Site icon InMarathi

बनारसी साडीच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारा मुघल बादशहा!

Banarasi saree Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साडी! स्त्रीच्या सौंदर्याला चार चांद लावणारं अस्सल भारतीय वस्त्र!

भारताच्या प्रत्येक भागात साड्यांची नक्षी, ती नेसण्याची पद्धत निराळी. आणि प्रत्येक भागाचा स्वतःचा असा खास लोकप्रिय प्रकार पाहायला मिळतो.

आधुनिकता आली तसे स्त्रियांचे राहणीमान बदलले. या बदलत्या युगातही साडीने आपली क्रेझ टिकवून ठेवली.

 

 

आजही कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभाला जाण्यासाठी लग्न झालेल्या स्त्रिया आणि कधी-कधी तरुण मुलीदेखील साडी आवडीने नेसतात.

त्यातच बहुतेक स्त्रियांना बनारसी साडी खूप आवडीची असते. स्त्रियांच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये ही बनारसी साडी तुम्हाला हमखास पाहायला मिळेल.

 

 

राजा-महाराजांपासून सामान्य माणसांपर्यंत, मुघलांपासून इंग्रजांपर्यंत असे कुणीही नाही जे या बनारसी साडीचे चाहते नाहीत.

इंग्रजांनी या कलेचे नुकसान देखील तेवढेच केले होते. इंग्रजांनी आपल्या मिल आणि फॅक्ट्री वाढवण्यासाठी कपड्यांच्या कितीतरी जाती मिटवल्या.

नाहीतर एक काळ असा होता, जेव्हा कपडे आणि इतर काही गोष्टींत आपल्या कलाकारांचा जगामध्ये कुणीही हात धरू शकत नव्हते.

शुद्ध बनारसी साडी कितीतरी पिढ्यांपर्यंत जशीच्या तशी राहते. जास्त काळ टिकून राहावी या उद्देशाने बनारसी साडी विणण्याची प्रक्रिया ठरवली गेली आहे.

पहिल्या प्रथम सिल्कला गडद रंगांमध्ये बुडवले जाते. त्यांनतर त्याला विणून त्यावर एकास एक कलाकारी केल्या जातात.

खूप छानछान डिझाइन यावर बनवल्या जातात. कितीतरी आठवड्याच्या किंवा महिन्यांच्या मेहनतीनंतर एक साडी पूर्ण केली जाते.

या साडीला कितीतरी पिढ्यांचा वारसा लाभलेला आहे. शुद्ध बनारसी साडी ही पिढ्यान पिढ्या  जशीच्या तशी राहते, ती खराब होत नाही.

 

wp.com

पण तुम्हाला हे माहित आहे का? की बनारसी साडी प्रसिद्ध होण्यामागे एका मुस्लिम शासकाचा खूप मोलाचा वाटा आहे.

वाराणसीमध्ये सुरवातीपासूनच विणकाम खूप मोठया प्रमाणावर होते. सिल्कचे काम येथे कधीपासून सुरु झाले याचे अजूनपर्यंत ठोस असे पुरावे नाहीत. पण हा वारसा खूप जुना आहे. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे नेला जात असे.

सुरुवातीला विणकऱ्याचा मुलगा विणकर. रंगारीचा मुलगा रंगारी. असा पिढ्यानपिढ्या एकच व्यवसाय पुढे नेला जात असे.

या बनारसी साड्यांना खरी प्रसिद्धी ही मुघल शासक अकबराच्या काळामध्ये मिळाली. मुघल बादशाह अकबराला कलेची फार आवड होती. चित्रकार असो, संगीत असो किंवा विणकर असो. सर्वच त्याला खूप पसंत होते.

मुघल बादशाह अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर यांच्या शासन काळामध्ये या कला खूप वाढत गेल्या. या दोन्ही मुस्लिम शासकांनी या कलांना पुढे नेण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

 

अकबर हा बनारसी सिल्क आणि त्याच्यावर बनवल्या जाणाऱ्या कलाकुसरीचा खूप मोठा चाहता होता. त्याच्या हरममधील स्त्रियादेखील ह्या साड्या नेसत असत.

