Site icon InMarathi

“मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य

islamic-atrocity-on-hindus-inmarathi-1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मध्ययुगीन भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षाला सरसकटपणे आर्थिक दृष्टीकोनातून पाहत तो धार्मिक संघर्ष नव्हताच असा धादांत चुकीचा आणि अज्ञानमूलक निष्कर्ष काढण्याची काही इतिहासकारांची जुनी पद्धत आहे. यात महत्वाचा मुद्दा हा की, ते याला आधार म्हणून काही हिंदू राजांनीच त्यांच्या प्रजेचे शोषण केल्याचे दाखले देतात आणि त्या मोजक्या उदाहरणांच्या आधारे संपूर्ण मध्ययुगीन संघर्षच धर्मासापेक्ष नसल्याचा निर्वाळा देतात.

कुठल्यातरी एका विचारसरणीला निष्ठा अर्पण केली की, वस्तुनिष्ठ अभ्यासात अडथळा येतो. त्या विचारसरणीला सोयीस्कर भूमिका घेण्याचे ओझे व्यक्तीवर अनाहूतपणे येऊन पडते.

हा त्यातलाच प्रकार आहे. सर्व प्रश्नांकडे आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याची सवय इथे महत्वाची भूमिका बजावते.
या बाबतीत त्यांनी मांडलेल्या काही प्रमुख निष्कर्षांचा उहापोह करणे गरजेचे ठरते.

मुद्दा क्र १.

हिंदू राजांनी आणि मुस्लिम राजांनी प्रजेला जी वागणूक दिली तिच्यात काहीच गुणात्मक फरक नव्हता. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडात हिंदू राजेही हिंदू प्रजेला मुस्लिम राज्यकर्त्याप्रमाणेच वागवत.

ऐतिहासिक पुराव्यांचा विचार केला तर या निष्कर्षात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. मध्ययुगीन राजवटीत असलेल्या दोन्ही साम्राज्यांनी प्रजेला दिलेल्या वागणुकीची तुलना केल्यानंतर या निश्कर्षातला फोलपणा लक्षात येतो.

विल ड्युरंट त्याच्या ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ मध्ये म्हणतो,

“the Mohammedan conquest of India was probably the bloodiest story in history.”

 

hinduexistence.files.wordpress.com

अनेक मुघल इतिहासकारांनी मुघल राजे भारतात आल्यानंतर केलेल्या कारवायांचे वर्णन जिहाद म्हणून मोठ्या अभिमानाने लिहून ठेवले आहे, सक्तीची धर्मांतरे, हिंदू स्त्रियांवरील बलात्कार, हिंदूना दुय्यम नागरिकत्व आणि अनेक जाचक अटी, जिझियासारखे कर लावले हे स्वत: मुस्लिम इतिहासकार अभिमानाने सांगत आहेत.

इ. स. ८०० ते इ. स. १७०० या कालखंडात झालेल्या परकीय इस्लामी आक्रमणाचे हे वर्णन आहे. प्रश्न हा आहे की, हीच वागणूक हिंदू राजांकडून हिंदू प्रजेला देण्यात आली होती काय?

काश्मीरचा हर्ष राजासारखे काही मोजके राजे वगळता असे दिसून येत नाही. सक्तीने धर्मांतरे झाली हे एक वास्तव मान्य केले तरी या निष्कर्षात फारसे तथ्य उरत नाही.

मुद्दा क्र. २.

हिंदू राजे व सरदार एका बाजूला आणि मुस्लिम सुलतान व अमीर दुसऱ्या बाजूला अशी सतत लढाई होत असे हे धादांत असत्य आहे.

इस्लाम नावाच्या संघटीत धर्माचा अभ्यास शून्य असला की, असे अज्ञामुलक मिश्कर्ष काढणे फारसे अवघड नाही. मुस्लिम राजे भारतात का आले या अत्यंत सोप्या पण कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण कधी प्रयत्न केला नाही असे दिसून येते. केला असेल तरी “ते निखळ आर्थिक उद्देशाने भारतात आले” हा निष्कर्ष काढण्यापुरताच अभ्यास केला असावा.

