Site icon InMarathi

सैन्यातील सर्व जवानांचे केस बारीक असण्यामागची कारणं, सैन्याच्या कार्यपद्धतीची झलक दाखवतात!

army man 1 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सैनिक हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळेच आज आपण बिंधासपणे राहत आहोत. आपण सुरक्षित रहावे, यासाठी ते नेहमी झटत असतात.

सैनिकांना देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्याची देखील तयारी ठेवावी लागते. असे हे सैनिक देशासाठी काहीही करायला तयार असतात.

 

 

प्रत्येक देशाचा सैनिक हा आपला देश कसा सुरक्षित राहील, याचाच सतत विचार करत असतो.

पण या सर्व सैनिकांमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांच्या केसांचा कट. या सर्व सैनिकांचा कट हा एकसारखाच असतो. तुम्हाला माहित आहे का ? की असे का असते. कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर आज आपण जाणून घेऊंया, सैनिकांचा असा बारीक हेयर कट असल्यामागची काही कारणे..

 

 

निशाणा लावताना लक्ष बनून राहणे.

शत्रूवर निशाणा लावण्यासाठी बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. अशावेळी निशाणा साधताना केस हे अडथळा निर्मण करू शकतात. जर केस मोठे असतील आणि निशाणा लावताना डोळ्यांवर आले, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस लहान ठेवले जातात.

सर्दीच्या आजारापासून वाचणे

सैनिकांना आपली ड्युटी करण्यासाठी खूप वेळा भर पावसामध्ये उभे राहावे लागते. अशावेळी त्यांचे लांब केस त्यांच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतात आणि त्यामुळे सर्दीच्या आजारांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सैनिकांचे केस हे बारीक ठेवले जातात.

 

 

समानतेचा भाव विकसित करणे

सैनिकांचे छोटे केस ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे हे आहे. अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन त्यांनी एक टीम बनून काम करावे, यासाठी असे केले जाते.

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी

रणांगणामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर सैनिकांना कितीतरी वेळा दररोज अंघोळ करायला मिळत नाही. अशावेळी त्यांचे जर केस लांब असतील तर त्यांना इन्फेक्शन होण्याची भीती निर्माण होते . त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.

 

jagran.com

हेल्मेट आणि इतर काही गॅजेट घालण्यासाठी

सैनिकांना आपला जास्त वेळ हा रणांगणावर घालवावा लागतो. जिथे त्यांनी कितीतरी प्रकारचे हेल्मेट आणि इतर गॅजेटस वापरावे लागतात. अशावेळी लांब केस हे समस्यांचे कारण बानू शकतात. त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.

सैनिकांचे केस लांब असल्यास आणि ते बंदुकीमध्ये गेल्यास त्यामुळे बंदूक खराब होण्याचा धोका असतो. तसेच, केस लहान असल्यास गर्मी जास्त जाणवत नाही त्यामुळे सैनिकांचे केस लहान ठेवले जातात.

 

ibnlive.in

कधी कधी सैनिकांचा सामना थेट शत्रूशी होतो अशावेळी त्यांचे केस लांब असल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि शत्रू हातघाईच्या लढाईत आपली पक्कड बनवू शकतो.

पण जर केस लहान असतील तर तर पकडून सैनिकांवर सहसा मजबूत पकड करता येत नाही, त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.

या सर्व कारणांमुळे आपण सर्व सैनिकांच्या केसांचा कट एकच असल्याचे पाहतो आणि या कटमध्ये केस खूप बारीक कापण्यात येतात. जेणेकरून सैनिकांना वरील कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version