आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
मानवाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अक्ख्या पृथ्वीवर आपली मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. भूमी-जल-आकाश…सर्वत्र इतर प्राण्यांना हुसकावून आपण आपलं अस्तित्व पक्क केलंय.
मानव ह्या मक्तेदारीची परिसीमा ज्या ठिकाणी गाठतो, त्यातील एक आहे – Point NEMO.
Hrvoje Lukatela नामक एका सर्व्हेयरने 1992 मधे हे बेट शोधून काढलंय.
नाव NEMO का?
माणूस जेव्हा दक्षिण ध्रुवाच्या दिशेने प्रवासाला निघाला तेव्हा अंटार्क्टिकच्या बर्फापासून 1600 किमी लांब एका बेटाचा शोध लागला. इथे आजतागायत कुणी आलंच नव्हतं आणि म्हणूनच ह्याचं नाव NEMO ( लॅटिन मध्ये “निर्जन” ) ठेवण्यात आलं.
नेमकं आहे कुठे?
हे बेट अंटार्क्टिक सोबत डुसी बेट, मोतु नुई बेट आणि महेर बेट ह्या तीन बेटांपासून 1600 किमी समान अंतरावर आहे. त्याचे co-ordinates आहेत 48°52’36″S 123°23’36″W पण एका विशिष्ट वेळेस निरीक्षण केल्यास आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र आणि Nemo बेटामध्ये फक्त 400 किमी अंतर असते, जे पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवापर्यंतच्या अंतरापेक्षा कमीच आहे.
दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या NEMO बेटाच्या जवळ पूर्व आणि पश्चिमेकडे साऊथ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत तर उत्तरेला विषुववृत्त आणि दक्षिणेला दक्षिण ध्रुव आहेत.
त्यांनी ह्या बेटाचं अंतर काढण्यासाठी एका विशिष्ट software ची मदत घेतली. त्या software मध्ये अचूक अंतरासाठी पृथ्वीचा आकार सुद्धा गृहीत धरून गणितं करत असे.
ह्या बेटाची जागा पुढील काही वर्षात बदलण्याची शक्यता खूपच धूसर असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात.
NEMO वर जीवसृष्टी आहे का?
Nemo बेटाजवळ समुद्री पाण्याचा सगळा प्रवाह एकत्र येतो, त्यामुळे बेटावर पाणी stable असून पाण्याचं तापमान 5.8 C असते. पाण्याचा प्रवाह जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या पाण्यातील पोषक द्रव्यांना मज्जाव करतो. जमिनीपासून भरपूर लांब असल्यामुळे हवेमार्फत त्या द्रव्यांचा प्रवेश अशक्यच. पण bacteria तग धरतात. Point Nemo ला जीवसृष्टी खूपच दुर्मिळ आहे तरीही नुकताच 2005 मध्ये Yeti प्रजातीचा खेकडा आढळून आला आहे.
हे बेट आपल्या नेमकं काय उपयोगात येतं?
- युरोपियन, रशियन आणि जपानी अवकाश संस्था ह्या बेटाचा कचराकुंडी म्हणून वापर करत असल्याचे काही वर्षे आधी उघड झाले.
- 2013 मध्ये केलेल्या एका परीक्षणात, South Pacific Gyre म्हणजेच महासागराच्या ‘मोठमोठ्या वाहत्या प्रवाहांमध्ये’ कचऱ्याचे patches आढळून आले आहेत.
- कित्येक निवृत्त किंवा निकामी अंतराळ यानांचे अंत्यविधी ह्या जागी झालेले आहेत. एका अर्थाने सांगायचं तर ही त्यांची स्मशानभुमी असल्यासारखं.
- ही याने ह्या बेटाजवळ व्यवस्थितपणे भाग सुटे करून, दुर्वाहाकांत लपेटून टाकण्यात आली आहेत. यानांचे Fuel Tanks, pressure vessels तिथे carbon fiber ने व्यवस्थित seal करून टाकली जातात.
- आणि ह्यात मासेमारीचं साहित्य, जहाजावरील समुद्राने उडवलेला कचरा, प्लास्टिक इ. सुद्धा इथे पाण्याच्या प्रवाहामुळे बेटाजवळ ओढले जातात.
एकदा फिरून यायला हरकत नाही. पण जाणार कसे? जहाजाने की यानाने?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.