आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
राजस्थान या राज्याचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. राजस्थानच्या या धरतीवर अनेक वीरांनी जन्म घेतला. तसेच या धरतीवर अनेक लढाया देखील लढल्या गेल्या.
राजेराजवाडे, महाल, वाडे इत्यादी गोष्टींचा वैभवशाली इतिहास राजस्थानला आहे. साहजिकपणे युद्ध आणि लढाई या गोष्टी राजस्थान प्रांतासाठी नवीन नाहीत. अनेक युद्ध, म्हणजे त्याची अनेक कारणं, हेदेखील ओघाने आलंच.
पण आज आम्ही तुम्हाला ज्या युद्धाबद्दल सांगणार आहोत, ते युद्ध जरा विचित्र आहे.
राजस्थानच्या बिकानेर आणि नागौरच्या सेनेमध्ये एक अनोखे युद्ध झाले. हे युद्ध अनोखे याकरिता होते की त्याचं कारण अनोखं होतं. हे युद्ध चक्क एका टरबूजावरून लढण्यात आले होते. आणि त्यासाठी या दोन्ही राज्यांच्या अनेक सैनिकांनी आपले प्राण त्यागले होते.
निव्वळ एका फळाकरिता लढण्यात आलेली ही जगातील एकमेव लढाई आहे. या युद्धाला “टरबूजाचे युद्ध” म्हणून ओळखली जाते.
आश्चर्य वाटलं असेल ना… एका फळामुळे युद्ध कसं काय झालं असेल? तेच जाणून घेऊया.
ही गोष्ट १६४४ साल ची आहे. तेव्हा बिकानेरवर राजा करण सिंह आणि नागौर येथे राजा अमरसिंह यांचे शासन होते. या दोन्ही राजघराण्यांनी मुघलांचे मांडलिकत्व मान्य केले होते. त्यामुळे यांचे शासक वेगवेगळ्या सैन्य अभियानात भाग घेण्याकरिता गेलेले होते.
बिकानेरचे सिलवा गाव आणि नागौरचे जाखनिया या दोन गावांच्या मध्ये या दोन राज्यांची सीमा होती. बिकानेरच्या सीमा रेषेजवळील एक टरबुज चा वेल नागौरच्या सीमारेषा पार करत वाढला. यावर एक टरबूज देखील लागले.
आता टरबुजाचा वेल हा होता बिकानेरचा पण त्यावर टरबूज लागले नागौरच्या जमिनीवर.. मग काय या एका टरबूजावर दोन्ही राजघराण्यांनी दावा केला. त्या टरबूजवर आमचाच हक्क आहे असं दोघांचंही म्हणणं होतं.
बिकानेर येथील लोकांचे म्हणणे होते की, हा वेल आमच्या क्षेत्रात उगवला आहे त्यामुळे त्या टरबूजावर आमचा हक्क आहे… तर नागौर येथील लोकांचे म्हणणे होते की, हे टरबूज त्यांच्या क्षेत्रात लागलं आहे. त्यामुळे यावर त्यांचा हक्क आहे. टरबूजाचा हा वाद राजमहालापर्यंत जाऊन पोहोचला आणि दोन्ही राज्यांच्या सीमा यावर युद्ध करण्यास तयार झाल्या.
या दरम्यान दोन्ही राजघराण्यांनी आपापल्या राजांना पत्र पाठवून हे प्रकरण मुघल दरबारात सोडविण्याचा आग्रह केला.
पण तिकडे दिल्लीत या प्रकरणावर कुठलाही निकाल येण्याआधीच बिकानेर आणि नागौर या दोन्ही सेनांमध्ये युद्ध सुरु झाले.
या युद्धात दोन्ही राज्यांनी आपले अनेक सैनिक गमावले. अखेर बिकानेर राज्याने हे युद्ध जिंकले. आपल्या शेकडो सैनिकांचे प्राण गमावून बिकानेरने हे टरबूज जिंकले…
एका फळासाठी आपल्या शेकडो सैनिकांच्या प्राणाची आहुती देण्याची, ही इतिहासातील एकमेव घटना असेल…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.