Site icon InMarathi

श्रीमंत सर्वांनाच व्हायचंय, पण गुंतवणूक करताना “या” गोष्टी आपण लक्षात ठेवत नाहीत!

Stock-Trader IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखिका – ऍड. अंजली झरकर 

गुंतवणुकी बद्दल बोलताना पहिला मुद्दा लक्षात येतो तो म्हणजे जीवन जगताना ज्या पैसा नावाच्या गोष्टीची आपल्याला गरज असते ती गरज संपूर्णतया व्यक्ती करत असलेला उद्योग, धंदा किंवा नोकरी या माध्यमातून भागली जात नाही .

कुठल्याही मार्गाने पैसा कमावणे हे कुठल्याही व्यक्तीचे जीवन जगण्याचे उद्दिष्ट नसते.

तर मिळालेला पैसा निरनिराळ्या माध्यमात गुंतवून त्याचे अर्जन, संवर्धन करणे, चांगल्या प्रतीचे आयुष्य जगणे आणि ती संपत्ती पुढच्या पिढीच्या हाती चांगले जीवनमान जगण्यासाठी सुपूर्त करणे हा त्या पैशाचा अथवा संपत्तीचा खरा विनियोग ठरतो.

जो काळ जुना होता त्या काळाचा विचार करायचा झाला तर सोने आणि जमीन या दोनच गोष्टीसाठी लोक स्वतःचा जीव गहाण टाकत असत. ज्याच्याजवळ जितकी जास्त जमीन आणि सोने तो सर्वाधिक श्रीमंत अशी व्याख्या फार पूर्वापार चालत आली आहे.

आज जेंव्हा गुंतवणुकी चे माध्यम प्रचंड विस्तारले आहे तरीही सोने आणि जमीन यांचे स्वतःचे विनिमय मूल्य अगदी वरच्या थराला पाहायला मिळते.

 

financesonline.com

 

स्वातंत्र्योत्तर काळापासून ते १९९१ पर्यंत आणि तिथून पुढे आजपर्यंत जी आर्थिक क्रांती झाली आहे त्यामुळे ९ ते ५ च्या चक्रात चालणाऱ्या आणि फंड आणि पेन्शन घेवून जगणाऱ्या जमातीमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे.

केवळ नोकरीच्या माध्यमातून येणारा पैसा सर्वस्व नव्हे, अथवा केवळ उद्योग आणि व्यवसायातून मिळणारा पैसा हा शेवट नव्हे तर निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरवून अधिकाधिक वाढत जाणारा पैसा हा खरा धनसंचय करून देतो हे तत्व सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे.

राष्ट्रीयकृत आणि खाजगी तसेच सहकारी बँका मधील Fixed Deposit Schemes, Recurring Deposit Schemes, म्युच्युअल फंड मधल्या गुंतवणुकी, फिक्स मॅच्युरीटी बॉंड, Stock Market equity shares, Derivatives, Commodities, सोने,जमीन , अशा अनेक माध्यमातून जवळचा पैसा गुंतवता येतो आणि त्यावर आकर्षक परतावा मिळवता येवू शकतो.

अर्थात प्रत्येक क्षेत्राला जसा एकाच वैश्विक सिद्धांत लागू असतो तसा या गुंतवणुकीच्या क्षेत्राला देखील तसा नियम लागू पडतो. जितका जास्त धोका पत्करण्याची तयारी तितकी मोठ्या किमतीचा परतावा!

केवळ पाच हजार डॉलर ने सुरुवात करून आज करोडो रुपयाच्या घरात स्वतःची संपत्ती केवळ गुंतवणुकीच्या माध्यमातून निर्माण करणारे वॉरन बफेट म्हणतात त्याप्रमाणे

“I will tell you how to become rich. Close the doors. Be fearful when others are greedy. Be greedy when others are fearful.”

कधी धोका पत्करायचा आणि कधी सावध पवित्र घ्यायचा या दोन गोष्टीवर संपूर्ण गुंतवणुकीचा ताळमेळ अवलंबून असतो.

