' देशविकासाचे केंद्र असलेली वास्तु ‘या’ मंदिरावरून प्रेरित होऊन उभारण्यात आली आहे – InMarathi

देशविकासाचे केंद्र असलेली वास्तु ‘या’ मंदिरावरून प्रेरित होऊन उभारण्यात आली आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ही कहाणी आहे चंबळची… जिथे अनेक वर्षांपासून डाकू आणि दरोडेखोर यांचीच हुकूमत चालली. पण अखेर ह्या गुंडांचे राज्य संपले आणि चंबळचे काही अविश्वसनीय रहस्य समोर आले.

येथे भगवान शंकरजीचे एक असे ठिकाण सापडले ज्याचा उल्लेख शिव पुराणात देखील करण्यात आला आहे. असा दावा केला जातो की येथे देशातील पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांची भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती.

यापैकी सर्वात जास्त आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे आढळलेले शिव धाम. या शिव धामची इमारत हुबेहूब आपल्या देशाच्या संसद भवनाच्या इमारतीसारखी आहे.

 

chausath yogini temple InMarathi

 

शिव धाम आणि आपल्या संसद भवन यांच्यात नेमका काय संबंध असेल?

प्रत्येक मंदिर हे त्याच्या-त्याच्या परंपरा आणि तेथील मान्यता याकरिता ओळखले जाते. मंदिरांत देवी-देवतांचा निवास असतो ज्यांच्याशी हिंदू धर्मियांची श्रद्धा जुळलेली आहे. तसेच प्रत्येक मंदिराची आपली एक वेगळी संरचना असते.

काही मंदिरांतील कलाकृती एवढी उत्कृष्ट असते की ती कलाकृती बघण्याकरिता दुरदुरून लोक येतात.

 

chausath yogini temple 1 InMarathi

 

आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत. पण शंकराचे हे मंदिर थोडे वेगळे आहे. ह्या मंदिराला जर दुरून बघितले तर ते हुबेहूब आपल्या संसद भवन सारखे दिसते. हे शंकरजींचे मंदिर मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आहे.

भारतीय संसद भवनाशी मिळतेजुळते हे मंदिर ग्वालियर पासून ४० किलोमीटरच्या अंतरावर मितावली येथे आहे.

भगवान शंकराला समर्पित हे मंदिर हुबेहूब भारतीय संसदेसारखे दिसते. या मंदिराचे नाव चौसष्ठ योगिनी मंदिर असे आहे. या मंदिरात १०१ स्तंभ आणि ६४ खोल्या आहेत.

 

64-yogini-temple InMarathi

 

येथील प्रत्येक स्तंभावर शिवलिंग आणि त्यासोबत देवी योगिनीची मूर्ती होती. म्हणून या मंदिराचे नाव चौसष्ठ योगिनी असे पडले. पण आता या मूर्त्यांना दिल्ली येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

जवळजवळ १२०० वर्षांपूर्वी ९ व्या शतकात प्रतिहार वंशाच्या राजांनी या मंदिराची निर्मिती केली होती.

या मंदिरात १०१ स्तंभ आणि ६४ खोल्या आहेत. संसद भवन हे ६ एकराच्या जागेत बनविण्यात आले आहे. ज्यात १२ जरवाजे २७ फुट उंच १४४ स्तंभ एका रांगेत बनविण्यात आले आहे. ज्यांचा व्यास ५६० फुटाचा आणि घेर ५३३ मीटर आहे. संसद बनविण्यासाठी १९२७ साली ८३ लाख रुपयांचा खर्च आला होता.

 

64-yogini-temple 1 InMarathi

 

या शिव मंदिरात राणी दुर्गावती यांचा मंदिर यंत्र संबंधित एक शिलाखेख देखील आढळतो. या मंदिरात एक सुरुंग देखील आहे जो चौसष्ठ योगिनी मंदिराला गोंड राणी दुर्गावती हिच्या महालाशी जोडतो. हे एक अतिशय भव्य असे मंदिर आहे.

 

chousashtha yogini temple-inmarathi02

 

या मंदिराच्या आत भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची वैवाहिक वेशभूषेत नंदीवर बसलेली प्रतिमा स्थापित आहे. ह्या मंदिराच्या चारी बाजूंनी १० फुट उंच दगडांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत.

प्रवेश करण्याकरिता केवळ एक छोटसं दार बनविण्यात आले आहे. ह्या भिंतींच्या मध्ये एक विशाल प्रांगण आहे. ज्याच्या मधोमध २-३ फुट उंच आणि ८०-१०० फुट लांब एक मंच बांधण्यात आला आहे.

मंदिरातील सर्वात शेवटच्या खोलीत शिव-पार्वतीची प्रतिमा आहे. या समोर एक मोठा ओटा आहे. त्यासमोर एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. जिथे लोकं ह्या शिवलिंगाची पूजा करतात.

 

64-yogini-temple 2 InMarathi

 

हे मंदिर १००० वर्ष जुने आहे. ह्या मंदिराला तांत्रिकांचे विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जाते. तंत्रमंत्र यात विश्वास ठेवणारे लोक दिवाळी, होळी, दसरा आणि शिवरात्री वेळी सिद्धी प्राप्ती करिता येथे विशेष साधना करण्यासाठी येत असत असे मानले जाते. तांत्रिक कर्मकांडासाठी येथे लोक मध्यरात्री येतात.

या तांत्रिक मंदिरात भारतीय कमी आणि विदेशी पर्यटक जास्त येतात. विदेशी लोकांना नेहेमी येथील तांत्रिकांसोबत पूजा करताना पाहिले गेले आहे.

 

64-yogini-temple 3 InMarathi

 

भारतात चौसष्ठ योगिनी मंदिरं आहेत. यापैकी दोन मध्य प्रदेशातच आहेत तर दोन आंध्र प्रदेशात आहेत. योगाभ्यास करण्याऱ्या स्त्री ला योगिनी म्हटल्या जाते.

पण तांत्रिक कर्मकांडात योगिनी देवी म्हणून पूजिली जाते. देवी योगिनीला काली मातेचा अवतार मानले जाते. घोर नावाच्या राक्षसा सोबत युद्ध करताना देवी कालीने हा अवतार घेतला होता असे देखील मानले जाते.

 

kali InMarathi

 

ही झाली या मंदिराची ऐतिहासिक कथा. पण विशेष बाब ही की भारताच्या संसदेचे स्थापत्य या मंदिराशी मिळतेजुळते आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?