हा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आपल्या भारतातील नेते त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात. अनेकदा तर आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ देखील येते. त्यातूनही हे राजकीय नेते एकतर वाचतात किंवा त्यांनी केलेले वक्तव्य फिरवण्याचा प्रयत्न करतात.
पण आज आम्ही तुम्हाला एका देशाच्या अशा एका राष्ट्रपतीबद्दल सांगणार आहोत, जो त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो दारू आणि सिगरेट न पिणाऱ्या लोकांना मारू इच्छितो. पण त्याच्या या अशा काही वादग्रस्त वक्तव्यांमुळेच तो अधिक लोकप्रिय आहे.
सध्या चेक प्रजासत्ताक या युरोपीय देशात निवडणुकीचे वातावरण आहे. या निवडणुकीमध्ये ७३ वर्षाचे राष्ट्रपती मिलोश झेमान यांच्या लोकप्रियतेची राजनैतिक कसोटी लागणार आहे. होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मिलोश झेमान यांना जनमत मिळेल, असे वाटत आहे.
मिलोश झेमान हे बऱ्याच काळापासून आपल्या सर्व वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. त्यांच्या राजकारणाने देशाला त्यांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक अशा दोन भागांमध्ये विभागले आहे.
मिलोश झेमान यांची वादग्रस्त वक्तव्ये
एकदा मिलोश झेमान यांनी म्हटले होते की, ते सर्व शाकाहारी आणि दारु न पिणाऱ्या लोकांना मारू इच्छितात. त्यांनी पत्रकार आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या समूहाच्या विरोधात युद्धाची घोषणा करत म्हटले होते की,
“अशा लोकांबरोबर ते मध्ययुगीन काळाप्रमाणे वागणार. त्यांना जाळणार, त्यांच्यावर मूत्र विसर्जन करणार आणि त्यांच्या जखमांवर मीठ चोळणार.”
सांप्रदायिक वक्तव्य
मिलोश झेमान हे मार्च २०१३ पासून सत्तेत आहेत. ते १९९० पासून चेक सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आहेत. मिलोश जेमन ज्या राजनैतिक पायावर आता उभे आहेत, तो परदेशी प्रवाश्यांच्या विरोधातील आक्रमक वक्तव्ये आणि अल्पसंख्याक व निर्वासित यांच्या केलेल्या उपेक्षेतून तयार झालेला आहे.
मिलोश झेमान हे नेहमी आपल्या देशाला या गोष्टीची जाणीव करून देत असतात की,
आपला देश जिहादी हल्ल्यांचा शिकार होऊ शकतो. चेक प्रजासत्ताक राज्याची एकूण लोकसंख्या ही एक कोटी पाच लाख आहे. यातील जवळपास पस्तीसशे लोक मुसलमान आहेत. २०१५ या वर्षामध्ये त्यांनी साऊथ मोराव्हियाच्या लोकांना चेतावणी दिली कि, त्यांनी स्थलांतरीत मुसलमानांच्या हल्ल्यासाठी तयार राहावे.
मुस्लिम जगतापासून ‘धोका’ आणि मुस्लिम मूलतत्ववादाला विरोध केल्यानंतर मिळणारी मते हा राष्ट्रपती म्हणून मिलोश जेमन यांच्या कार्यकाळातील मुख्य आधार राहिलेला आहे. मुस्लिम जनतेला ते ‘आधुनिक सभ्यतेचे विरोधक’ असे म्हणतात.
मिलोश झेमान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
पहिल्यांदाच मतदान करायला जाणार असलेल्या एका स्त्रीचे म्हणणे आहे की, ती आपल्या देशाच्या भविष्यकालीन नीतीत काही बदल पाहू इच्छिते. ती म्हणते की,
” मला वाटते की, राष्ट्रपती मिलोश झेमान यांनी ज्याप्रकारे देशाचे प्रतिनिधित्व करायला पाहिजे, त्याप्रकारे ते करत नाही. कितीतरी वेळा ते राष्ट्रपती पदाला साजेसे वागत नाहीत.”
ऑक्टोबर २०१७ मध्ये काही आंदोलकांनी राष्ट्रपती मिलोश झेमान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अशा प्रकारे हा चेक गणराज्याचा राष्ट्रपती त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे, तरीदेखील त्याचे चाहते या देशात खूप आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.