Site icon InMarathi

अँड्रॉइड फोन्समध्ये नेहमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय…..

man mad at phone inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

आज स्मार्टफोन हे जवळपास सगळ्यांकडेच असतात. मोबाईल हा आजच्या पिढीच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. माणसाच्या मूलभूत गरजा पहिले अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन होत्या.

पण आता त्यामध्ये मोबाईल आणि इंटरनेट यांचा देखील समावेश झाला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. अँड्रॉइड आल्यापासून तर स्मार्टफोन जगतामध्ये एक वेगळाच बदल झालेला आपल्याला दिसून येतो.

पण अँड्राइड युजर्सना नेहमीच सॉफ्टवेअरशी संबंधित असलेल्या काही समस्या उद्भवतात. कितीतरी वेळा इंटरनेट कनेक्ट होत नाही किंवा काही अॅप्स डाऊनलोड होत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला या अँड्रॉइड वापरताना येणारे काही कॉमन प्रॉब्लेम्स आणि त्यांच्यावर करण्यात येणारे उपाय, यांच्याबद्दल सांगणार आहोत.

१. फोन स्टार्ट न होणे.

अँड्रॉइड क्रॅश होणे किंवा फोन स्टार्ट न होणे, अशाप्रकारची समस्या अनेकदा अँड्रॉइड वापरकर्त्यांना येते. अशावेळी वापरकर्त्याला फोन रिबूट करावा लागतो किंवा त्याची सर्व्हिसिंग करावी लागते.

अशा वेळी जर फोनमधील काही डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला त्वरित त्याला ऑन करायचे असल्यास, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करू शकता.

 

popsci.com

 

 

२. गुगल प्ले स्लो चालणे.

कितीतरी वेळा अँड्रॉइड वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. असे यामुळे होते, कारण गुगल प्ले स्टोरमध्ये कॅशे मेमरी जास्त असते. त्यामुळे वेळोवेळी ही  मेमरी क्लियर करणे गरजेचे असते.

त्यासाठी Setting>Apps>All>Google Play Services>Clear Cache जाऊन मेमरी क्लियर करावी. मेमरी क्लियर केल्यानंतर मोबाईल रिस्टार्ट करावा.

 

wp.com

 

काय असते कॅशे मेमरी :

ही डिव्हाइस मेमरीमधील एक अशी जागा असते, जिथे सध्याच एक्सेस केलेला डेटा सहज रिस्ट्रिव्ह केला जाऊ शकतो. वापरकर्ते आपल्या डिव्हाइसवर जे काम करतात, त्याची कॉपी कॅशे मेमरीमध्ये देखील सेव्ह राहते. मुख्य मेमरीच्या ऐवजी कॅशेमेमरीतून प्रोसेसर डेटा घेतो.

 

३. अॅप्स डाऊनलोड न होणे 

अँड्रॉइड वापरकर्त्यांची ही सर्वात कॉमन समस्या आहे. असे दोन कारणांमुळे होते. पहिले कारण म्हणजे तुमच्या फोनमध्ये पुरेशी इंटरनल मेमरी नसणे हे आहे आणि दुसरे म्हणजे तुमच्या गुगल प्ले स्टोरची मेमरी खूप जास्त झाली आहे.

जरा पहिल्या कारणामुळे असे होत असल्यास तुम्ही इंटरनल मेमरीमधून अॅप्सचा डेटा मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करा. जर अॅप्स ट्रान्सफर होत नसतील, तर हेव्ही अॅप्सची कॅशेमेमरी क्लियर करावी.

यासाठी Settings> Apps> All> App Cache Clear या स्टेप्सचा वापर करावा.

 

rishabhsoft.com

 

जर याचे कारण दुसरे असेल तर, तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन गुगल प्ले स्टोरची कॅशेमेमरी आणि हिस्ट्री डिलीट करावी लागेल.

यासाठी तुम्हाला Settings> Apps> All> Google Play>Cache Clear या स्टेप्सचा वापर करावा लागेल.

याचबरोबर गुगल प्ले सेटिंग्सवर जाऊन हिस्ट्री डिलीट करावी आणि फोन रिस्टार्ट करावा.

