Site icon InMarathi

रशियाचे हे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला जेरीस आणलं

rassia inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुप्तहेर हा त्यांच्या देशाला दुसऱ्या देशाची अचूक आणि पुरेपूर माहिती पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो.

शत्रू देशांमध्ये शोधकार्य करून हे गुप्तहेर त्या देशाची प्रत्येक गुप्त बातमी आपल्या देशाला पुरवण्याचे काम करतो.

असेच काहीसे रशियाने देखील अमेरिकेच्या बाबतीत केले होते. रशियाने आपले गुप्तहेर अमेरिकेत कितीतरी वेळ सक्रियपणे माहिती  गोळा करण्याचे काम करत होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९३० च्या दशकांपासून हे गुप्तहेर अमेरिकेत अमेरिकेबद्दल आणि त्यांच्या मित्र देशांबद्दल २०१६ पर्यंत माहिती मिळवत होते. पण २०१६ ला राष्ट्रध्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान इ – मेल हॅक झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

आज आपण काही उल्लेखनीय रशियन हेरगिरी प्रकरणे पाहणार आहोत, जी १९३० मध्ये ‘केंब्रिज स्पाय रिंग’ स्थापनेनंतर झालेली आहेत. यामध्ये रशियाच्या गुप्तहेरांनी अमेरिकेबद्दलची खूप महत्त्वाची माहिती रशियाला पुरवली आहे.

किम फिल्बी आणि केम्ब्रिज स्पाय रींग

१९३० च्या सुमारास हॅरोल्ड किम फिल्बी हे केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी असताना सेव्हियत इंटिलिजन्समध्ये भरती झाले.

 फिल्बी यांनी रशियासाठी कितीतरी दशके गुप्तहेराचे काम केले.

१९३० च्या उत्तरार्धात पत्रकार म्हणून काम केल्यांनतर त्यांनी द्वितीय महायुद्धाच्या सुरुवातीला ब्रिटनची गुप्तचर संघटना MI ६ मध्ये प्रवेश करण्यासाठी कौटुंबिक नातेसंबंधांचा वापर केला.

 

dailymail.co.uk

 

महायुद्धाच्या समाप्तीनंतर देखील फिल्बीने सेव्हियत संघासाठी हेरगिरी करणे चालू ठेवले आणि त्यांना एमआय ६ मधील काही गहन गुप्त गोष्टी समजल्या.

त्यांच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या अमेरिकन स्पायमास्टर जेम्स अँग्लॉटनशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीमुळे १९४० च्या अखेरीस अमेरिकेच्या इंटेलिजन्सबद्दल त्याला अनेक रहस्ये समजली. ती सर्वच्या सर्व इत्यंभूत माहिती त्यांनी रशियाला पुरवली.

फिल्बीची कारकीर्द १९५१ मध्ये समाप्त झाली,

जेव्हा त्यांचे दोन घनिष्ट मित्र सोव्हियत युनियनकडून दोषी ठरवण्यात आले, तेव्हा त्यांचा तिसरा मित्र म्हणून त्यांच्यावर संशय घेतला जात आहे असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

आश्चर्याची बाब म्हणजे, तो नंतर एमआय ६  मध्ये सेव्हियत संघाचा ऍक्टीव्ह एजंट म्हणून सामील झाला. १९६३ मध्ये शेवटी त्याने सेव्हियत युनियन सोडली.

रोझेनबर्ग स्पाय केस

न्यूयॉर्क सिटी येथील एथेल आणि ज्युलियस या विवाहित जोडप्यावर १९५१ मध्ये सोव्हियेत संघासाठी गुप्तहेराचे काम करण्याचे आरोप ठेवण्यात आले.

 

cbsistatic.com

 

फेडरलच्या फिर्यादीने असा दावा केला होता की, रोझेनबर्ग जोडपे हे अणुबॉम्ब विषयीची काही गुप्त माहिती सेव्हियत संघाला पुरवत आहे. या दोघांना अटक केल्यामुळे प्रचंड विवाद निर्माण झाले होते.

१९५३ मध्ये सत्य काढून घेण्यासाठी या रोझेनबर्ग जोडप्याला इलेक्ट्रिक चेअरवर बसवण्यात आले. ते दोषी आहे कि नाहीत याबद्दलचा वाद कितीतरी दशके चालू राहिला.

