Site icon InMarathi

भारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

२०१७ वर्ष संपले आणि त्याच्या २ दिवस आधी भारतीय वायू सेनेने एकेकाळच्या शक्तिशाली विमानाला निरोप दिला. विमानाचे नाव बहादूर ! बहादूर म्हणजे मिग-२७ ML. ८० च्या दशकात नावलौकिक मिळवलेल्या ह्या विमानाने पुढे जाणाऱ्या काळात बऱ्याच कडू गोष्टी आणि प्रसंग पचवले. २०१० मध्ये एकसाथ १५० मिग-२७ ‘ग्राउंड’ (Ground) झाली. म्हणजेच त्यांची उड्डाणे तात्पुरती स्थगित झाली. हे वर्ष म्हणजे विमानाच्या सेवेतील एक खराब पर्व.

सोविएत रशियामध्ये या विमानाने १९७० मध्ये यशस्वी उड्डाण केले आणि पाचच वर्षात, म्हणजे १९७५ मध्ये सोविएत रशियाच्या वायू सेनेमध्ये उड्डाणास सुरवात केली.

 

airliners.net

आज पर्यंत या जातीची १०७५ विमाने बनवली गेली. सोविएत रशियानंतर ही विमाने कझाकस्तान, भारत आणि श्रीलंका या देशांनी वापरली. मिग-२७ ML नंतर आता आपल्या वायू सेनेकडे मिग-२७ UPG म्हणजेच आधुनिकीकरण झालेले मिग-२७ आहेत. पण, तेसुद्धा काही काळानंतर बाहेर काढले जातील. कदाचित २०२५ हे त्यांचे शेवटचे वर्ष राहील.

हे विमान का बनले ?

१९७० पर्यत सोविएत रशिया विमाने बनवण्यात पारंगत झाला होता. त्यातच लिओनिद ब्रेझनेवचा रशियाच्या राजकारणात प्रवेश झाला होता. ब्रेझनेवला काहीही करून पश्चिमी राष्ट्रांच्या लष्करीकरण्याच्या वेगाला मागे टाकायचे होते अथवा बरोबरी करायची होती. म्हणून त्याने नव्या संशोधनासाठी आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी यथेच्छ पैसा पुरवला. त्यामुळे नवीन संशोधन होत राहिले. सोविएत रशिया बुडायचे हेसुद्धा एक मोठे कारण आहे. असो! विमानाच्या इंजिनात मोठे बदल झाल्यामुळे मग शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी नवीन पद्धत तयार झाली.

 

military-today.com

जमिनीपासून काही विशिष्ट उंचीवर विमान उड्डाण करेल, शत्रूचे रडार दिसले की विमान आकाशात वेगाने वर चढणार आणि बॉम्ब सोडणार. याचे काही फायदे झाले. एकतर विमान शत्रूच्या विमानवेधी रडारमध्ये येणार नाही. त्यामुळे विमान सुरक्षित.

तिसरा, tactical आण्विक बॉम्बस्फोट करण्यासाठी सुटसुटीतपणा!

त्या वेळेस अस्त्रांमध्येपण बरीच प्रगती झाली होती. त्यांचे वजन कमी होऊन त्यांचा प्राणघातकपणा वाढला होता. त्यामुळे विमानाची अस्त्रवाहू क्षमतापण वाढली. वेगाला मर्यादा घालत अश्या विमामानांची अचूकता मग काळानुरूप वाढवण्यात आली.

मिग-२३ च्या धर्तीवर बनलेल्या ह्या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे आकाशातून जमिनीवर यथेच्छ मारा करणे आणि शत्रूच्या हालचालीचा वेग मंदावून टाकणे.

ज्या वैमानिकांनी या विमानाच्या चाचण्यांमध्ये भाग घेतला, ते या विमानाला ‘Balcony’ म्हणून संबोधायचे. कारण, ज्या कामासाठी हे विमान बनवले गेले त्यासाठी वैमानिकाला रणक्षेत्र बखुबी दिसत असे. जेवढे रणक्षेत्र चांगले दिसेल तेवढा मारा अचूक आणि तेवढीच शत्रूची हानी!

 

airvectors.net

या विमानाच्या आधी जी विमाने या श्रेणीत बनली ते एका खास पद्धतीने शत्रूवर मारा करायचे. ती पद्धत म्हणजे सूर मारून! समजा शत्रूचे रडार उडवायचे असेल, तर या श्रेणीचे विमान एका ठराविक अंतरापर्यंत सूर मारणार, बॉम्ब सोडणार आणि वापस वर झेप घेणार.

