Site icon InMarathi

“पद्मावत” आपल्याकडे रिलीज नसता झाला तरी आपण सहज पाहू शकलो असतो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पद्मावती… माफ करा, पद्मावत. एवढ्या संघर्षानंतर आणि विरोधानंतर अखेर ह्या चित्रपटाला रिलीज डेट मिळाली. आता हा ‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चर्चित चित्रपट आहे. राजस्थानातील पद्मावती राणीच्या जीवनावर जायासी या कवीने लिहिलेल्या ‘पद्मावत’ या काव्यावर या चित्रपटाची पटकथा बेतलेली आहे.

 

indiatimes.com

ह्या चित्रपटाचा वाद एवढा विकोपाला गेला आहे की, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा येथील राज्य सरकारने हा चित्रपट बॅन देखील केला होता. एवढच नाही तर ह्या चित्रपटात राणी पद्मावती यांच्या व्यक्तिमत्वाला मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला होता. तसेच ह्या चित्रपटावरील वादामुळे याची रिलीज डेट देखील पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक चित्रपट चाहते हिरमुसले होते.

 

indiatimes.com

 

पण आता ‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

चार राज्यातील पद्मावतीच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात २५ जानेवारी रोजी ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार आहे.

 

zeenews.india.com

 

ह्या सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणारा विरोध कमी झालेला नाही.

ह्या चित्रपटाला एवढा विरोध होण्यामागे काही कारणे आहेत…

चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजीचे महात्म्य दाखवण्यात आले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्याची चुकीची कृत्येदेखिल अतिशयोक्ती करत दाखवली आहेत असे देखील म्हटले गेले.

 

mensxp.com

 

राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. त्याशिवाय घूमर डान्समुळेही ह्या चित्रपटाला विरोध होत आहे. तसेच ह्या चित्रपटात राजपूत समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे राजपुतांमध्ये घूमर नृत्य पुरुषांसमोर केले जात नाही.

 

bhaskar.com

 

ह्या वादाला सुरवात कशी झाली…

राजपूत करणी सेनेने याचा विरोध केला होता. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये शुटिंगच्यावेळी झाली होती. या चित्रपटात पद्मावती आणि खिलजी यांच्यात काही आक्षेपार्ह सीन दाखवल्याने त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे करणी सेनेचे मत आहे. या विरोधात करणी सेनेने अनेक ठिकाणी आंदोलन करून पुतळ्यांचे दहनही केले.

 

ndtv.com

 

गुजरात बीजेपीने म्हटले की, चित्रपटात क्षत्रिय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलीजपूर्वी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखवायला हवा. रिलीजच्या वेळी तणाव टाळता येईल.

यावर दिग्दर्शक आणि कलाकारांची काय भूमिका आहे तेही पाहू…

‘पद्मावती’ला विरोध झाल्यानंतर डायरेक्टर संजय लीला भंसाळी म्हणाले होते की, या चित्रपटात विरोध करण्यासारखे काहीही नाही.

 

firstpost.com

 

एका कलाकाराने पद्मावतीची रांगोळी काढली होती ती रांगोळीही काही लोकांनी मोडली. त्यानंतर पद्मावतीची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोनने ब्रॉडकास्टींग मिनिस्टर स्मृती ईराणीला टॅग करत, अशा घटनांवर कारवाई व्हावी असे म्हटले होते.

दीपिका पदुकोन, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा हा पद्मावत. तसे तर संजय लीला भन्साळीयांचा प्रत्येक चित्रपट हा नेहेमी चर्चेत असतो, पण यावेळी पद्मावतने हे सर्व रेकॉर्ड तोडले असचं म्हणावं लागेल.

 

bollyworm.com

 

विचार करा जर हा चित्रपट आपल्याकडे किंवा आपल्या राज्यात प्रदर्शित झाला नसता तर…?

अनेकांना नक्कीच वाईट वाटलं असतं. कारण तो चित्रपट बघण्यापेक्षा त्यात असे काय आहे ज्यामुळे एवढा वाद निर्माण झाला हे बघण्याची उत्सुकता अनेकांना आहे.

