ह्या ‘तलावात’ दडलाय करोडोंचा खजिना – जो दिवसेंदिवस वाढतोच आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा एक असा देश आहे जिथले लोकं त्यांच्या धर्मावर आणि त्यांच्या देवांवर खूप आस्था ठेवतात. त्यांच्यासाठी त्यांचा धर्म खूप महत्वाचा आहे.
आणि याच धर्मासंबंधित त्यांच्या वेगवेगळ्या मान्यता देखील आहेत. भारत हा प्राचीन काळापासूनच एक संपन्न राष्ट्र राहिलेला आहे. याचे पुरावे आपल्याला आपल्या धर्मग्रंथांतून, पौराणिक गोष्टींमधून मिळतात.
मुघल तसेच ब्रिटीशांनी भारतातील सर्व वैभव लुटून नेले. पण तरीदेखील आजही भारतात अनेक अशी गुप्त ठिकाणं आहेत जिथे अरबोचा खजिना असल्याचे मानले जाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
याचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं म्हटल तर ‘पद्मनाभ मंदिर’…
याप्रमाणेच आपल्या देशात अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे खजिना लपवला असण्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
पण विचार करा की जर कुठला खजिना तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तरीदेखील तुम्ही तो मिळवू शकत नाही तर?
आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, जर आपल्या समोर खजिना उघडा पडला आहे तर आपण तो काहीही करून मिळविणारच ना…
पण भारतात एक असे ठिकाण आहे, जिथला खजिना तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू तर शकता पण मिळवू शकत नाही. या ठिकाणाबद्दल सांगितल्या जाते की येथे अरबो रुपयांचा खजिना गाडलेला आहे.
हे ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेशच्या पहाडांत असलेले ‘कमरूनाग सरोवर’.
हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील जवळपास ६० किलोमीटरच्या अंतरावर रोहांडा हे ठिकाण आहे. येथून पायी यात्रा असते कमरूमनाग सरोवरापर्यंतची.
कठीण पहाड चढून, घनदाट जंगलांना पार करून हा ८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करावा लागतो.
–
हे ही वाचा – या तलावांजवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही! ‘मृत्यूचं घर’ मानले जाणारे ९ तलाव
–
इथवर पोहोचणे अतिशय कठीण आहे आणि या सरोवराचे दर्शन देखील दुर्लभ आहे. वर्षातून १४-१५ जून या दोनच दिवशी बाबा कमरुनाग सर्वांना दर्शन देतात. त्यामुळे या दोन दिवसांत येथे भाविकांची गर्दी उसळते.
कमरूनाग बाबा हे घाटीचे सर्वात मोठे देव आहेत. ते सर्व इच्छा पूर्ण करतात असे येथील लोकं मानतात.
येथे होणाऱ्या मेळाव्यात दर वर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. जुन्या मान्यतेनुसार भाविक या सरोवरात सोन्या-चांदीचे दागिने तसेच पैसे टाकत असत.
ही परंपरा येथे प्राचीन काळापासून सुरु आहे त्यामुळे येथील लोकं असे मानतात की, आज या सरोवरात कितीतरी किमतीचा खजिना साठला गेला आहे.
कमरूनागचा संदर्भ महाभारतात देखील आढळतो. यांना बबरूभानच्या नावाने देखील ओळखल्या जाते. हे पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली योद्धा होते. पण ते कृष्णनीती पुढे हरले.
ते म्हणाले होते की,
मी आधी कौरव आणि पांडव यांचे युद्ध पाहीन आणि त्यानंतर ज्याची सेना पराजित होत असेल त्या सेनेकडून मी लढेन.
पण भगवान कृष्ण खूप चतुर होते, त्यांना कळाले होते की, जर कमरूनाग कौरवांकडून लढले तर पांडव कधीही जिंकू शकणार नाही. तेव्हा कृष्णांनी एक शक्कल लढवली.
त्यांनी कमरूनाग यांच्याशी पैज लावली आणि ती जिंकल्यावर त्यांनी कमरूनाग यांना त्यांचे शीर मागितले. पण यावेळी कमरूनाग यांनी एक इच्छा व्यक्त केली की त्यांना महाभारताचे युद्ध पहायचे आहे.
त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कापलेले शीर हिमालयाचे एका उंच शिखरावर नेऊन ठेवले. पण त्यानंतर ज्या दिशेने कमरूनाग याचं डोक वळायचं ती सेना विजयाकडे वाटचाल करायची.
तेव्हा भगवान कृष्णाने कमरूनाग यांचे शीर एका दगडाला बांधून त्यांचे मुख पांडवांच्या सेनेकडे वळवले. यांना पाण्याची कमी भासू नये म्हणून भीमाने येथे स्वतःचा हात गाडून एका सरोवराची निर्मिती केली.
देव कमरूनागला वर्षा देव मानले जाते. येथील स्थानिक लोकांच्या मते या सरोवरात एक मोठा खजिना गाडलेला आहे. लोहरी सणाच्या वेळी येथे भव्य पूजेचे आयोजन करण्यात येथे.
येथील आणखी एक मान्यता खूप प्रचलित आहे. असे मानले जाते की या सरोवरात सोन्या-चांदीचे दागिने चढवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
त्यामुळे लोकं मोठ्या श्रद्धेने या सरोवरात आपल्या अंगावरील एखादा दागिना चढवतात.
त्यामुळे या सरोवरात मोठ्या प्रमाणात दागिन्यांचा साठा आहे. पण हे दागिने किंवा यातील पैसे आपण कधी काढू शकत नाही कारण ते अर्पण केलेले असतात.
ह्या सरोवराच्या पाण्यात तरंगणारे पैसे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता…
–
हे ही वाचा – आशियातील सर्वात मोठी तोफ : जी एकदाच चालली आणि तलाव बनला
–
येथे अशी देखील मान्यता आहे की, या सरोवराची खोली पाताळापर्यंत जाते, येथे देवतांचा खजिना लपलेला आहे. येथून कोणीही हा खजिना चोरू शकत नाही.
असे मानले जाते कमरूनाग यांचे गुप्त पहारेकरू याची रक्षा करत आहेत.
सापा सारखे दिसणारे एक झाडं या पहाडाच्या चारी बाजूंनी आहे. जर कोणी या सरोवरातील खजिन्याला चोरण्याचा किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर नाग देवता आपल्या मूळ रुपात प्रगट होतात, असेही येथे मानतात.
दरवर्षी १४ आणि १५ जूनला बाबा भाविकांना दर्शन देतात. या दोन दिवसांनंतर येथे पुजारी देखील थांबत नाहीत.
तर असे आहे हे रहस्यमयी कमरूनाग सरोवर, ज्यात आहे अरबोंचा खजिना…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.