“व्हाय आय एम अ हिंदू?” सांगतायत शशी थरूर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताच्या एकंदरीत वैचारिक वर्तुळात आता शशी थरूर या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज उरलेली नाही. अस्खलित वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्व, लिखाणाची खिळवून ठेवणारी आणि ओघवती शैली या गुणांच्या बळावर शशी थरूर या माणसाने वैचारिक विश्वात दबदबा कायम ठेवला आहे.
Pax Indica, Bookless in Bagdad, India: From Midnight to Millenium ही थरूर यांची विशेष गाजलेली पुस्तके. थरूर यांची राजकीय कारकीर्दही चांगलीच वादग्रस्त राहिली आहे.
२०१८ मध्ये शशी थरूर एक नवे पुस्तक घेऊन आले आहेत. या पुस्तकाचे नाव “Why I Am A Hindu?” असे आहे.
या पुस्तकात विशेष म्हणजे टिपिकल “उजवा” चेहरा नसणारा थरूर यांच्यासारखा विचारवंत ‘आपण हिंदू का आहोत’ योग्यप्रकारे सांगतो. पुस्तकाचे नाव जाहीर झाल्यापासूनच या पुस्तकाबद्दल साहित्य वर्तुळात चर्चा रंगली होती. थरूर यांच्या या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या पुस्तकात वैयक्तिक पातळीवर स्वतःला अनुभवास आलेला हिंदू धर्माचा सहिष्णू चेहरा, प्राचीन संस्कृती म्हणून हिंदू धर्माचे अस्तित्व इथपासून ते आधुनिक भारताच्या इतिहासात जन्म घेतलेली ‘हिंदुत्व’ नावाची राजकीय विचारधारा, इथपर्यंत शशी थरूर यांनी सविस्तर चर्चा केली आहे.
आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे शशी थरूर यांनी या पुस्तकाच्या बाबतीत वाचकांशी संवाद साधला होता. पुस्तकाबद्दल बोलताना थरूर म्हणाले होते, की या पुस्तकात ते हिंदू तत्वज्ञान आणि त्याची जडणघडण, हिंदू धर्माची अध्यात्मिक बाजू, रंगाच्या झेंड्यात अडकलेले राजकीय हिंदुत्व यांच्यावर चर्चा करणार आहेत.
त्यामुळेच हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीपासूनच त्याविषयीची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शशी थरूर यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने, ‘आपण हिंदू का आहोत’ या विषयावर सखोल मतं मांडणं वाचकांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे.
महत्वाचे म्हणजे राजकीय हिंदुत्वाच्या बहुआयामी विचारधारा, सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवादी राजकीय हिंदुत्ववाद, गोलवलकरी हिंदुत्ववाद, दीनदयाळ उपाध्याय यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान इत्यादी विषयांचा या पुस्तकात प्रामुख्याने उहापोह झाला आहे.
पुस्तकाच्या शेवटाकडे जाताना थरूर म्हणतात त्याप्रमाणे, एका साच्यात न बसणारे, असंख्य कंगोरे असणारे हिंदू धर्माचे तत्वज्ञान, त्याची वैचारीक बैठक, सहिष्णू आणि नव्या बदलांना सामावून घेण्याची स्वाभाविक वृत्ती या सगळ्यापासून खचितच वेगळे असलेले सध्याचे राजकीय आणि काही अंशी संकुचित म्हणता येईल असे वर्तमानातले हिंदुत्व याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे व्यक्त केलेली आहेत.
थरूर यांचे हे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तर ते वाचकाच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. या नव्या पुस्तकाबद्दल वाचकांची उत्सुकता पाहता थोड्याच काळात त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकाची भारताच्या साहित्यिक आणि वैचारिक वर्तुळात चर्चा होणार याची खात्री होती.
आज खरोखरंच त्यांचे हे पुस्तक मोठा चर्चेचा विषय ठरले आहे. राजकीय वर्तुळातील शशी थरूर यांची प्रतिमा बाजूला सारून, आज “व्हाय आय ऍम या हिंदू” हे पुस्तक वाचले जात आहे.
एक सखोल अभ्यासक असणाऱ्या शशी थरूर यांचे हे पुस्तक लोकांना आवडले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.