२०१४ साली फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने जागतिक यादीमध्ये अव्वल असणाऱ्या भारतामधील गुंतवणुकीच्या Success Stories आणि त्या साकार करणारे गुंतवणूकदार यांचा आढावा घेतलेला होता.

भारतीय गुंतवणूक विश्वाला कलाटणी देणारे निर्णय घेणारे Smart Investors म्हणून ज्यांची ओळख आहे असे अनेक दिग्गज या यादीमध्ये होते.

 

businessfundingshow.com

 

मोतीलाल ओस्वाल फायनान्स लिमिटेड सर्व्हिसेस चे चेअरमन रामदेव अगरवाल यांनी १९९७ मध्ये हिरो होंडा चा Stock मार्केट मधून विकत घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी त्यांना आपल्या भागीदारांचा आणि भागधारकांचा दोघांचाही रोष पत्करावा लागला होता.

त्याकाळी केवळ १००० कोटी मिड कॅप भांडवल असणारा हिरो होंडा समूह आज त्याच विकत घेतलेल्या Stock ची किंमत ५०,८६२ करोड च्या घरात आहे.

फोर्ब्स च्या यादीत ८६ व्या स्थानावर असलेले चंद्रकांत संपत भारतातील कदाचित सगळ्यात वयोवृद्ध आणि अनुभवी गुंतवणूकदार.

७० च्या काळात हिंदुस्तान युनीलिव्हर सारख्या कंपन्यां ज्या सामान्य गुंतवणूकदारां च्या कक्षेत नव्हत्या त्यावेळी चंद्रकांत संपत यांनी शेअर्स च्या माध्यमातून खरेदी विक्री करून स्वतःचा पोर्टफोलिओ वाढवला.

 

dynamiclevels.com

 

यादीत ५७ व्या क्रमांकावर असणारे एक व्यक्तीगत गुंतवणूकदार रमेश दमाणी. जेव्हा १९९३ साली इन्फोसिस चे शेअर बाजारात विक्रीला आले त्यावेळी नवीन लोकांची फुटकळ कंपनी म्हणून कुणी त्याकडे लक्ष दिले नव्हते.

त्या काळात इन्फोसिस च्या सर्विसेस पाहता दमाणी यांना इन्फोसिस ला बाहेरच्या देशातील Labour Arbitrage चा फायदा होवू शकतो हे ओळखून त्यांनी फक्त १० लाख इन्फोसिस मध्ये गुंतवले होते.

आजमितीस त्या गुंतवणुकीची किमत शेकड्याच्या पटीत वाढून करोडोच्या घरात गेली आहे.

IDFC Mutual Fund चे प्रमुख गुंतवणूक अधिकारी केनिथ आंद्रे (यादीमध्ये ४३ वे) यांनी आपल्या Mutual Fund मधल्या गुंतवणूकदारांसाठी अगदी लहान आणि दुर्लक्षित अशा होजिअरी मार्केट मधल्या कंपन्याचे Stock उचलले.

त्यांनी उचलेल्या कंपन्यांचे Stock गेल्या ५ वर्षात १५ पटीने वाढलेले आहेत याचा परिणाम म्हणजे गुंतवणूकदारांना २२% पर्यंत मिळालेला घसघशीत परतावा.

SBI Mutual Fund चे प्रमुख गुंतवणूक अधिकारी आर. श्रीनिवासन (यादीत ४५ वे ) यांचा आपल्या Mutual Fund मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी SPICE JET AIRLINES मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय खुप गाजला.

हा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला होता ज्यावेळी पूर्ण Aviation Sector “लिकर किंग मल्ल्या” मुळे रक्तबंबाळ झाला होता. ज्यावेळी गुंतवणूक केली त्यावेळी SPICE JET डबघाईला आली होती म्हणून त्याचं विलीनीकरण होईल अशी अटकळ श्रीनिवासन यांनी बांधली.

प्रत्यक्षात अशी कुठली Policy सरकारने आणली नाही. त्यामुळे गुंतवणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु इतकं सगळ होवून ही श्रीनिवासन आणि त्यांच्या SBI Mutual Fund ने त्याचे Best Return गुंतवणूकदाराला दिले.

