Site icon InMarathi

ही ११ लक्षणं सांगतील तुमच्या ‘बेटर हाफ’चं बाहेर अफेअर सुरू झालंय!

timeplease-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल प्रेम करणे जेवढे सोपे आहे, तेवढेच एखाद्याला फसवणे रोजचे झाले आहे. आज आपण कितीतरी प्रेम संबंध जुळताना आणि कालांतराने तुटताना पाहतो. आपल्या आजूबाजूलाच आपल्याला अशी कितीतरी उदाहरणे मिळतील.

प्रेम प्रकरणात बहुतेकदा मुलांनी मुलींची फसवणूक केल्याच्या गोष्टी जास्त घडलेल्या आपल्याला दिसून येतात. पण अनेकदा मुली देखील मुलांची फसवणूक करतात. लग्नांनंतरही अशा फसवणुकीची प्रकरणे घडतातच.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या जोडीदारात दिसत असतील तर “काहीतरी गडबड” असण्याची शक्यता आहे.

चला तर मग जाणून घेऊया, या गोष्टीबद्दल..

 

१. तो/ती तुमचे प्रश्न टाळत आहे.

 

 

नेहमी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी तुमची प्रेमिका अचानक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत आहे, किंवा तुमचा जोडीदार छोट्या छोट्या चौकश्यांवर वैतागत असेल-तर नक्कीच काही तरी वेगळे घडत असल्याची ही चाहूल आहे.

ती व्यक्ती कदाचित मुद्दाम असे करण्याची शक्यता जास्त आहे, जेणेकरून तुम्ही तिच्यापासून दूर जाल.

 

२. तुमच्यापासून स्वतः चा फोन लपवणे.

 

 

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून स्वत:चा फोन लपवत असेल किंवा फोन आल्यावर नेहमी तुमच्या समोर फोनवर बोलणारी तुमची प्रेमिका आता तुमच्यापासून लांब जाऊन फोनवर बोलत असेल – तर ती तुमच्यापासून एखादी मोठी गोष्ट लपवत असण्याची शक्यता आहे.

==

हे ही वाचा – घोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय!

==

३. तुम्हाला न सांगता प्लॅन बनवणे.

 

 

जर तुमच्या प्रेमिकेने एखादा फिरायला जायचा किंवा कुठे बाहेर जायचा प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनमध्ये तिने तुम्हाला समाविष्ट केले नाही, तर नक्कीच तुमची प्रेमिका काहीतरी तुमच्यापासून लपवत आहे आणि आता तिच्या जीवनामधील तुमचे महत्त्व कमी झाले आहे.

 

४. त्याच्या/तिच्या मित्रांच्या यादीमध्ये नवीन लोक येणे…!

 

 

तुमच्या प्रियकराच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या प्रेयसीच्या मित्रांच्या यादीमध्ये अचानकपणे काही नवीन मित्रांचा समावेश झाला असेल, तर काहीतरी वेगळे घडत आहे.

असे लोक अचानक जीवनात येत असतील, ज्यांना तुम्ही कधीही पाहिले नाही किंवा ज्या लोकांशी (स्वभाव आणि इतर गोष्टी) इतर कुठल्या प्रसंगांत तुमच्या पार्टनरशी मैत्री होणे एरवी शक्य नाही, तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच काही तरी असे सुरु आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही.

 

५. फोनवर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम जडणे.

 

 

जर तुमचा प्रियकर आता तुमच्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या मोबाईल फोनला देत असेल, आणि याबद्दल तुम्ही काही विचारल्यास तुम्हाला टाळत असेल – तर आता त्याला तुमच्यामध्ये तेवढा रस राहिला नाही – जेव्हा कुणातरी “फोनवरील व्यक्तीत” आहे – हे यावरून दिसून येते.

==

हे ही वाचा – या “७” गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या…!

==

६. जीपीएससारखा मागोवा घेणे

 

 

प्रत्येकवेळी तुमची प्रेयसी तुम्ही कुठे आहात, काय करताय, कुठे जाणार आहात, किती वेळ लागेल – असे प्रश्न विचारात असेल, तर ती तुम्ही नक्की कुठे आहात याची खात्री करत असते. जेणेकरून तुम्ही तिला एखाद्यासोबत पकडू नये. असे असल्यास तुमची प्रेयसी तुमची फसवणूक करत असल्याची संभावना आहे.

 

७. तुमचे फोन न उचलणे

 

 

जर तुमचा जोडीदार तुमच्या फोनचे लवकर उत्तर देत नसेल आणि नेहमीच व्यस्त असल्याचे कारण देत असेल, तर ते तुम्हाला टाळण्याचे प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या. हे असं एखाद्या मित्र/मैत्रिणीने करणं एकवेळ ठीक आहे. पण तुमचा पार्टनर असं सतत करत असल्यास, तुमची फसवणूक होत असल्याची शक्यता असू शकते.

 

८. तुमच्या सोबत असूनही तुमच्याकडे लक्ष नसणे.

 

 

कल्पना करा – तुम्ही कुठे फिरायला किंवा कुठे रेस्टॉरंटमध्ये गेला आहात. तुमच्या प्रेमिकेच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखा आनंद दिसत नाहीये. किंवा तुमचा प्रियकर सतत इतरत्र नजर फिरवतोय – तर त्यांना तुमच्याबरोबर येण्यात, तुमच्याबरोबर वेळ घालवण्यात रस नाही असे दिसते. यावरून हे लक्षात येते कि, कदाचित आता दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडते.

 

९. प्रत्येकवेळी उगाच तुमच्यावर चिडणे.

 

 

तुमची प्रेमिका तुम्हाला जराही समजून न घेता. प्रत्येक गोष्टीत तुमच्यावर रागवत असेल आणि तावातावाने बोलत असेल. तर तुमची प्रेमिका हे मुद्दाम करत असल्याची शंका यामधून व्यक्त होते. जेणेकरून तुम्ही तिच्यापासून लांब जाल.

 

१०. तुमच्या बरोबर गोष्टी शेयर न करणे.

 

 

सुरवातीला तुमचा प्रियकर तुमच्याकडे त्याच्या जीवनातील लहानातील लहान गोष्ट देखील शेयर करत होता – पण आता तो कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित नाही. काहीच शेअर करत नाही. अशावेळी तो त्याच्या जीवनातील काहीतरी मोठी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा शक्यता असू शकते.

 

११. कमिट न करणे.

 

 

हा प्रेमी युगुलांमधील सर्वाधिक दिसणारा प्रकार आहे असं रिलेशनशिप तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर आपला प्रियकर/प्रेयसी भविष्यातील बांधिलकीबद्दल सतत टाळाटाळ करत असतील तर त्यांची इतरत्र भावनिक गुंतवणूक असण्याची शक्यता अधिक असते.

अर्थात ह्यांपैकी काही होत असेल तर त्यातून प्रेयसी फसवतच आहे असा अर्थ निघत नाही. स्वभावातील दोष असू शकेल किंवा तुमच्या नात्यामधील अल्पकाळ टिकणारा एक प्रॉब्लम. शेवटी आपल्या “जीवन साथी” ला तुम्हीच पूर्ण ओळखता…! त्यामुळे परिस्थितीचे अर्थ काय काढायचे आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे ही तुमचं तुम्हालाच ठरवावं लागणार…

==

हे ही वाचा – लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय आहे बेस्ट?

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version