Site icon InMarathi

जगाला हेवा वाटेल असं, भारतीयांची मान उंचावणारं अमेरिकेतील “श्रीमंत दाम्पत्य”!

patel-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमेरिका.. फक्त नावच पुरेसं आहे. या देशातील प्रत्येक वस्तू तुम्हाला स्वत:कडे आकर्षित करते. त्यामुळे अनेकांचं असं स्वप्न असतं की जीवनात एकदातरी अमेरिकेला जाऊन यावं. तेथील सुख-सुविधा पाहून असं वाटत असतं की अश्या सुविधा आपल्याही देशात असायला हव्या.

एक देश कसा असावा तर तो अमेरिकेसारखा, कारण त्या देशात आपल्याला हव्या असलेल्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

म्हणून आपल्याला नेहेमी अमेरिकेला जावे, तिथे राहावे असे वाटत असते. आता प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होत नसलं तर काही लोकं तेवढे नशीबवान असतात की त्यांना तेथे जाऊन राहण्याची संधी मिळते.

 

 

आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं नवल… आजकाल तर अनेक भारतीय अमेरिकेला वास्तव्यास जाऊन राहतात. होय, तुमचं म्हणण बरोबर आहे, पण आम्ही त्या कुठल्याही भारतीयाबद्द्ल बोलत नाही तर आम्ही बोलत आहोत डॉ. किरण पटेल आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी यांच्याबद्दल.

 

हे जोडपं काही साधसुधं जोडपं नाही. अमेरिकेसारख्या देशात हे शाही थाटात जगतात. यांचा थाट बघून अमेरिकेच्या लोकांनाही हेवा वाटतो.

भारतातील गुजरात राज्यातील डॉ. किरण पटेल आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी पटेल हे अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात आपल्या महालासारख्या घरात राहतात. जे अतिशय प्रसिद्ध आहे. हे दोघे अनेक सामाजिक सलोखा जपणाऱ्या कामांसाठी डोनेशन देण्याकरिता देखील नेहमी चर्चेत असतात.

यांनी शिक्षण, कला, क्रीडा अश्या अनेक क्षेत्रांत आपलं योगदान दिले आहे. ज्यामुळे यांना ‘द पॉवर कपल’ म्हणून देखील ओळखले जाते. हे फ्रीडम हेल्थचे मालक आहेत.

फ्लोरिडा शहराच्या कॅरोलवूड परिसरात व्हाईट ट्राउट तलावाजवळ १७ एकराच्या जागेत यांनी हा शानदार महाल बनवला आहे.

 

 

यांचा हा महाल भारतीय राजांच्या महालांपासून प्रेरणा घेत बनवला आहे. हे फ्लोरिडा शहरातील सर्वात मोठे घर आहे. या महालाच्या मुख्य इमारतीत ८४०० फुटाचे दोन विशाल विंग बनविण्यात आले आहेत. अमेरिकेतल्या एखाद्या सामान्य घराच्या तुलनेत १४ पट मोठं असलेलं त्यांचं हे घर.

      यापैकी एका विंगमध्ये पटेल जोडपं राहत, तर दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा मुलगा सहकुटुंब राहतो. यांना दोन मुली देखील आहेत. ज्या कंपाऊंडमध्ये ७ हजार स्क्वेअर फुट परिसर असलेल्या घरात राहतात.

 

या घरासंबंधी सांगताना डॉ. किरण पटेल सांगतात की,

“प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर या घरासाठी ही जागा निवडण्याचं कारण म्हणजे येथून एयरपोर्ट, ऑफिस, शाळा, हॉस्पिटल सर्वच जवळ आहे. हे घर अश्या पद्धतीने बनविण्यात आले की पुढील ५० वर्षांपर्यंत माझं संपूर्ण कुटुंब एकत्र राहू शकेल.”

 

 

या महालात मंदिर, मिनी थेटर, तीन गेस्ट हाउस, १२ कार येतील एवढं मोठं गॅरेज, स्टाफ हाउस आणि कॉमन मेंटेनेंस बिल्डिंग देखील आहे.

हा  महाल बनविण्यासाठी ३ वर्षे लागली. याचं काम नोव्हेंबर २०१२ ला सुरु झालं आणि ते २०१६ साली पूर्ण झालं. पण अजूनही या महालाला बनविण्यासाठी नेमका किती खर्च आला हे जाहीर करण्यात आलेले नाही.

यात जी वाळू वापरली गेली ती भारतीय असली तरी इतर सगळी सामग्री ही स्थानिक वापरली आहे. एका गेस्टहाउसच्या मागच्या बाजूला संगमरवराने बनलेला वाडा या वैभवात आणखी भर टाकणार आहे. त्याचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

१५ हजार चौरस फुटांच्या अलिशान दिवाणखान्यात प्रवेश करायला प्रशस्त रस्ता, आणि मुख्य दरवाजासमोर ऐसपैस आठ हजार चौरस फुटाचे अंगण असा या घराचा एकूण चेहरामोहरा आहे.

मुघल आणि पर्शियन स्थापत्यशास्त्राचा एकत्रित नमुना असलेली भारतातील जगप्रसिध्द ताजमहाल ही वस्तू पटेल यांचं घर बांधलं जाताना डोळ्यासमोर होती असं ते सांगतात.

 

 

फ्लोरिडा ट्रेंड मॅगजीनने डॉ. किरण पटेल यांना ‘फ्लोरोडियन ऑफ द ईयर’ अवॉर्ड देऊन सन्मानित केलं होतं. कारण त्यांनी हेल्थकेअर करिता १३०१२ कोटी रुपयांचे डोनेशन दिले होते.

मग आता जी व्यक्ती १३०१२ कोटी रुपये दान म्हणून देऊ शकते ती एवढा अलिशान महाल तर नक्कीच अफोर्ड करू शकते… नाही का?

आपण सामान्य माणूस ज्या जीवनाची नेहमी निव्वळ कल्पना करत असतो जे शाही जीवन हे पटेल कुटुंब प्रत्यक्षात जगत आहेत. अमेरिकेत जाऊन एका भारतीयाने तिथल्या प्रगतीत योगदान देणे आणि स्वतःची प्रगती साधणे भारतातल्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version