भारताचे वारन बफेट म्हणून ओळखले जाणारे यादीतील ५३ व्या क्रमांकावर असणारे राकेश झुनझुनवाला यांनी खिशातल्या ५००० रुपयावर गुंतवणुकीची सुरुवात केली होते हे बऱ्यापैकी आपणास माहीत आहे. या माणसाचा प्रभाव भारतीय गुंतवणूक क्षेत्रावर जबरदस्त आहे.

 

intoday.in

 

जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आल होत त्यावेळी झुनझुनवाला यांनी आपले प्राज इंडस्ट्रीज मधला स्टेक पूर्णपणे विकून टाकून Edelweiss Financial Services या कंपनीमध्ये तो खरेदी केला.

त्यांनी खरेदी केल्यानंतर केवळ एका दिवसात Edelweiss च्या शेअर ने ८% ची विक्रमी उसळी घेतली होती. आजमितीस त्यांचा पोर्टफ़ोलिओ २५०० करोड च्या घरात आहे.

या श्रीमंत व यशस्वी गुंतवणूकदारांच्या यादीवर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या दिग्गजांपैकी अनेक जण अत्यंत तरुण वयात गुंतवणुकीबाबत सजग होते.

अनेकांनी सरधोपट नोकरी–धंद्याचा मार्ग सोडून फक्त गुंतवणुकीवर जगण्याचा धोका पत्करला. सतत चा अभ्यास , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नजर ठेवून केलेली दीर्घकालीन गुंतवणूक या लोकांना फायदा देवून गेली.

आजच्या काळात जेंव्हा भारतीय गुंतवणूक क्षेत्राचा आवाका कधी नव्हे तो पूर्वीपेक्षा जास्त विस्तारला आहे.

नवीन नवीन अनेक ट्रेंड आपल्या देशामध्ये येत आहेत तेंव्हा इथून पुढे आपल्या लोकांसाठी गुंतवणूक केवळ पैसे वाढवण्याचे एकसाधन न राहता (FINANCIAL FREEDOM) आर्थिक स्वातंत्र्याचे मोठे मध्यम बनले पाहिजे.

त्यामुळे इथून पुढे अगदी तरुण वयापासून गुंतवणूक करणाऱ्या लोकांची गुंतवणुकीची दिशा म्हणजे Ultimate Financial Freedom संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यातून आलेल आर्थिक स्वावलंबन अशी आवर्जून असायला हवी.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाळा कॉलेज मधून शिक्षण तर मिळते पण आर्थिक शिक्षण मात्र कधीही मिळत नाही त्यामुळे मिळणारी डिग्री आणि पैसा याचा दुरान्वयेही संबंध व्यवहारात येत नाही.

व्यक्ती एक प्रकारच्या खोड्यात अडकतो आणि साचून राहिलेल्या मार्केट मध्ये इतकी वर्षे जी डिग्री मिळवण्यात घालवली त्याचे रिटर्न शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये १०० पैकी ९० लोक अयशस्वी ठरत असलेले दिसून येत आहेत.

 

gannett-cdn.com

 

भारत स्वतंत्र होवून ६५ वर्षे व्हायला आली तरी आपण अजून आर्थिक अज्ञानाचे गुलाम बनून राहिलेले विदारक चित्र पाहायला मिळते. जर संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य काय हे जाणून घ्यायचे असेल तर उत्पन्न आणि संपत्ती यामधला मुलभूत फरक समजून घ्यावा लागेल.

१२-१२ तास काम करून ९ तासाच्या पे रोल वरचा पगार घेणे आणि त्याच्यामध्येच सर्व खर्च आणि बचत भागवणे ही एक प्रकारची आर्थिक गुलामी झाली!

कारण अशा उत्पन्नातून कुठल्याही प्रकारचे संपन्न जीवन जगता येवू शकत नाही , पण गुंतवणुकीच्या माध्यमातून पोर्टफोलिओ वाढवत नेवून आपण काम न करता ही जे उत्पन्न कमावत आहोत ती आपली संपत्ती होय. अशी संपत्तीच आर्थिक गुलामीच्या जोखडातून मुक्ती देवू शकते.

