Site icon InMarathi

एकेकाळी आपल्या खेळाने मैदान गाजवणाऱ्या जयसूर्याला आता आधार घेऊन चालावं लागत आहे

Sanath Jaysurya.Inmarathi00

newstracklive.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट हा आपल्या देशातील लोकप्रिय खेळ आहे, तसेच क्रिकेट हा फुटबॉलनंतर जगामध्ये जास्त पहिला जाणार खेळ आहे. या किकेट खेळाशी जगातील मोठमोठे दिग्गज खेळाडू जोडले गेले आहेत. त्यातीलच एक श्रीलंकेचा स्टार खेळाडू सनथ जयसूर्या हा आहे. सनथ जयसूर्या याने आपल्या कारकीर्दीमध्ये खूप गोलंदाजांना मैदानाच्या चारही बाजूंना फटके मारले. सनथ जयसूर्याची फलंदाजी खूपच आक्रमक होती आणि त्याने आपल्या देशासाठी खूप कमालीचे काम केले आहे. आज आम्ही याच सनथ सूर्याची सध्याची परिस्थिती सांगणार आहोत. सनथ जयसूर्याची तब्येत सध्या खराब आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, सनथ जयसूर्याच्या आताच्या परिस्थतीबद्दल..

 

ibnlive.in

सनथ जयसूर्याचे पूर्ण नाव सनथ टेरान जयसूर्या आहे. सनथ जयसूर्याचा जन्म ३० जून १९६९ मध्ये श्रीलंकेच्या मटार येथे झाला. त्याने आपल्या जीवनात खूप रेकॉर्ड बनवले. त्याने आपल्या फलंदाजीने आपल्या देशाला क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. सध्याचा श्रीलंकन संघ हा खूप दुबळा दिसून येतो, परंतु जयसूर्याच्या काळामधील श्रीलंकेचा संघ हा खूपच मजबूत होता आणि त्या संघामध्ये कोणत्याही मोठ्या संघाला शह देण्याची कुवत होती. जयसूर्या, संघकारा, जयवर्धने, दिलशान, चामिंडा वास यामध्ये विरोधी संघाकडून आपल्याकडे सामना फिरवण्याची धमक होती. या लोकांनी श्रीलंकन संघाला एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले होते.

त्या श्रीलंका संघातील जयसूर्या एक महत्त्वाचा भाग होता. सध्याच सनथ जयसूर्याचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो कुबड्यांच्या मदतीने चालत आहे. ४८ वर्षाच्या सनथ जयसूर्या हा गुडघ्याच्या समस्येने त्रासलेला आहे. सूत्रांच्यानुसार, सनथ जयसूर्यावर उपचार ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरामध्ये होणार आहे. जयसूर्याला ऑपरेशन केल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कमीत कमी एक महिना एवढा वेळ लागण्याचा अंदाज दर्शवला जात आहे. तोपर्यंत जयसूर्या हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील.

 

googleusercontent.com

आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये सनथ जयसूर्याने टेस्ट क्रिकेटमध्ये ११० सामन्यात ६९७३ धावा केल्या आहेत, यामध्ये त्याने १४ शतके देखील झळकावली आहेत. तसेच, जयसूर्याने ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३४३० धावा केल्या आहेत, यामध्ये त्याने २८ शतके देखील झळकावली आहेत.

फलंदाजी बरोबरच जयसूर्या हा गोलंदाजी देखील उत्तम करत असे. जयसूर्याने टेस्ट क्रिकेटमध्ये ११० सामन्यामध्ये ३४.३५ च्या सरासरीने ९८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६.७५ च्या सरासरीने ३२३ विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याने काही टी – २० सामने देखील खेळले आहेत. तसेच, आयपीएलमध्ये देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

 

arysports.tv

जगभरातील सनथ जयसूर्याचे लाखो चाहते त्याची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही देखील जयसूर्या लवकर बरे होतील अशी आशा करतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version