Site icon InMarathi

तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का? तुम्ही जरूर तपासून बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जेव्हापासून मोदी सरकार बनलंय तेव्हापासून आपल्या देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत, एव्हाना अडव्हांस झाल्या आहेत. आता तर तुम्हाला कुठलही काम करायच्या आधी त्याला आधार कार्डशी लिंक करायचं असतं.

आपल्या गरजेच्या सर्व सेवा आणि योजनांना आपल्या आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मग आपल्याला एखादे नवीन सिमकार्ड घ्यायच असेल, बँकेत खाते उघडायचे असेल, आयकर रिटर्न भरायचा असेल किंवा कुठली प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, या सर्वांकरिता आधी आपलं आधार कार्ड नंबर देणे अनिवार्य आहे.

पण या सर्व ठिकाणी आपले आधार कार्ड वापरात असताना आपल्याला काही गोष्टींबाबत सतर्क राहणे देखील गरजेचे आहे.

 

intoday.in

मागील काही वर्षात अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात असे दिसून आले की, अनेकांचे आधार कार्ड त्यांच्या परवानगी शिवाय वापरण्यात येत आहेत. ज्यामुळे देशातील नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेवर गदा येण्याची शक्यता आहे.

याला आळा घालण्यासाठी आधार ऑथोरिटी UIDAI ने आपल्या वेबसाईटवर एक नवीन सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. ज्यामुळे आपण घरबसल्या आपल्या आधारकार्डचा कुठे कुठे आणि कशासाठी वापर झाला आहे हे जाणून घेऊ शकतो.

जर कुठल्या व्यक्तीला त्यात असे आढळले की त्याच्या आधार कार्ड नंबर चा कुठल्या वाईट उद्देशाकरिता वापरण्यात आला आहे तर तुही तिथे आपली तक्रार देखील नोंदवू शकता.

पण या सुविधेचा लाभ घेण्याकरिता एकच अट आहे ती म्हणजे तुमचा मोबईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा.

जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे कि तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे कुठे करण्यात आला आहे, तर तुम्ही खालील स्टेप्स नुसार ते जाणून घेऊ शकता.

स्टेप १- सर्वात आधी UIDAI च्या आधिकारिक वेब साईट वर जा. जिथे एक पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला “Aadhar Authentication History” या लिंकवर क्लिक करायचे आहे.

 

 

 

स्टेप २- OTP जनरेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…

 

 

ह्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ आकड्यांचा आधार नंबर टाका आणि सेक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुमचा OTP जनरेट करा. त्यानंतर अश्या प्रकारची विंडो ओपन होईल.

स्टेप ३- वेळेची निवड करा, येथेच तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे.

या स्टेपमध्ये तुम्ही जास्तीतजास्त ५० रेकॉर्ड्स बघू शकता.

येथे तुम्हाला अगदी सतर्क राहून Authentication Type या ऑप्शनमध्ये OTP ची निवड करायची आहे. कारण इतर ऑप्शन्समध्ये तुम्ही Authentication चे प्रमाण बघू शकत नाही. सर्व माहिती टाकून झाल्यावर ‘सबमिट’ वर क्लिक करा.

 

 

OTP एंटर केल्यावर तुम्हाला त्या वेळेदरम्यान सर्व माहिती मिळेल. जर तुम्हाला हिस्ट्री बघून काही गडबड वाटली,

उदा. जर तिथे असे दाखवत असेल की तुमचा आधार नंबर कुठल्या अश्या ठिकाणी वापरण्यात आला आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही,

तर याची तक्रार करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या १९४७ या नंबर वर कॉल करू शकता.

 

 

तुमचे आधार कार्ड जेव्हाही कुठे वापरले जाते, त्याआधी ते वापरण्यासाठी संबंधित व्यक्ती /संस्थेला UIDAI ला एक विनंती पाठवावी लागते. याच्या आधारे UIDAI तुमचा डाटा त्यांच्याशी शेअर करते.

आजकाल जशा घटना घडत आहेत त्या लक्षात घेता आपण आपल्या आधार कार्ड नंबर विषयी अधिक सतर्क राहायला हवं, जेणेकरून आपली खाजगी माहिती इतर कुणी कुठल्याही वाईट कामांसाठीर वापरू शकणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version