१९९० च्या दशकामध्ये सेव्हियत संघाकडून याबद्दल काही माहिती मिळाली.

या माहितीवरुन हे समजले की, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्युलियस रोझेनबर्ग रशियांला येथील गुप्त माहिती पुरवत होती.

पण एथेल रोझेनबर्ग हा निष्पाप होता कि दोषी होता, हे अद्यापही समजले नाही.

कर्नल रूडोल्फ अॅबेल

केजीबी अधिकारी कर्नल रूडोल्फ अॅबेल यांच्या अटकेची बातमी ही १९५० च्या उत्तरार्धात आलेली एक सनसनाटी बातमी होती. रूडोल्फ अॅबेल हे बऱ्याच वर्षापासून ब्रुकलीनमध्ये राहत होते आणि एक लहान फोटोग्राफी स्टुडिओ चालवत होते.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना ते परदेशामधून अमेरिकेत आपले जीवन व्यथित करण्यासाठी आलेले सामान्य गृहस्थ वाटत होते.

एफबीआयच्या मते, रूडोल्फ अॅबेल केवळ एक रशियाचे सामान्य गुप्तहेर नव्हते, तर त्यांनी युद्धाच्या वेळी रशियाला मदत देखील केली होती.

फेडने सांगितले की, त्यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांना एक लहान इलेक्ट्रिक रेडीओ मिळाला, ज्याद्वारे ते मॉस्कोसोबत संवाद साधू शकत होते.

 

 

शीत युद्धाच्या दम्यान एक घटना घडली. ज्यामध्ये त्यांनी एका पेपर विक्रेत्या मुलाला पेपर घेण्यासाठी निकल (तत्कालीन युरोपियन चलनी नाणे) दिले. ज्याच्या आतल्या पोकळ भागामध्ये काही माहिती असलेली मायक्रोफिल्म होती.

१४ वर्षीय त्या पेपर विक्रेत्याने ते पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलिसांनी संशयित म्हणून त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

ऑक्टोबर १९५७ मध्ये कर्नल रूडोल्फ अॅबेल हे दोषी असल्याचे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आले. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

पण काही गुप्तचर अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद  मांडला की, रूडोल्फ अॅबेलला फाशीची शिक्षा न देता कारागृहात ठेवले पाहिजे.

जेणेकरून आपण मॉस्कोशी त्यांच्या बदल्यात रशियाने पकडलेल्या अमेरिकन गुप्तहेराचा व्यवहार करू शकतो. फेब्रुवारी १९६२ मध्ये अमेरिकेच्या यू २ फ्रान्सिस गॅरी पॉवर्स यांच्या बदल्यात रूडोल्फ अॅबेल यांना रशियाकडे परत देण्यात आले.

अल्ड्रिच एमम्स

अल्ड्रिच एमम्स यांनी सीआयए साठी जवळपास ३० वर्ष काम केले होते.

पण जेव्हा १९९४ मध्ये अमेरिकन गुप्तचर संघटनेला समजले की, ते रशियाने अमेरिकेत हेरीगिरीसाठी पाठवलेले गुप्तहेर आहेत, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

अल्ड्रिच एमम्सने सोव्हियत संघाला अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्या सर्व एजंटची नावे दिली होती. या माहितीच्या आधारे रशियाने त्या अमेरिकन एजंटना फाशीची शिक्षा दिली होती.

 

smithsonianmag.com

 

त्यांनी हे सर्व आपल्या विचारधारेसाठी नाही तर पैशासाठी केले होते.

रशियन लोकांनी त्यांना एका दशकापासून जवळपास ४ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मोबदला दिला होता. अशी पैशासाठी हेरगिरी करणारे खूपजण यानंतर समोर आले.

२००१ मध्ये रॉबर्ट हॅन्सनचे एक प्रकरण लोकंसमोर आले होते. तो जवळपास एक दशक अमेरिकेत एफबीआय एजंट म्हणून काम करत होता. पुढील तपासात तो एक गुप्तहेर असण्ल्याचे निष्पन्न झाले.

अशा अनेक रशियन गुप्तहेरांनी अमेरिकेत खूप काळ हेरगिरी केली, पण अमेरिका यांना लवकर ओळखू शकले नाही. त्यांनी रशियाला अमेरिकेबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version