पण, याच्यात एक मोठा धोका होता. अश्या पद्धतीत विमानवेधी अस्त्रे रडारमध्ये पकडतील आणि कदाचित शत्रूची हानी करण्याआधीच विमानाचा खात्मा होईल.

याच कारणास्तव मिग-२३ ची प्लास्टिक सर्जरी करून तोंड निमुळते करण्यात आले आणि म्हणूनच नाव पडले Balcony ! अश्या निमुळत्या तोंडाला बदकाच नाक ( Duck Nose) असेही संबोधले जाते. मिग-२३ ची अस्त्रावाहू क्षमता ३ टनवरून ४ टन झाली. रडारच्या जागी missile guiding system लागली. इथूनच या विमानाला नाव पडले मिग-२७, कारण हे मिग-२३ पेक्षा नाविन्यपूर्ण होते. चाचणी वैमानिक व्ह्लेरी म्येनित्स्की यांच्या शब्दांत सांगायचे तर या विमानाने रशियन वायुसेनेला चांगलेच बळ दिले.

भारतीय वायुसेनेत पदार्पण:

१९८१ मध्ये या विमानाचे भारतीय वायुसेनेमध्ये पदार्पण झाले. कॅनबेरा जातीच्या विमानानंतर काय असा प्रश्न असताना ही ह्या विमानाने त्यांची पोकळी यशस्वीपणे भरून काढली. त्यात या विमानच्या पंखाची रचना खास, ज्याला variable geometry wing असे म्हणतात. यामुळे विमानाला छोट्या धावपट्टीवरूनपण उड्डाण करता येते. जसा विमानाचा वेग वाढणार तशी पंखांची संरचना बदलणार.

जवळपास ८०० किमी मारक क्षमता असलेल्या या विमानाने आपली मोठी गरज भागवली. HAL ने विमानाची बांधणी करण्यसाठी सोविएत रशियाकडून रीतसर परवानगी मिळवली आणि बांधणी चालू झाली.

१४ मार्च २००२ साली भारतीय वायू सेना, HAL आणि DARE यांच्यात करार झाला. या तीन संस्थांनी एकत्र काम करून या विमानात अमुलाग्र बदल करून या विमानाचे दात अजून धारदार केले.

यात जे तांत्रिक बदल झाले, ते पूर्णपणे भारतीय आहेत. ही भारतासाठी एक मोठी litmus परीक्षा होती आणि त्यात आपण पूर्णपणे यशस्वी झालो. काश्मीरच्या युद्धात या विमानानेसुद्धा हिरारीने भाग घेतला. या विमानाने आजची तारीख बघता ३७ वर्षे देशाची सेवा केली आहे.

 

idreamcareer.com

पुढे काय ?

Jaguar, मिग-२७ आणि मिग-२३ भारतीय वायू सेनेच्या प्रहार करण्याच्या क्षमतेचे एक मोठे अंग आहे. मिग-२७ चा आकडा बघता आणि त्यांचा दुर्घटनेचा इतिहास बघता हे विमान मोठी पोकळी निर्माण करणार यात तसूभरही शंका नाही.

या विमानाची जागा आता कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. उद्या चालून Jaguar पण निवृत्त होणार. त्यांचीपण जागा कोणालातरी घ्यावी लागणार. कोणतीही वायुसेना strike आणि बॉम्बर विमानाशिवाय अपुरी असते.

 

i.pinimg.com

Su-३४ ही माझी निवड राहील. कारण सुखोई चालवण्यात आणि वापरण्यात आपण बर्याच गोष्टी शिकलो आहोत आणि तरबेज झालो आहोत. म्हणूनच तर आपण दक्षिण-पूर्व आशियामध्ये ज्यांच्याकडे सुखोई आहे. त्या देशांच्या वैमानिकांना आपली वायू सेना प्रशिक्षण देते. नवीन विमान येणार त्यात वैमानिकांचे प्रशिक्षण वेगळे, त्याचे सुटे भाग निर्माण करायची क्षमता, विमानाची देखभाल करणारे मनुष्यबळ, डावपेच या आणि अशा बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. महत्वाचा असतो तो वेळ! येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही!

बहादूर, तुला आमचा सलाम !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version