Site icon InMarathi

ट्रोल्सना वैतागलात? हे करा आणि त्रासदायक ट्रोलिंगला दूर ठेवा!

frustration inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फेसबुक आणि व्हाटसअप  हे सध्याचे सर्वात मोठे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत. फेसबुकवर लहानातील लहान गोष्ट देखील वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळे आपले मत मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन लोकांना मिळाले आहे.

आज फेसबुकचा वापर आपल्या भारतात आणि जगातील इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेसबुकवर येणाऱ्या पोस्टवरून आपल्या ज्ञानामध्ये नेहमीच भर पडत असते.

 

thehindu.com

 

पण याच फेसबुकच्या माध्यमातून खूप वेळा लोकांना ट्रोल केले जाते आणि या ट्रोलिंगमुळे लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी – कधी या ट्रोलमुळे मनस्ताप देखील तेवढाच सहन करावा लागतो. पण अशा काही युक्त्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही या ट्रोल्सपासून वाचू शकता.

आपल्याला नेहमीच कंटाळवाणी, मूर्ख, त्रासदायक आणि वाईट माणसे इंटरनेटवर पाहायला मिळतात. तुम्हाला देखील अशा प्रकारच्या लोकांनी कधीतरी कोणत्यातरी तुमच्या पोस्टवरून त्रास दिला असेल. मग या लोकांबरोबर स्वतःला त्रास न करून घेता कसे वागावे? याबद्दल कॉलेज ह्यूमरच्या कम्युनिटी मॅनेजर एली युडिन यांनी सल्ला दिलेला आहे, त्यांची संपूर्ण नोकरी ही इंटरनेटवर अनोळखी माणसांशी बोलण्याची आहे.

तुम्हाला करण्यात येणाऱ्या ट्रोलला कधीही फार मनावर घेऊ नका. सर्वकाही मस्करीत घ्या. जे काही तुम्ही येथे कराल ते सार्वजनिकपणे करा. कधीही त्याचा स्वतःला त्रास करवून घेऊ नका. सार्वजनिकपणे काही बोलल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांची मदत होते. हे ट्रोल मोडीत काढण्यासाठी सर्वात जालीम अस्त्र आहे.

 

 

दुर्लक्षित किंवा निःशब्द करा 

कधीही आपण आपले काम असल्याशिवाय कोणालाही ऑनलाईन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अनोळखी लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नये. कधीतरी मूर्खपणा करावा यासाठी हे लोक असे काहीतरी कमेंट तुमच्या पोस्टवर टाकतात. पण त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नये .

बहुतेकदा अशा ट्रोल करणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता, त्यांच्या बोलण्याला दुर्लक्षित करावे. पण कधी – कधी ही ट्रोल करणारी माणसे असे काही बोलतात, जे तुम्ही सहन करू शकत नाही. त्यावेळी त्यांना निशब्द करून त्यांच्या मूर्खपणाच्या बोलण्याचे त्याच पद्धतीने उत्तर देणे तेवढेच गरजेचे आहे.

स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारचे ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर होते. जर तुम्ही स्त्री असाल आणि जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर कोणी पुरुष मंडळी तुम्हाला त्या पोस्टवरून सतावणार, त्यावर सतत कमेंट्स करणार. अशावेळी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा तुम्ही त्याच्या त्या कमेंटला लाईक करून त्याला गप्प करू शकता. असे केल्याने त्यांना वाटेल की, तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात आणि ते गप्प बसतील.

 

kinja-img.com

 

कधीही घाबरू नका 

जर कुणी तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला घाबरून जाऊ नका. तुम्ही त्याला घाबरलात, तर त्याला वाटेल की तो जिंकला. त्यामुळे विचार करून आणि आपल्या ऑनलाईन मित्रांच्या साथीने त्या ट्रोलला योग्य ते उत्तर द्या आणि त्याला गप्प करा. पण उगाच त्याच्याशी वाद घालत बसू नका आणि या ट्रोलना घाबरून तुमचे मत सोशल मिडियावर मांडण्याचे बंद करू नका.

थोडक्यात काय, तर मनावर असणारा ताबा आणि ट्रोल करण्याऱ्या मंडळींच्या गोष्टी एकीचे कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्याची क्षमता तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला ट्रोलिंगचा त्रासच होणार नाही…

अशाप्रकारे तुम्ही या इंटरनेटवर येणाऱ्या ट्रोलना घाबरून न जाता, योग्य ते उत्तर देऊन गप्प करू शकता.

मग आता तुम्हाला कधी कुणी फेसबुकवर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर वरील युक्ती वापरून या ट्रोल करणाऱ्या लोकांना गप्प करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version