आजच्या घडीला जेव्हा नोकरीचे मार्केट पूर्णपणे तुंबलेल्या अवस्थेत आहे आणि खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात ही नोकर कपात चालू आहे या घडीला दूरदृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्य देवू शकते.

सध्याच्या घडीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची त्रिसूत्री आर्थिक साक्षरता, आर्थिक जाळे आणि बचत या तीन गोष्टी मध्ये दडलेली आहे.

अनेकविध योजनांचा धबधबा आपल्यावर कोसळत असताना आपल्या गरजेनुसार योजना निवडून त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे, आर्थिक क्षेत्राचे सर्वंकष ज्ञान वाढवण्यासाठी आर्थिक क्षेत्रात नेट्वर्किंग वाढवणे, आणि कर्जाचे प्रमाण नगण्य ठेवून बचतीवर लक्ष केंद्रित करणे

या गोष्टी कुठल्याही गुंतवणूकदाराला त्याची संपत्ती वाढवण्यास सहाय्यभूत ठरतात. भारतातल्या गुंतवणूक क्षेत्रावर जर नजर टाकली तर एक सर्वसाधारण गुंतवणुकीचा आढावा घेता येवू शकतो.

 

 

वरील तक्त्याकडे नजर टाकली तर यामधील कुठलीच गुंतवणूक Over Estimate अथवा under estimate करून चालत नाही.

वेळ पडल्यास शेअर बाजारापेक्षा चांगले रिटर्न बँके मधील एफ. डी. देते. म्हणून गुंतवणूक करताना काही फंडे स्वत: गुंतवणूकदारांनीच बनवणे चांगले राहते. त्यातले काही मुलभूत नियम म्हणजे :

१. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष द्या. जगात यशस्वी असणाऱ्या गुंतवणूकदाराचा अभ्यास केला तर हीच गोष्ट लक्षात येते कि त्यांनी संयम ठेवून दीर्घकाळ आपले गुंतवणूक भांडवल जोपासले आणि वाढवले.

२. मार्केट ट्रेंड पेक्षा ज्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्याची गुणवत्ता तपासून पहा. ती बँक असो अथवा कंपनी. तिच्या इतिहासाचा विचार करून तिच्या भविष्यकालीन कामगिरीबाबत आडाखे बांधून गुंतवणूक करणे निश्चित चांगले.

३. संपत्ती ही फुकटच्या सल्ल्यावर कधीही मिळवता येत नाही. त्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा घालवून अभ्यास आणि संशोधन करावेच लागते.

४. गुंतवणूक अशाच क्षेत्रात केली पाहिजे ज्या क्षेत्राचे आपणास पूर्ण ज्ञान आहे.

५. यश हे कधीही मोठे अपयश पाहिल्यानंतर येते . गुंतवणुकीचे ही तसेच राहते. गुंतवणूक करताना त्याची माध्यमे निवडून तिथे टिकून राहणे हे गुंतवणूकी मधील यश बहाल करू शकते.

६. गुंतवणूक करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत आहे कि नाही हे बघण्याची संपूर्ण जबाबदारी गुंतवणूकदाराची राहते. कुठल्याही प्रकारच्या Fraud पासून वाचण्यासाठी गुंतवणूक करण्याअगोदर त्याबाबत तज्ञांचा कायदेशीर सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते.

arkwm.com

 

सर्वसाधारण पणे आत्तापर्यंतचा एकूण ट्रेंड हा उत्पन्न = आणि त्यातून होणारे खर्च = आणि जे उरेल ते बचत अशा स्वरूपाचा राहिला होता.

परंतु यानंतर मात्र गुंतवणूक = गुंतवणुकीचे परतावे = आणि त्यानंतर शिल्लक राहिले तो खर्च अशा पद्धतीने आपल्या जमाखर्चाचा ताळेबंद प्रत्येक व्यक्तीने सोडवला पाहिजे.

आणि हे त्यावेळी होवू शकत ज्यावेळी व्यक्ती उत्पन्न आणि संपत्ती यांच्यामधला फरक जाणून आपली स्वतःची संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीची पावले उचलू शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version