थ-

आजारी व्यक्ती, नेहमी हिंडणारा, बाहेरचे खाणारा, दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.

 

 

आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण, फास्ट फुड, शीतपेय हे सारं नकळत तुमच्या-माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत.

हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टीकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.

खरं तर हे टाळण अशक्य नाहीये.. पण जरा कठीण वाटते. त्यामुळे बाहेर जेवताना थोडा विचार केलेला बरा..

म्हणूनच आज आपण घराबाहेर जेवताना काय आरोग्यदायी बदल करू शकतो ,यावर चर्चा करू.

 

१) सर्वात महत्वाचे म्हणजे शक्यतो रात्री बाहेर जेवण टाळावे किंवा जेवणानंतर किमान अडीच तासांनी झोपावे.

 

 

२) महिन्यातून फार फार तर २ वेळा बाहेरचे जेवण घ्यावे.

३) वारंवार बाहेर जेवण होत असेल तर किमान व्यायाम नियमित आणि भरपूर करावा.

४) जीवनशैली सक्रिय ठेवावी. शक्य होईल तेवढे चालावे.

५) बाहेर खाल्ल्यावर पुन्हा आरोग्यदायी (Healthy) म्हणून घरी काही खाऊ नये.

 

 

आता बाहेर जेवताना घ्यावयाचा आहार यावर बोलू या.

बाहेर जेवताना भारतात शक्यतो पंजाबी, उत्तर भारतीय प्रकारचे जेवण मागवले जाते. त्याच अनुशंगाने विचार करूया.

१) जेवणाची सुरूवात नेहमीच सलाडने करावी. रशीयन सलाड, ग्रीन सलाड हे छान पर्याय आहेत.

२) तसेच भाजलेले पापडही चांगला पर्याय आहे.

३) भाज्या मागवताना त्या आमटी (करी) प्रकारातील मागवाव्यात. कारण त्यातील तेलाचे प्रमाण मर्यादीत असतेच. शिवाय मसाल्याचा वापर योग्य असल्याने जेवणाचे समाधान मिळते.

 

 

४) जेवणाचे समाधान हा आहारातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण त्यावरच आपल्या पचनाशी निगडीत जीवद्रवांची (enzymes) निर्मीती अवलंबून असते.

५) वजन कमी करताना, भाज्यांचे भुना, टिक्का, तंदुर असे रस्सा नसलेल्या भाज्याही ऊपयुक्त ठरतात.

६) मसाला, पसंदा या प्रकारच्या भाज्या रस्सायुक्त असतात. त्यातील रस्सा हा सुकामेवा (काजु,बदाम) व साय (cream) यापासून बनलेला असतो. त्यामुळे त्या भाज्या अहितकर असतात.

८) मांसाहार सर्व भाजलेल्या (grilled/roasted) /आमटी (curry) स्वरूपात मागवा.

 

 

९) सलाड, स्टार्टर्स आणि त्यानंतर खिचडी/दालचावल हाही चांगला विकल्प ठरेल.

१०) जेवताना जेवढे मागवू ईच्छीता त्याच्या ५०%च सेवन करा.

११) हळूहळू जेवण करा. म्हणजे जे खाता-खाता त्याचा आनंद तर मिळेलच. पण लाळेची योग्य निर्मिती होवून पचन व्यवस्थित होते.

१२) जेवणाचा शेवट ताकाने करावा. (buttermilk/masala chaas)

 

आता संक्षेपात बोलु या बाहेरचा नाश्ता (snacks) आणि शितपेयांबद्दल…

१) बाहेर नाश्ता घेताना शक्य होईल तेवढे कमी तेल, मसाल्याचे, ताजे आणि भारतीय पदार्थ घ्यावेत.

 

 

उदा.ऊपमा, दाक्षिणात्य नाश्ता, सँडविच, (चिज /बटाटा नसलेले) (भाजलेले),

२) शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), हे ऊत्तम पर्याय आहेत.

या सर्व बाबी ध्यानात घेवून जर आपण बाहेर जेवण केले तर कुठल्याही शारीरीक अपायानां सामोरे जावे लागणार नाही. तसेच त्याचा fitness वरही परीणाम होणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version