Site icon InMarathi

प्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया

democracy in rugweda inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि दीर्घकाळ चालेल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर भारत हे स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलो तेव्हा आपण जाणीवपूर्वक लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली. लोकशाहीमुळेच भारत देश हा इतर देशांपेक्षा वेगळा आहे. भारतात सर्व निर्णय हे कधीही बहुमतानेच घेतले जातात. येथे एखादा माणूस कोणताही निर्णय एकटाच घेऊ शकत नाही. लोकशाहीचा अर्थ जनतेचे राज्य असा होतो.

लोकशाही ही एक अशी शासन पद्धती आहे, ज्यामध्ये स्वतंत्रता, समता आणि बंधुता या सामाजिक जीवनातील मूल्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

इंग्रजीमध्ये लोकशाहीला डेमोक्रेसी म्हणतात. ज्याची उत्पत्ती ग्रीक मूळ शब्द ‘डेमोस’ मधून झाली आहे. डेमोसचा अर्थ आहे सामान्य जनता आणि क्रेसीचा अर्थ शासन.

 

scienceabc.com

ऐतिहासिक संदर्भात पाहिल्यास भारतामध्ये लोकशाही शासन प्रणालीची सुरुवात पूर्व वैदिक काळापासूनच झालेली आहे. प्राचीन काळापासूनच भारतामध्ये सुदृढ लोकशाही व्यवस्था होती. याचे पुरावे आपल्याला प्राचीन साहित्य, नाणी आणि अभिलेखांमधून मिळतात. यावरून आपण म्हणून शकतो की, लोकशाहीचा सिद्धांत हा वेदांचीच देण आहे.

सभा आणि समितीचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेद या दोन्ही वेदांमध्ये मिळतो. ज्यामध्ये राजा, मंत्री आणि विद्वान हे सर्व एकत्र येऊन एखाद्या विषयावर विचार विनिमय केल्यानंतरच कोणताही निर्णय घेत असत. सभा किंवा समितीने  घेतलेल्या निर्णयांचे लोकांकडून योग्यप्रकारे स्वागत केले जात असे.

एवढेच नाहीतर विभिन्न विचारांचे लोक कितीतरी गटांमध्ये विभागले जात असत आणि आपापसात विचारविनिमय करून निर्णय घेत असत. कधी – कधी वैचारिक मतभेदांमुळे त्यांची आपापसात भांडणे देखील होत असे.

इंद्राची निवड देखील वैदिक काळामध्ये या समितींद्वारेच होत असे. त्यावेळी इंद्र एक असे पद होते, ज्याला राजांचा म्हटले जात असे.

 

jagranjosh.com

गणतंत्र शब्दाचा प्रयोग ऋग्वेदमध्ये चाळीस वेळा, अथर्ववेदमध्ये नऊ वेळा करण्यात आलेला आहे. वैदिक काळ संपुष्टात आल्यांनतर राजेशाहीचा उदय झाला आणि त्यानंतर बराच काळ भारतात तीच शासनपद्धती अस्तित्वात राहिली.

आधुनिक संसदीय लोकशाहीची काही महत्त्वपूर्ण तत्व आहेत. त्यातीलच एक तत्व म्हणजे बहुमत.

लोकशाहीत बहुमतानेच कोणतेही निर्णय घेतले जातात.

तसेच, प्राचीन काळामध्ये देखील बहुमताने निर्णय होत असत आणि हे निर्णय अनुल्लंघनीय मानले जात असत. वैदिक काळानंतर छोट्या गणराज्यांबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. ही माहिती पाहिली असता असे दिसून येते की जनतेबरोबर मिळून, शासन संबंधित प्रश्नांवर विचार करत असत. गणराज्याला प्रजातांत्रिक प्रणालीच्या स्वरूपात ओळखले जात असे.

 

blogspot.com

अत्रेय ब्राम्हण, कौटिल्यचे महाभारत, अशोक स्तंभाच्या शिलालेखांच्या समकालीन इतिहासकारांनी तसेच बौद्ध आणि जैन विद्वानांद्वारे रचलेल्या ग्रंथांमध्ये याचे पर्याप्त ऐतिहासिक पुरावे मिळत आहेत.

महाभारताच्या शांती पर्वामध्ये ‘संसद’ नावाच्या सभेचा उल्लेख देखील आढळतो, कारण यामध्ये सामान्य जनता देखील असे आणि याला जन सदन देखील म्हटले जाते.

जर बौद्ध काळाविषयी विचार केला तर त्यावेळी देखील लोकशाही व्यवस्था होती. लिच्छवी, वैशाली, मल्लक, मदक, कंबोज इत्यादी लोकशाही संघ लोकतांत्रिक व्यवस्थेची उदाहरणे आहेत. वैशाली अगोदर राजा विशाल यांना देखील निवडणुकीद्वारेच निवडले गेले होते.

यावरून असे समजते आधुनिक लोकशाही ही आता तयार झालेली व्यवस्था असली तरी लोकशाहीच्या तत्वांची बीजे वैदिक काळापासून आढळून येतात. ज्याच्या साहाय्याने त्यावेळी देखील मोठमोठे आणि योग्य निर्णय घेतले जात असत.

स्त्रोत : JagranJosh

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version