आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
फॅशन इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्री ही एकमेकांवर अवलंबून असलेली क्षेत्रं आहेत! जुन्या सिनेमात फॅशन इंडस्ट्रीचा सिनेमात वावर हा अगदी किरकोळ होता!
पण जसजसा सिनेमा प्रगल्भ होत गेला तसतशी फॅशन इंडस्ट्री ह्या सिनेमात शिरकाव करू लागली आणि आजच्या काळात फॅशन म्हणजे सिनेमा आणि सिनेमा म्हणजे फॅशन हे जणू समीकरणच होऊन बसलं आहे!
फॅशन सोबतच भरजरी कपडे दाग दागिने, भव्य दिव्य सेट्स ह्यांची सुद्धा यात भर पडली!
के आसिफ ह्यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव सिनेमा म्हणजे मुघल-ए-आजम हा त्या काळात बनलेला सर्वात महागडा सिनेमा. सेट्स पोशाख लाइट्स सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य असा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
–
पण तरीही त्या काळात सोशल मीडिया हा प्रकार नसल्याने ती गोष्ट तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली!
त्या नंतर हळू हळू सिनेमातल्या हिरोनी घातलेला पोशाख त्याची हेअर स्टाइल कॉपी करायचा ट्रेंड सुरू झाला आणि तिथून ह्या फॅशन इंडस्ट्रीचे चांगले दिवस चालू झाले ये आजतागायत.
६० च्या दशकात देव आनंदची टोपी, ७० च्या दशकात राजेश खन्नाची हेअर स्टाइल, अमिताभ बच्चन ह्यांची बेल बॉटम पॅन्टची स्टाईलपासून अगदी गोविंदाचे विचित्र रंगांचे कॉम्बिनेशन चे कपडे लोकं कॉपी करू लागले.
आणि ही गोष्ट आज सुद्धा चालू आहे, हृतिक रोशन नी त्याच्या पहिल्या सिनेमात घातलेला लाल ड्रेस जसाच्या तसा बाहेर कपड्यांच्या दुकानात विकायला आला!
संजय लीला भन्साळी ह्यांनी त्यांच्या देवदास सिनेमात माधुरी दीक्षित च्या कपड्यांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च आठवा!
तिथपासून अगदी त्यांनी नुकत्याच दिग्दर्शित केलेल्या राम-लीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी अशा सिनेमातले पोशाख इतके फेमस झाले की हळू हळू तसे हुबेहूब ड्रेस बाहेर बाजारात विकायला येऊ लागले!
आपण चित्रपटांमध्ये असलेले हे असे भरजरी पोशाख घातलेले कलाकार पाहून हरखून जातो. हिरोंचे कपडे तेवढे भारी नसतात म्हणा…पण हिरोईन्सचे कपडे पाहून अचंबित व्हायला होतं.
–
–
हे कपडे शुटींग झाल्यावर कुठे जात असतील? काही कल्पना आहे? कारण निश्चितच कुणीही हे भरजरी कपडे कायम परिधान करणं पसंत करणार नाही! पण मग हे कपडे जातात कुठे?
ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहेत, आज आम्ही
दीपिका पदुकोणचं उदाहरणच घेऊ या.
पद्मावतच नव्हे – रामलीला मधील लीलाने परिधान केलेला चांद-बाली पोशाख असो किंवा बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीने परिधान केलेला गोल्डन शरारा असो तिचे हे ड्रेसिंग ट्रेंड तरुण मुलींमध्ये भलतेच लोकप्रिय झाले.
सर्वसाधारण समज असा आहे की हे कपडे त्या हिरोईन्सना मिळतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शुटींग झाल्यानंतर या कपड्यांना पेट्यांमध्ये बंद करून ठेवलं जातं!
प्रत्येक पेटीवर चित्रपटाचचं नाव लिहून प्रोडक्शन हाउसच्या देखरेखीखाली एका खोलीत ठेवलं जातं. त्यानंतर याच प्रोडक्शन हाउसच्या दुसऱ्या चित्रपटांमध्ये या कपड्यांना मिक्स-मॅच करून ज्युनियर आर्टिस्टसाठी तयार केलं जातं.
म्हणजे दीपिकाने घातलेला हा शरारा, नंतर कधीतरी एखादी ज्युनिअर आर्टिस्ट कुठल्यातरी हिरोईनच्या मागे नाचताना घालणार
हे मिक्समॅच करण्याचं काम इतक्या शिताफीन केलं जात की आपण या कपड्यांना पूर्वी दुसऱ्या एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं आहे याचा आपल्याला संशय देखील येत नाही.
(तसंही, आपण प्रमुख कलाकारांकडे लक्ष असताना, ज्युनिअर आर्टिस्टकडे आपण बघतो तरी कुठे?!)
कधीकधी काय होत की एखाद्या कलाकाराला एखादी भूमिका इतकी भावते की आठवण म्हणून ते त्या भूमिकेचा costume स्वत:कडे ठेवून घेतात. अर्थात, प्रोडक्शन हाउसच्या परवानगीनेच!
काही कपडे त्या ठराविक कलाकारामुळे इतके हिट ठरतात की चॅरिटीसाठी त्यांचा लिलाव केला जातो.
रोबोट चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्या ने घातलेल्या कपड्यांचा ऑनलाईन लिलाव केला गेला आणि त्यातून मिळालेले पैसे एका संस्थेला दान करण्यात आले.
तर हे असं आहे – कपड्यांचा देखावा आणि देखाव्यांचे कपडे!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.