जर चित्रपट रिलीज झाला नसता – तर काय झालं असतं? अनेकांचा हिरमोड झाला असता का?

उत्तर आहे – नाही ! अश्या रिलीज नं होण्याने फारसा फरक पडला नसता.

 

hindustantimes.com

 

कारण – हे २०१८ आहे. आता एखादा चित्रपट बघण्याकरिता केवळ चित्रपटगृहांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

आज आपल्याकडे नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राईम, हॉट स्टार यांसारखे अनेक व्हिडीओ प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. ज्यावर तुम्ही घर बसल्या हवा तो व्हिडीओ/चित्रपट बघू शकता. यावर तुम्ही नवीन चित्रपट देखील बघू शकता.

जर हे सर्व नसतं, तरी इरॉस नाओ ने स्वतःच लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनेल उघडलं आहे. जिथे तुम्ही पद्मावत अगदी सहजपणे बघू शकता कारण इरॉसनेच या चित्रपटाला प्रोड्युस केले आहे. त्यामुळे काही दिवसातच हा चित्रपट इरॉस वर तुम्हाला बघायला मिळेल.

तसेच इरॉस नाओ चे युट्युब चॅनेल देखील आहे, जिथे तुम्ही काही दिवसांनी १०० रुपयांत पद्मावत बघू शकता. आणि जर हे काही नसतं तरी देखील पायरेसी तर अनेक वर्षांपासून होतच चालली आहे. आज तुम्हाला देशाच्या कुठल्याही भागात एखाद्या सीडी किंवा पेनड्राईव्ह मध्ये हवा तो चित्रपट अगदी थोड्याश्या पैश्यांत बघायला मिळतो.

हेही नसतं जमलं तर टोरंट तर आहेच आपल्याकडे. आता जरी आपल्याकडे हा चित्रपट लागला नसता, तरी जगात कुठे न कुठे तर हा चित्रपट प्रदर्शित झालाच असता ना… तिथूनच तो टोरंट वर तर आपल्याला मिळालाच असता.

 

abplive.in

संजय लीला भन्साळी यांचा मागील चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ देखील खूप चर्चिला गेला होता.

ह्या चित्रपटावरून देखील खूप वाद उफाळला होता. पण यावेळी तर पद्मावत ने सर्वच रेकॉर्ड तोडले. जर पद्मावत विना कुठल्या विरोधा शिवाय प्रदर्शित झाला असता तर त्याच्या ट्रेलरला जास्तीत जास्त २ ते २.५ कोटी व्ह्यूज झाले असते. पण याचा एवढा मोठ्या प्रमाणात विरोध झाला की दोन महिन्यातच ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला ५ कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज झाले आहेत. पण हे तर केवळ युट्युब व्हूज झालेत.

असे अनेक चॅनेल आहेत ज्यांनी आपल्या चॅनेल्सवर ह्या चित्रपटाचा ट्रेलर टाकला आहे. त्यांचे व्ह्यूज वेगळे. त्यासोबतच वायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने देखील ह्या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित केला आहे, ज्याचे १ कोटी हून व्ह्यूज झाले आहेत. आणि आज युट्युबवर ह्या चित्रपटाचा ट्रेलर नंबर १ पोजिशनवर ट्रेंड करतो आहे.

 

bhaskar.com

 

ह्या चित्रपटातील दीपिकाचं घुमर हेगाणं – ज्याला आपत्तीजनक सांगितल्या गेले होते त्याला आतापर्यंत ९ कोटी हून जास्त व्ह्यूज झाले आहेत.

“आता तर हा चित्रपट बघायलाच हवा…” अनेकांच्या तोंडावर हेच वाक्य असणार. कारण ज्याची एवढी चर्चा आली ज्याचा एवढा विरोध झाला. त्या चित्रपटातनेमक असं काय आहे ज्याचा एवढा विरोध झाला, हे तर बघायलाच हवं ना. कदाचित केवळ ह्याच गोष्टीकरिता हा चित्रपट जास्त चालेल.

आता जेव्हा हा चित्रपट रिलीज होणार आहे, तेव्हा अखेर ह्या चित्रपटाचा वाद आणि चित्रपट यात काय साम्य आहे हे समोर येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version