जुने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे कचरा नाहीत…त्यात दडली आहे सोन्याची खाण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कम्प्यूटर आणि मोबाईल आता इतकी शुल्लक वस्तू झाली आहे की, पुर्वीसारखं लोक त्यांचा वर्षानुवर्षे वापर नं करता या गोष्टी खराब झाल्या की, लगेच फेकून देतात आणि नवीन प्रोडक्ट खरेदी करतात. जूनं ते सोनं ही म्हण तर ऐकून असालच तुम्ही, जुनी गोष्ट कितीही निरुपयोगी म्हणून आपण तिला टाळत असलो तरी तिचं खरं मूल्य मात्र वेळ आल्यावरचं कळतं, असं आपल्याकडची म्हातारी माणस देखील सांगत असतात. त्याचं हेच म्हणण जणू खरं ठरतंय. म्हणूनचं सांगतोय, तुमच्याकडे जुने किंवा खराब कम्प्यूटर आणि मोबाईल असतील तर फेकून देऊ नका कारण त्यातून तुम्हाला सोन मिळू शकतं…!
तुम्हाला माहित नसेल पण हे सत्य आहे की, जगभरातील सोन्याच्या ७ टक्के सोने हे कम्प्यूटर आणि मोबाईल मध्ये असते.
युरोपातील एडीनबर्ग युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,
खराब इलेक्ट्रिक डिव्हाईस मधून मौल्यवान अश्या सोन्याला बाजूला करून आपण सोन्याच्या खाणीमधून सोने काढण्याच्या प्रक्रियेला कमी करू शकतो.
म्हणजेच खराब इलेक्ट्रिक डिव्हाईस मधून इतकं सोनं मिळू शकतं की, आपल्याला सोन्याच्या खाणीमध्ये मेहनत करायची गरज भासणार नाही. सोबतच सोन्याच्या खाणीतून सोने काढताना निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण देखील रोखले जाईल आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोचणार नाही.
या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार त्यांची प्रक्रिया वापरल्यास दरवर्षी इलेक्ट्रोनिक कचऱ्यामधून जवळपास ३०० टन सोने काढले जाऊ शकते आणि त्यांनी असं एक तंत्रज्ञान देखील तयार केलं आहे जे इलेक्ट्रोनिक कचऱ्यामधून सोने काढण्यासाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे.
या तंत्रज्ञानामध्ये सर्वात प्रथम खराब डिव्हाईसच्या प्रिंटेड सर्कलला सौम्य अॅसिड मध्ये ठेवलं जातं ज्यामुळे धातूचा संपर्ण हिस्सा विरघळतो. त्यानंतर एक खास पद्धतीच रसायन त्यावर ओतलं जातं, हे रसायन सोन्याला पापुद्र्यासारखं बाहेर काढतं आणि अश्याप्रकारे डिव्हाईस मधील सोन बाहेर काढलं जातं. या नवीन तंत्रज्ञानामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी त्यावर चाचण्या सुरु आहेत आणि लवकरच संपूर्ण जगासमोर हे तंत्रज्ञान सादर केल जाईल असं सांगण्यात येतं आहे.
येणाऱ्या काळात भंगारवाल्यांना सोन्याचे दिवस येणार असं दिसतंय!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.