' ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न… – InMarathi

‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लग्न दोन पद्धतींनी होते. अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेज. यापैकी सर्वमान्य म्हणजे अरेंज्ड मॅरेज! यात मुला मुलीचे लग्नाचे वय झाले की घरची मंडळी त्यांच्यासाठी योग्य साथीदार शोधण्याचा कार्यक्रम सुरु करतात. एखाद्या मुलीचं/मुलाचं स्थळ आलं, की लगेच डेट फिक्स करून मुलीच्या घरी बघण्याच्या कार्यक्रमाचा प्रपंच आखला जातो.

मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजे काही मोठ्या इवेंट पेक्षा कमी नसतो. घरातील चादरी – पडदे कोणत्या रंगाचे असावेत इथपासून ते कुठल्या कपात कुठल्या ट्रेमध्ये पाहुण्यांना चहा द्यायचा इथपर्यंत सर्व ठरवले जाते.

मुलाकडचे लोक मुलीला पाहण्यासाठी येतात. चहा घेउन मुलीला बोलावले जाते, मुला-मुलीची नीट ओळख करवून दिली जाते आणि त्यानंतर सुरु होतो प्रश्नोत्तरांचा तास. ही प्रश्नोत्तरे म्हणजे काही आयपीएस इंटरव्ह्यू पेक्षा कमी नसतात.

 

Marriage-Anniversary-inmarathi
3.bp.blogspot.com

काही तर अशी देखील असतात ज्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. त्यावेळी खरच प्रश्न विचारणाऱ्याच्या बुद्धीची कीव येते.

अरेंज्ड मॅरेजची पहिली पायरी खरच खूप कठीण असते. विशेषतः मुलींसाठी. कठीण का, हे त्यांना विचारा ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे. कधी कधी तर मुलींना असे काही प्रश्न विचारले जातात ज्यावरून हे कळून येते की आपल्या संस्कृतीला पुरुष प्रधान संस्कृती का म्हणतात.

कारण येथे पुरुष कसाही असला तरी तो “सर्वमान्य” असतो. का? तर तो “पुरुष” आहे. पण स्त्रीच्या बाबतीत असे घडत नाही, तिला तर प्रत्येक बाबतीत परीक्षा द्यावी लागते. का? — कारण ती “स्त्री” असते…!

आम्ही आज आपल्याला असे काही विचित्र प्रश्न सांगणार आहोत, जे अरेंज्ड मॅरेज करताना मुलींना बघायला आलेल्या पाहुण्यांकडून नेहमी विचारले जातात.

ह्या प्रश्नांवरून आपल्याकडील लग्न ठरवण्याची पद्धत मुलींसाठी किती कठीण, अपमानास्पद, हेटाळणी करणारी आहे ह्याची कल्पना येते.

१) तुला देवाची पूजा करता येते ना?

 

Image result for indian girls gif

 

२) तुला चांगला स्वयंपाक करता येतो ना? आमच्या मुलाला “खायला” खूप आवडतं…!

 

9 Deepika Padukone

हे ही वाचा – नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने अजिबात दुर्लक्षित करू नयेत अशा ५ गोष्टी

 

३) तू लग्नानंतर लठ्ठ तर नाही ना होणार?

sai-inmarathi

 

 

४) तुझं शिवणक्लास झालं असेल ना, ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे केला आहे का?

 

Rich girl problems

 

५) जरा इथून इथपर्यंत चालून दाखवशील का?

 

Related image

 

६) उद्या आम्ही मुलीला दिवसा बघायला येऊ.

 

Rich Girl Problems

हे ही वाचा – जपानमधील हा अजब लग्नप्रकार तुम्हाला माहित आहे का?

 

७) आम्हाला मुलीचा एक असा फोटो द्या ज्यात ती “उभी” असेल.

 

Related image

 

८) लग्नानंतर केस तर नाही ना कापणार?

 

 

९) तुझे किती फेसबुक फ्रेंड्स आहेत?

 

Related image

 

१०) रोज अंघोळ करते ना?

 

Image result for indian girls gif

 

११) लग्नानंतर “पण” नोकरी करणार का?

 

Rich girl problems

 

१२) तुझी उंची किती आहे?

उत्तर – ५.१”

अच्छा म्हणजे ५ पूर्ण आहे ना?

 

Image result for indian girls gif

 

१३) साडी जरा घुडघ्यापर्यंत उचलून दाखव?

 

Image result for indian girls gif

 

तर हे आहेत अरेंज्ड मॅरेज ठरवताना विचारले जाणारे काही विचित्र प्रश्न. काही मुलींनी यापेक्षा विचित्र प्रश्नांचाही अनुभव घेतला आहेत. पण हे प्रश्न त्यातल्या त्यात सामान्य.

तसं पहाता ह्यातील काही प्रश्न वाईट किंवा चुकीचे वाटत नाहीत. पण हे प्रश्न “फक्त मुलींनाच” विचारले जातात, ह्या “अपेक्षा” मुलांकडून केल्या जात नाहीत. हा विचार करता “मुली” अजूनही दुय्यमच आहेत, ह्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.

हे ही वाचा – मुलींनो- लग्न करण्याआधी या “१२” महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?