आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आज आपण तंदुरुस्त राहण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे डायट प्लान फॉलो करतो. त्याचबरोबर आपण जिमला देखील जातो. आपण फिट राहण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करतो, जी आपल्याला करता येईल. त्यामुळे आपण आपल्या फिट राहण्याचे श्रेय देखील त्या गोष्टींना देतो. पौष्टिक आहार, जिम, मेडीटेशन यांना आपण सहसा आपल्या तंदुरुस्तीची कारणे असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी आपल्या दीर्घ आयुष्याचे श्रेय या वस्तूंना नाही तर डायट कोकला देते. चला तर मग जाणून घेऊया, या स्त्रीबद्दल…
ही गोष्ट ऐकायला थोडी वेगळी वाटेल, पण ही खरी आहे. मिशिगनच्या रॅपिड्समध्ये राहणाऱ्या या वृद्ध स्त्रीचे नाव थेरेसा रॉली असे आहे. या स्त्रीचे वय तब्बल १०४ वर्ष आहे. या स्त्रीने सध्याच ‘WZZM’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे कि,
‘१०० वर्षाची झाल्यावर मी कधीच विचार केला नव्हता की मी १०४ वर्षापर्यंत जिवंत राहू शकेन. पण १०१ वर्षाची झाल्यावर देखील मला काही झाले नाही आणि आज मी १०४ वर्षाची आहे आणि तरीही एकदम व्यवस्थित आहे.’
आपल्या दीर्घ आयुष्यामागील गुपिताचा खुलासा करताना सांगितले की, मी दिवसातून एकदा तरी सोडा कॅन नक्की घेते. ह्या १ जानेवारीला आपला १०४ वा जन्मदिवस साजरा करणाऱ्या रॉली सांगते की, माझी एक बॅग डायट कोकच्या खाली डब्यांनी भरलेली आहे. शॉपिंगसाठी जाणार आहे, तेव्हा परत डायट कोक घेऊन येईन. पुढे ती म्हणते की, तिला डायट कोक प्यायला खूप आवडते. १९८२ ला जेव्हा अमेरिकेमध्ये डायट कोक लाँच करण्यात आले, तेव्हा रॉलीचे वय ६८ वर्ष होते.
खरेतर, शास्त्रज्ञांचे हे मानने आहे की, डायट कोक आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. डायट कोकचे सेवन केल्याने डायबिटीज आणि ओबेसिटी यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बोस्टन विद्यापिठाद्वारे करण्यात येणाऱ्या एका अध्ययनामध्ये हे समजले की, कोकमध्ये जास्त शुगर मात्रा असल्यामुळे स्ट्रोक आणि वेडे होणे, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शास्त्रज्ञांनी हे संशोधन ४४०० वृद्ध व्यक्तींवर केले होते.
अशाप्रकारे ही वृद्ध स्त्री आपल्या १०४ वर्ष जगण्याचे श्रेय डायट कोकला देते आणि या कोकमुळे तिला खूप फायदा झाला असल्याचे देखील ती सांगते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.