' का असतात बिस्किटांवर छिद्र? कधी विचार केलाय का? – InMarathi

का असतात बिस्किटांवर छिद्र? कधी विचार केलाय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सकाळी उठलं की, आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकचं गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे चहा… एक कप गरमागरम चहा आणि त्याच्या सोबतीला कुरकुरीत बिस्किटे मिळाली की, आपल्या दिवसाची सुरवात मस्त होते.

गरम चहा आणि त्यात बिस्कीट बुडवून खाणे हे केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडते.

 

cookies-inmarathi08
aphotoaweekproject

 

बिस्कीट जवळजवळ जगातील सर्वच भागांत खाल्ली जातात. १४ व्या शतकापासून बिस्किटं माणसांची आवडती राहिली आहेत. वेळेनुसार यांची चव आणि आकार भलेही बदलत चालला असेल तरी देखील ही बिस्किटं नेहेमीच आपली आवडती ठरली.

असचं काही तरी खायचं मन झालं, जरा भूक लागली की आपली पहिली चॉइस असते बिस्किटं. आपण रोज हे बिस्किटं मोठ्या चवीने खातो, पण यांच्याबद्दल ‘ह्या’ गोष्टींवर तुम्ही कदाचितच कधी लक्ष दिले असेल.

आज आम्ही बिस्किटांच्या बाबतीत तुम्हाला माहित नसलेले काही फॅक्ट्स सांगणार आहोत.

 

कदाचितच कोणाला हे माहित असेल की जगात कुकी डे म्हणून एक दिवस ह्या बिस्किटांच्या नावे साजरा केला जातो. दर वर्षी ‘४ डिसेंबर’ ला कुकी डे साजरा केला जातो.

 

cookies-inmarathi05
abcnews.go.com

 

तुम्हाला माहित आहे, २० व्या शतकात सर्वात जास्त कुठले बिस्किटं खाल्ल्या गेले? २० व्या शतकात ओरिओ हे बिस्कीट सर्वात जास्त विकल्या गेले. ओरिओ हा एका अमेरिकन कंपनी  Nabisco चा बिस्कीट ब्रांड आहे.

 

cookies-inmarathi01

 

जगातील सर्वात मोठ्या चॉकलेट बिस्कीटचं वजन १७,२३६ किलो आहे. ह्या बिस्किटाचा व्यास हा १०२ फुट आहे.

 

cookies-inmarathi06
happysugarhabits.com

 

आपण रोज बिस्कीट खातो, बघतो, पण कधी तूम्ही हा विचार केला का की या बिस्किटांवर छिद्रे का असतात? नाही ना… आम्ही सांगतो.

बिस्किट हे जरा जाडे असतात. त्यामुळे बिस्कीट शिजवतांना ते नीट शिजत नाही. म्हणून या बिस्किटांवर छिद्र केले जातात ज्याने ते व्यवस्थितपणे शिजतील आणि त्यातील क्रंच कमी होणार नाही.

 

cookies-inmarathi03
justfunfacts.com

 

जर तुम्ही अमेरिकेत आहात आणि तुम्ही कोणाला “बिस्किटं आहेत का?” असे विचारले, तर त्यांना ते कळणार नाही कारण अमेरिकेत बिस्किटांना बिस्कीट नाही तर कुकी म्हणतात.

 

cookies-inmarathi09
christinamarsigliese.com

 

पूर्वी तर ह्या बिस्किटांना हातानेच आकार देण्यात यायचा, त्यानंतर डच आणि जर्मन लोकांनी अमेरिकेत ‘कुकी कटर’ आणले. ज्यानंतर ह्या बिस्किटांना एकसारखा आकार दिला जाऊ लागला.

आजकाल तर बाजारात कुठल्याही आकाराचे, प्रकारचे कुकी कटर उपलब्ध आहेत.

Ruth Wakefield यांनी एकदा चुकीने आपल्या आवडत्या चॉकलेट चीप कुकीज बनवल्या आणि त्यानंतर ह्या कुकीज जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरल्या.

 

cookies-inmarathi

 

कुकी ही जरी अमेरिकेने पहिल्यांदा जगासमोर सादर केली असली तरी, कुकी हा एक जापानी संस्कृतीतील खाद्यपदार्थ आहे.

एक सामान्य व्यक्ती त्याच्या जीवनात साधारणपणे ३५,००० कुकी खातो.

 

cookies-inmarathi04

 

मध्य पूर्व काळात चॉकलेट चीप कुकी छुरी-काट्याने खाल्ल्या जायची ज्यावर चॉकलेट सॉसची टॉपिंग असायची.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?