' तुम्ही ज्या विश्वात राहतं ते विश्व नेमकं कसं आहे? तुम्हाला माहिती असायलाच हवं… – InMarathi

तुम्ही ज्या विश्वात राहतं ते विश्व नेमकं कसं आहे? तुम्हाला माहिती असायलाच हवं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – प्रथमेश कुलकर्णी

प्रचंड मोठ्या अंतराळात, आपली सूर्यमाला – आपली पृथ्वी आणि त्यावर आपण!

रोजचं जीवन जगताना आपण केवढ्या महाकाय magical world मध्ये जगत आहोत, हे लक्षात रहात नाही आपल्या. म्हणूनच, आपल्या विश्वाची कल्पना देणारी ही ३ भागातली सिरीज. हे विश्व कसं आहे – हे थोडंसं समजून घेण्यासाठी!

 

१. ही आपली पृथ्वी. जिथे आपण राहतो, ती एक चांगलीच मोठी जागा आहे.

 

olku InMarathi

 

आपण या पृथ्वीच्या size ला गृहित धरून चालूया. मुंबई ते गडचिरोली अंतर मनात धरा (सुमारे १००० किमी, कारने २० तासांचा प्रवास) त्यानुसार पृथ्वी केवढी मोठी!!! पण आपल्याला वाटतं, तितकी पृथ्वी मोठी नाही.

 

२. सूर्यमाला

Now, ही आपल्या पृथ्वीची सूर्यमालेतली जागा. बघा पृथ्वीची size – गुरू आणि शनीच्या मानानी…!

 

universe2 InMarathi

 

३. हा आपला चांदोबा बघा कित्ती दूर आहे पृथ्वीपासून. पृथ्वीचा आकार बघा अन् हे अंतर बघा, आपल्या सगळ्यात जवळच्या अवकाशातल्या निसर्गनिर्मित वस्तूचं…!

 

universe3 InMarathi

 

४. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील रिकाम्या जागेत सूर्यमालेतले सगळे ग्रह व्यवस्थित मांडी घालून बसून आणखीन जवळजवळ ८००० किलोमीटर जागा शिल्लक राहते! या गुरू ग्रहाची size तर इतकी आहे, की आपल्या जवळ आल्यास तो पूर्ण सूर्यप्रकाश झाकून टाकू शकतो.

 

universe4 InMarathi

 

५. जरा साईज पाहा – उत्तर अमेरिका खंड आणि आपला भारत देश यांची गुरू ग्रहाबरोबर तुलना. आता आपण “भारत हा एक प्रचंड खंडप्राय देश आहे” असं म्हणू का? खरं तर पृथ्वीच गुरूपेक्षा कितीतरी लहान आहे!

 

universe5 InMarathi

 

६. शनीचा पट्टा हा एकटाच पृथ्वीच्या मानानी एवढा प्रचंड आहे. सुमारे सहा पृथ्वी मावतील, इतकी पट्ट्याचीच जाडी आहे.

 

universe6 InMarathi

 

७. आपल्या पृथ्वीला जर शनीसारखा प्रचंड पट्टा असता, तर असं दिसलं असतं. काय मजा आली असती न?

 

universe7 InMarathi

 

 

८. हा आहे धूमकेतू. आपण त्याला रात्रीच्या आकाशात पाहून ‘विश’ वगैरे करतो, पण अमेरिकेच्या लॉस अँजिलिस शहराच्या तुलनेत याला पाहिलं, तर ते प्रचंड शहर अगदीच “चिरकुट” वाटते, नाही?

 

universe8 InMarathi

 

९. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाम…!

या सूर्यदेवासमोर आपली पृथ्वी अगदीच केविलवाणी दिसते, नाही? तरी बरं आपण सूर्यापासून बरेच लांब आहोत. नाहीतर आपला कोळसा झाला असता.

 

universe9 InMarathi

 

१०. हा फोटो चंद्रावरून ‘लूनार लॅडर’ या यानानी विसाव्या शतकात घेतला आहे. मस्त आहे न?

 

universe 10 InMarathi

 

११. ही आपली पृथ्वी अशी दिसते मंगळावरून. कित्ती दूर असेल इथून! सूर्यमालेत जरा आणखीन दूर जाल, तर पृथ्वी अजून अजून छोटी दिसायला लागेल.

 

universe11 InMarathi

 

पुढील भाग – अश्याच ११ फोटोजसोबत – लवकरच!

===

Image sources:

1. D. Benningfield/K. Gebhardt/fecha estelar / Via mcdonaldobservatory.org

2. Por Andrew Z. Colvin (Own work) [CC-BY-SA-3.0 (creativecommons.org) o GFDL (gnu.org)], via Wikimedia
Commons

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?