Site icon InMarathi

रावण एक ‘ज्ञानी’ पुरुष होता…वाचा रामायणातील हे सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रामायण म्हटलं की डोळ्यासमोर दोनच मूर्ती येतात एक म्हणजे राम आणि दुसरी म्हणजे रावण.

सत्याने असत्यावर केलेला विजय म्हणजे रामायण असे आपण लहानपणापासून ऐकत आलो. रावण हा ह्या कथेतील व्हिलन. त्याचे वाईट रूप नेहमी चर्चिल्या जाते, पण याच रावणाच्या ज्ञानासमोर देव देखील नतमस्तक व्हायचे हे आपल्यातील अनेकांना ठाऊक नाही.

अर्थात – इथे रावणाचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही, उलट मोठ्या दुर्गुणांमुळे  इतर सद्गुण कसे निरुपयोगी ठरतात – हे आपण रावणाकडून शिकावं – हा ह्या लेखामागचा हेतू!

आपल्याच रामायणातील रावणाबद्दलची अशी काही सत्यं – जी दाखवतात की “असा” ज्ञानी पुरुष सापडणे कठीण!

वेदांचे अफाट ज्ञान असलेला रावण

 

स्रोत

रावणाला वेदांचा जाणकार होता. साम वेदामध्ये निपुण होता. रावणाने शिवतांडव, युद्धीषा तंत्र आणि प्रकुठा कामधेनु सारख्या ग्रंथांची रचना केली आहे.

इतकेच नाही तर वेद आत्मसात करण्याचे ’पद-पथ’ नावाचे जे तंत्र होते त्यात रावण पारंगत होता.

आयुर्वेदाचे ज्ञान

 

स्रोत

रावणाने आयुर्वेदावर ‘अर्क प्रकाश’ नावाचा एक महान ग्रंथ लिहिला होता. ह्या ग्रंथात, आयुर्वेदाची भरपूर माहिती आहे. रावणाला अश्या प्रकारचा भात बनवण्याचे तंत्र अवगत होते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीनची मात्रा असायची.

कविराज रावण

स्रोत

आधी उल्लेख केल्याप्रमाणे – रावण एक ग्रंथनिर्माता तर होताच, त्याचबरोबर कवी देखील होता. ‘शिवतांडव’ ही काव्यरचना रावणाच्याच सिद्धहस्ते निर्माण झाली. रावणाने आपल्यावर रचलेल्या कविता पाहून शंकर त्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वरदान दिले होते.

संगीतातला जाणकार

स्रोत

रावणाला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने संगीत शिकून घेऊन संगीत कलेत नावलौकिक मिळवला होता. ‘रुद्रवीणा’ वाजवण्यात रावणाला हरवणे जवळपास अशक्य होते.

इतकेच नव्हे – तर रावणाने त्या काळी वायोलिन देखील बनवले होते ज्याला ‘रावणहथा’ असे म्हटले जायचे. आजही राजस्थानच्या काही भागात हे वाद्य वाजवले जाते.

स्रोत

स्त्रीरोग विज्ञान आणि बालचिकित्साबद्दलचे ज्ञान

रावणाने पत्नी मंदोदरीच्या सांगण्यावरून आपल्या ज्ञानाचा वापर करून एक ग्रंथ लिहिला. ज्यामध्ये स्त्रीरोग विज्ञान आणि बालचिकित्सावर आधारित १०० पेक्षा जास्त आजारांचे विश्लेषण आणि उपाय सांगितले.

स्रोत

मरतानाचे ज्ञानदान – स्वतः लक्ष्मणास!

रामासोबत युद्धात हरल्यानंतर रावण जीवनाची अखेरची घटका मोजत होता. रावणाच्या ज्ञानाची रामाला कल्पना असल्याने त्याने भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून ज्ञान प्राप्त करण्यास सांगितले. रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मण पहुडलेल्या रावणाच्या डोक्याशी जाऊन बसला.

स्रोत

त्यावेळी रावणाने सांगितले कोणत्याही व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त करताना त्या व्यक्तीला आपला गुरु मानावे आणि त्याच्या चरणी बसून ज्ञान प्राप्त करावे.

लक्ष्मणाने रावणाच्या सूचनांचे पालन केले आणि रावणाने राज्यकारभारापासून जीवनात यशस्वी होण्याच्या युक्तींपर्यंत अनेक गोष्टींचं ज्ञान लक्ष्मणाला दिलं.

१० तोंड नव्हे – १० मेंदू !

रावण दहा तोंडांचा होता असे आपण मानतो. पण प्रत्यक्षात रावण जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या गळ्यात ९ मोती असलेला हार घतला होता. ज्यात प्रत्येक मोत्यामध्ये रावणाची छबी दिसायची.

 

स्रोत

रावण इतका ज्ञानी होता की त्याच्या एका मेंदूमध्ये दहा मेंदूंच ज्ञान आहे असं म्हटलं जायचं, आणि म्हणूनच रावणाला पुराणात ‘दशानन’ म्हटलं गेलयं.

पण हे सर्व सद्गुण रावणाचे अधःपतन थांबवू शकले नाही.

सत्तेची हाव, अहंकार आणि पर-स्त्री लोभ ह्या दुर्गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं शत्रुत्व रावणाने पत्करलं.

परिणाम आपण जाणतोच…!

रावणाकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, माणसाने कधीही अहंकार करू नये, अन्यथा त्याची अधोगती निश्चित आहे!

आपल्या दुर्गुणांमुळे पराक्रमी आणि ज्ञानी रावण जिथे हरला…तिथे आपली काय गत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version