कदाचित या राजा महाराजांमुळेच बनारसी साड्यांवर सोन्या – चांदीच्या एकदम बारीक धाग्यांनी काम एवढ्या मोठ्या स्तरावर सुरु झाले. नाहीतर सामान्य माणूस एवढी महागडी गोष्ट खरेदी करू शकत नव्हता.

सुरुवातीला चीनमधून रेशीम मागवले जाते असे. पण काही काळाने दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये हे रेशीम बनवले जाऊ लागले आणि त्याचा वापर कापड बनवण्यासाठी करण्यात येऊ लागला.

 

 

या साड्यांवरची कलाकुसर असाच कुणीही करू शकत नाही. त्यासाठी एका कुशल कारागिराचीच गरज असते.

डिझाइन साडीवर कशी कोरायची आहे, हे फक्त अनुभवी कारागिरालाच माहित असते. कितीतरी प्रकारच्या डिझाइन या साड्यांच्या असतात.

या डिझाइनना सुरुवातीला ग्राफ पेपरवर उतरवले जाते आणि त्यानंतर नक्षी पत्र्यावर उतरवली जाते. अशा शेकडो नक्षी पत्र्यांची यासाठी गरज लागते. पूर्ण डिझाइन अशाप्रकारेच तयार केली जाते.

बनारसी साड्यांवर तुम्हाला मुघल पद्धतीच्या नक्षीची छाप पाहण्यास मिळेल. या साड्यांच्या डिझाइनमध्ये तुम्हाला इस्लामी कलाकुसरीत असतात तशी फुले-पाने पाहण्यास मिळेतील.

 

 

या साड्यांवर जे नेटचे काम होते, ते मुघलांपासूनच प्रभावित आहे. यामध्ये खूप वेगवेगळ्या काळातील शासकांचा आणि संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो.

इंग्रजांचा देखील यावर प्रभाव होता. जेव्हा जसा काळ आला, तेव्हा त्या पद्धतीने या डिझाइनमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

 

 

आताच्या काळामध्ये चार प्रकारच्या बनारसी साड्या आपल्याला पाहायला मिळतात.

पहिला प्रकार शुद्ध रेशीम. याला कॉटन देखील म्हणतात. दुसरा प्रकार कोरा म्हणजेच ऑरगेंजा यावर जरी आणि रेशमाच्या धाग्यांचे काम असते. तिसरा प्रकार जॉर्जेट आणि चौथा शात्तीर.

यामध्ये सर्वात प्रसिद्ध शुद्ध रेशीम हाच प्रकार आहे. या साड्यांच्या डिझाइनमध्ये देखील आपल्याला विविधता पाहायला मिळते आणि त्यातील काही डिझाइन खूप प्रसिद्ध आहेत.

बनारसी साड्यांना कॉपीराइट मिळाला आहे.

येथील साड्यांना GI टॅग मिळाला आहे, म्हणजेच जिओग्राफ़िकल इंडिकेशन. म्हणजेच एका खास भागामध्ये तयार झालेल्या साड्यांना बनारसी साड्या म्हटले जाईल. यामध्ये उत्तरप्रदेशचे सहा जिल्हे आहेत.

वाराणसी, मिर्जापूर, चांदौली, जौनपुर आणि आजमगढ या जिल्ह्यांमध्ये तयार झालेल्या बनारसी साड्यांनाच बनारसी साड्या म्हटले जाण्याचा विशेष दर्जा दिला गेला आहे.

यावरून असे समजते की, मुघल बादशाहने या बनारसी साडीला आणि विणकलेला प्रसिद्ध बनवण्यासाठी महत्तवपूर्ण कार्य केले आहे. त्याच्यामुळेच या साडीला एवढा मान मिळू शकला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version