 

४. स्मार्टफोन चार्जिंग

कितीतरी वेळा फोन एकदाच चार्ज होत नाही. अशावेळी चार्जरचे पोर्ट लूज होण्याबरोबरच चार्जिंग पोर्टमध्ये देखील समस्या असू शकते. चार्जिंग पोर्टमध्ये कचरा जमा झाल्यामुळे कधी – कधी चार्जिंग होत नाही.

कितीतरी वेळा हेडफोन जॅक किंवा यूएसबी पोर्टमध्ये कचरा जमा झाल्याने, खूपवेळा ते योग्यप्रकारे काम करत नाही. अशावेळी हेडफोन जॅक किंवा यूएसबी पोर्ट टूथपिकने साफ केले जाऊ शकतात. टूथपिकच्या टोकावर कापूस लावा आणि जमलेला कचरा साफ करा.

 

extremetech.com

 

यासाठी अमोनिया क्लिनर, नेल पॉलिश रिमूवर यांचा देखील अनेकदा वापर केला जातो, पण याचा वापर यूएसबी पोर्ट स्वच्छ करण्यासाठी शक्यतो करू नये, कारण असे केल्याने हे क्लिनर फोनमध्ये जाऊन तुमचा फोन खराब होण्याची शक्यता आहे.

असे करूनही चार्जिंग होत नसेल तर चार्जरची यूएसबी केबल बदलावी, कारण कधी – कधी ही केबल खराब असल्यामुळे देखील फोनला व्यवस्थित चार्जिंग होत नाही.

५. ब्लू टूथ कनेक्ट  न होणे.

बऱ्याचदा स्मार्टफोनमध्ये हे दिसून येते कि, यामध्ये ब्लू टूथचा वापर करताना वापरकर्त्यांना समस्या येतात. ब्लू टूथ कनेक्ट  होत नाही किंवा बाकी डिव्हाईसना सर्च करण्यास असमर्थ असतो. आपल्यातील बहुतेकांना ही समस्या नक्कीच आली असेल.

हा प्रोब्लेम फिक्स करण्याचा एक मार्ग असा की, फोन पूर्णपणे स्विच ऑफ करून परत ऑन करा. त्यामुळे कनेक्टिव्हीटी फिचर योग्यप्रकारे काम करेल. असे करूनही एखादी समस्या येत असल्यास, ब्लू टूथची कॅशे मेमरी क्लियर करा.

 

techlicious.com

 

यासाठी Settings > Apps > All Apps > Select Bluetooth Share > Clear Cache/ Clear Data या स्टेप्सचा वापर करा.

एकदा डेटा क्लियर केल्यांनतर डिव्हाइस योग्यप्रकारे काम करायला लागेल. जर असे करूनही काही समस्या येत असल्यास डिव्हाइसची सेटिंग चेक करा. कधी – कधी डिव्हाइस व्हिजिबल नसते. त्याचबरोबर ब्लू टूथची इतर सेटिंग देखील चेकी करावी.

 

६. फोन लवकर  डिस्चार्ज होणे.

फोन लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या देखील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना खूप वेळा येते. तुमचा फोन लवकर डिस्चार्ज होण्यामागे तुमचे बॅकग्राउंड  अॅप्स आणि कनेक्टिव्हीटी फिचर जबाबदार असू शकतात.

 

gadgetsloud.com

 

अशावेळी स्क्रीन सेव्हर आणि कनेक्टिव्हीटी फिचर जसे, ब्लू टूथ, वाय-फाय आणि NFC गरज नसल्यास बंद करा. जर हे फीचर्स चालू असतील, तर तुमच्या फोनची बॅटरी जास्त खर्च होईल. फोन लवकर चार्ज करण्यासाठी चार्जिंग करताना नेट कनेक्शन बंद करा.

नेट चालू असल्यास फोन लवकर चार्ज होणार नाही. जर कमी वेळामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू इच्छित असाल, तर तो स्विच ऑफ करून चार्जिंगला लावा.

या सोप्या युक्त्या वापरून अँड्रॉइड युजर्स त्यांना येणाऱ्या या समस्यांचे योग्यप्रकारे निवारण करू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version