उदाहरण म्हणून पहा, उत्तरेत मुघलांचे साम्राज्य असताना दक्षिणेकडच्या मुस्लिम सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली. एवढाच भाग लक्षात घ्यायचा असेल तर तो संपूर्ण संघर्ष धर्मनिरपेक्ष होता असे म्हणणे शक्य आहे. आता पुढच्या घडामोडी पहा.

 

mapsofindia.com

दाक्षिणात्य राज्यांपैकी बहामनी राज्य १३४६ ते १५२६ या कालखंडात अस्तित्वात होते. नंतर या राज्यातील सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोड्याची कुतूबशाही, बिदरची बरिदशाही अशा राजवटी अस्तित्वात आल्या. याच दरम्यान विजयनगर येथे हरिहर बुक्काने आपले राज्य स्थापन केले आणि या हिंदू साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

१६७४ मध्ये बहामनी राजवटीतून फुटून निर्माण झालेल्या सर्व मुसलमान राजवटी एकत्र आल्या आणि त्यांनी विजयनगरचे हिंदू साम्राज्य उद्ध्वस्त केले.

हे पूर्ण सत्य स्वतःच्या वर्तमानातील अपरिहार्यता बाजूला ठेवून लक्षात घेतले तर मध्ययुगीन संघर्ष धार्मिक होता की नव्हता या विषयावर जास्त काळ वाद घालण्याची गरज नाही.

मुद्दा क्र. ३.

मध्ययुगीन कालखंडात देवस्थानच्या मालमत्तांची लूट ही पूर्णतः आर्थिक उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे. त्यात धर्माचा काहीही संबंध नाही.

प्रत्येक इतिहास आर्थिक दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात केली तर स्वाभाविक हेच आकलन असते. लुटीचेही अर्थशास्त्र असते. उदा. शिवाजी महाजांनी दोन वेळा सुरत लुटली. इतरही अनेक शहरे लुटली, पण यामध्ये एकही शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले नाही.

त्या ठिकाणावरून पुन्हा व्यापार उद्यम सुरू होईल आणि पुन्हा लुटण्याची गरज पडली तर रिकाम्या हाताने परत जावे लागणार नाही इतकी संपत्ती मागे ठेवली. लोकांच्या सरसकट कत्तली केल्या नाहीत. एका ठिकाणावरून नियमित लुटीची सोय होणार असेल तर ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याचे प्रयोजन काय? आता मुस्लिम राज्यकर्त्यांनी लुटलेल्या शहरांची उदाहरणे घ्या.

 

quoracdn.net

गावे लुटणे, देवळे जमीनदोस्त करणे, बायका पळवणे हा स्पष्ट आदेश सैन्याला दिलेला असे.

या सगळ्याचे मूळ इस्लामच्या सैद्धांतिक मांडणीत सापडते. ते समजीन घ्यायचे असेल तर “कुफ्र” म्हणजे काय? “बुतपरस्ती” म्हणजे काय? “शिरक” म्हणेज काय?

औरंगजेबाने स्वतःला जी पदवी देऊन गौरव करून घेतला त्या “बुतशिकन” या संकल्पनेचा अर्थ काय हे समजून घ्यावे लागेल. तेव्हाच देवळांची लूट आणि मूर्तीभंजन का केले गेले हे समजू शकेल.

मध्ययुगीन मुस्लिम आक्रमणाचा हा इतिहास निर्विवाद आहे. अर्थात तो समजून न घेता अथवा समजून घेऊनही वर्तमानातले अजेंडे रेटायचे म्हणून अज्ञानमूलक आणि विपर्यस्त इतिहास सांगितला जात असेल तर त्याला नाईलाज आहे.

===

 

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version