Site icon InMarathi

मकर संक्रांत १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते? या दिवशी पतंग का उडवतात? वाचा

makar 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मकरसंक्रांत! इंग्रजी वर्षाच्या ऐन सुरुवातीला येणारा सण… वर्षभरात सणांची मांदियाळी असली तरी त्याचा शुभारंभ संक्रांतीपासून होतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नव्या वर्षाचं कॅलेंडर उघडलं की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहंण उत्सुकतेचं ठरतं. कारण १४ जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो. काही वर्षांमध्ये संक्रांत येते ती १५ जानेवारीला!

पतंगबाजी, गुळपोळी यांच्यासाठी प्रसिद्ध असणारा सण नव्या वर्षाचे जंगी स्वागत करणारा असतो.

विशेष म्हणजे वर्षभरातील इतर सर्व भारतीय सण पहा. इंग्रजी दिनदर्शिकेतील त्यांच्या तारखा हिंदू दिनदर्शिकेच्या संदर्भाने दरवर्षी बदललेल्या असतात. पण मकरसंक्रांतीच्या तारखेत मात्र फारसा बदल होत नाही.. हे जरा कोड्यात टाकणारं आहे. नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

संक्रांतीच्या तारखेबाबत असलेल्या या कोड्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा त्यामागचं कारण जाणून घेऊयात. आणि त्याचबरोबर पाहूयात – मकर संक्रांतीच्या बाबतीत काही माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी…

 

फक्त तिळगूळच नव्हे, संक्रांतीला या ६ गोष्टी करणं सुद्धा आहे तितकंच महत्त्वाचं!

मकर संक्रांत १४ जानेवारीलाच का येते?

सर्व हिंदू सण लुनार दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येत असतात. पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते. संक्रांतीचे तसे नाही.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका (सोलर कॅलेंडर) म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकच असतो.

 

 

तो दिवस म्हणजे १ जानेवारी.

पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही, दार आठ वर्षांतून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातो. म्हणजे काही वर्षी संक्रांती १५ तारखेला येते.  

सुर्याच्या गतीनुसार २०२०साली आपण १५ जानेवारीला संक्रांत साजरी केली गेली होती. यावर्षी मात्र संक्रांत पुन्हा एकदा १४ तारखेलाच आली आहे.

पण याहून मजेशीर गोष्ट वेगळीच आहे. याबाबतीत झालेलं एक संशोधन आणखीच अजब आहे. एक काळ असा येणार आहे, की संक्रांत नेहमीच १५ तारखेला येईल.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण २०५० पासून मकरसंक्रांत दरवर्षी १५ तारखेला येईल.

मकरसंक्रांतीच्या आधीचा काळ म्हणजे हिवाळा, आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा. हिवाळ्यात दिवस लहान होत जातो आणि उन्हाळ्यात तो मोठा होतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल.

असं का होतं? याचं कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिणायनातून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो.

 

 

आणि प्रवेश करतेवेळी म्हणजे १४ जानेवारी या दिवशी तो बरोबर विषुववृत्तावर असतो. इथून पुढे तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो.

मकरसंक्रांतीची भारतात कितीतरी नावे आहेत.

भारतात सांस्कृतिक विविधता अनन्यसाधारण आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक निकषानुसार, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सण साजरे केले जातात. मकरसंक्रांती या एकाच दिवशी भारतभरात साजरा होणाऱ्या सणाची प्रत्येक ठिकाणी वेगळी नावे आहेत.

 

 

दक्षिणेत हाच दिवस ‘पोंगल’ या नावाने साजरा करतात. तर उत्तर भारतात यालाच ‘लोहरी’ असं नाव आहे्. उत्तरायण, माघी, खिचडी अशी विविध नावे अनेक भागात आहेत.

मकरसंक्रांतीला पतंग का उडवला जातो?

पतंग उडवायला, प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापायला आवडतो का ?

पण पतंगाच्या या स्पर्धेत उतरण्यापुर्वी याच सणाला नेमका पतंग का उडविला जातो याचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे..

जुन्या काळी सकाळच्या वेळी आंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा.

सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत! पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.

 

 

हिवाळ्याच्या गार हवेत त्वचेला अनेक इन्फेक्शन्स होतात. हे विषाणू सूर्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या उष्णतेमुळे जास्त काळ जगू शकत नाहीत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.

तर पतंग उडवा आणि फीट रहा…

नवीन वर्षाची सुरुवात गोड बोलून करायला शिकवणारा आणि एकतेचा संदेश देणारा असा हा भारतीय सण.

इन मराठी टीमच्या वतीने आमच्या तमाम वाचकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version