Site icon InMarathi

नेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

इंग्रजांच्या प्रदीर्घ अत्याचार पर्वानंतर अखेर भारताने १५ ऑगस्ट रोजी आपले स्वातंत्र्य मिळवलेच. कित्येक थोर क्रांतिकारकांच्या आणि नेत्यांच्या समर्पणातून हा सोनेरी दिवस उगवला होता.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वतंत्र भारताला संबोधित केले आणि संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. सगळीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष सुरु झाला. कारण भारतीयांसाठी हे केवळ स्वातंत्र्य नव्हते तर होता एक स्वप्नमयी पुनर्जन्म…!

आपल्या सर्वांनाच माहित आहे की दरवर्षी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला जातो. पण तुम्हाला हे एकून आश्चर्य वाटेल की ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली त्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवला नाही, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर भाषण करत तिरंगा अभिमानाने फडकवला.

स्रोत

आणि तेव्हापासून लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवण्याची प्रथा सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे…

फरक फक्त इतकाच की आता स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवला जातो…

 

 

या सर्व धामधुमीत ज्येष्ठ सनईवादक उस्ताद बिस्मिला खां यांना १६ ऑगस्टच्या सोहळ्याचे आमंत्रण द्यायला नेहरू विसरले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याच्या सन्मानार्थ आपली कला सादर करण्याचा दुर्मिळ मान उस्ताद बिस्मिला खां यांना मिळाला होता. ज्यांच्या सनईच्या सुरांनी स्वातंत्र्याला पहिला सन्मान वाहिला अश्या प्रमुख व्यक्तीला आमंत्रण देणे राहिल्याचे लक्षात आल्यावर नेहरूंनी आपली चुक त्वरित सुधारली आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घेतली.

 

स्रोत

भले पहिल्या वहिल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरुन तिरंगा फडकवण्याचे भाग्य नेहरूंच्या नशिबी नव्हते तरी १७ वेळा लाल किल्यावरुन तिरंगा फडकवण्याचा मान नेहरुंना मिळाला.

इतर कुठल्याही भारतीय पंतप्रधानास नेहरूंचा हा विक्रम आजवर मोडता आलेला नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version