Site icon InMarathi

गाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट”! भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम

Indian railways buy cow dung.Inmarathi00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी पैसे आणि वेळ दोन्ही वाचवणारा आहे. कमी वेळामध्ये आल्या इच्छुक ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे एक उत्तम प्रवासाचा पर्याय आहे. रेल्वेने फिरण्याची मज्जा देखील काही वेगळी असते. रेल्वेमधील प्रवास देखील आपल्याला बससारखा थकवणारा नसतो. तसेच, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येतात. पण तुम्हाला हे माहित आहे का ? की हेच रेल्वे प्रशासन ४० कोटींचे गाईचे शेण खरेदी करण्याच्या तयारीत आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की, रेल्वेमध्ये शेणाचे काय काम आहे ? मग चला तर पाहुयात की, रेल्वे प्रशासन कशासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेण खरेदी करत आहे..

 

media2.intoday.in

रेल्वेमध्ये वापरण्यात येणार शेण…

रेल्वेच्या नवीन स्वच्छता मोहिमेमुळे गुरे पाळणाऱ्या गुराख्यांना खूप फायदा होणार आहे. खरेतर, स्वच्छतेला लक्षात घेऊन रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये बायो टॉयलेट लावण्याची योजना आखण्यात आली आहे. हे टॉयलेट डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये लावण्यात येणार आहेत. या बायो टॉयलेट टॅंकमध्ये गाईच्या शेणाचा वापर करून बनवण्यात आलेल्या मिश्रणाला टाकण्यात येईल, ज्याला रेल्वे प्रशासन आता संरक्षण संशोधन विकास प्रतिष्ठान (डीआरडीइ) ग्वालियरकडून १९ रुपये प्रति लिटरच्या दरामध्ये खरेदी करत आहे. या योजनेसाठी रेल्वेला ३३५० ट्रक शेणाची गरज भासेल, ज्याची किंमत जवळपास ४२ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

 

publicbroadcasting.net

या कामासाठी लागते शेण…

बायो टॉयलेटमध्ये इनोकुलुम नावाचे मिश्रण वापरले जाते. डीआरडीइ हे मिश्रण बनवून रेल्वेला देते. या मिश्रणाला तयार करण्यासाठी त्यामध्ये गाईचे शेण टाकले जाते. शेणामुळे या मिश्रणामध्ये बॅक्टीरिया जिवंत राहतात आणि जास्त बॅक्टीरिया तयार होतात. ४०० लिटरच्या टॅंकमध्ये १२० लिटर हे मिश्रण टाकले जाते. या मिश्रणामुळे टँकमध्ये जमा झालेले मलमूत्र वेगळे होते. मल कार्बन डायऑक्साइडमध्ये बदलून उडून जाते आणि पाण्याला रिसायकल करून स्वच्छ केल्या जातात.

 

jagranimages.com

शेणासाठी खास “सेंटर” सुरु करणार…

ग्वालियरमधील डीआरडीइ आतापर्यंत १५ अधिकृत वेंडरांकडून गाईचे शेण घेतले आहे. हे शेण, वेंडर गोशाळा आणि ज्यांच्याकडे जास्त गायी आहेत, त्यांच्याकडून खरेदी करतात. या वर्षीच्या शेवटपर्यंत सर्व रेल्वे डब्ब्यांमध्ये बायो टॉयलेट लागणार असल्याने डीआरडीइला खूप मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासणार आहे. यासाठी शेण एकत्रित करण्यासाठी इतर अजून काही सेंटर सुरु करण्याची देखील योजना आहे. याव्यतिरिक्त टॅंकमध्ये टाकण्यात येणाऱ्या मिश्रणासाठी देखील सेंटर उघडले जाईल.

 

outlookindia.com

४४ हजार डब्ब्यांमध्ये लावण्यात येणार बायो टॉयलेट…

रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये जवळपास ४४ हजार डब्ब्यांमध्ये बायो टॉयलेट लावण्याची योजना आहे. आतापर्यंत २६ हजार डब्ब्यांमध्ये एक लाख बायो टॉयलेट लावले गेले आहेत. यातील उत्तर मध्य रेल्वेच्या ६४४ डब्यांमध्ये २०२३ बायो टॉयलेट लावण्यात आलेले आहेत. एनसीआरच्या १३९७ डब्ब्यांमध्ये जवळपास पाच हजार बायो टॉयलेट अजून लावण्यात येणार आहेत.

असे हे रेल्वेमध्ये येणारे बायो टॉयलेट स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि यामुळे रेल्वेला देखील उत्तम फायदा होण्याची शक्यता आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version