Site icon InMarathi

या ६ फिल्म्सच्या शूटिंगसाठी बॉलिवूड कलाकारांनी दिले होते स्वतःचे घर!

The Pataudi Palace InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड हे एक असे क्षेत्र आहे जिथे अनेक प्रयत्न करूनही हे स्टार्स त्यांची पर्सनल लाईफ पर्सनल ठेवू शकत नाही. ते कुठे जातात-येतात, त्यांनी काय घातल, काय खाल्ल इथपासून ते त्यांच्या सर्व हालचालींवर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याची नजर असते. जर या नजरेतून त्यांना कोणी वाचवत असेल तर ते एकमात्र त्याचं घर…

तुम्ही अनेक वेळा चित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण नेहेमी असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण कधी कधी चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे देखील दाखविली जातात.

 

हे ही वाचा अंत्यसंस्काराला जाताना सुचली नव्या शो ची कल्पना, करण जोहरची विकृत मानसिकता

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही चित्रपटांत तर स्वतः या सेलिब्रिटीजची घरं दाखविण्यात आली आहेत. चला तर जाणून घेऊ की कुठल्या चित्रपटाची शुटींग झालं आहे तुमच्या आवडत्या अभिनेत्याच्या घरी…

वीर-जारा :

 

 

शाहरुख खान-प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांचा २००४ साली आलेला ‘वीर-जारा’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची कहाणी, कलाकार, डायलॉग्स, गाणी सर्वकाही सुपरहिट होते. या चित्रपटाच्या काही भागांचं शुटींग सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये झालेआहे.

फॅन :

 

 

शाहरुख खानचा चित्रपट फॅन हा भलेही त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे गाजला नसला तरी या चित्रपटाला यशस्वी बनविण्यात त्याने कुठलीही कसर सोडली नाही. पण कधी-कधी चित्रपट चालतात कधी नाही.

या चित्रपटात शाहरुखने स्वतःसोबतच प्रयोग करत डबल रोल केला आहे. या चित्रपटाच्या काही सिन्सचे शूट हे शाहरुखच्याच बांद्रा येथील मन्नत या बंगल्यात तर काही या बंगल्याच्या आसपास करण्यात आले आहे.

बजरंगी भाईजान :

 

 

सलमान खानचा गाजलेला चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्सऑफिसवर खूप कमाई केली. त्याच्या चित्रपटाची कहाणी खरच खूप सुरेखपणे पडद्यावर उतरविण्यात आली होती आणि त्यातच भाईजानची अॅक्टिंग म्हणजे तर काही बोलायलाच नको.

हा चित्रपट देशातच नाही तर देशाबाहेरही चांगला गाजला. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसावे की, या चित्रपटाच्या काही भागांची शुटींग सलमान खान याच्या पनवेल इथल्या फार्महाउसवर करण्यात आली आहे.

कि अॅण्ड का :

 

 

करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट जरी तेवढा कमाई करू शकला नसेल तरी या चित्रपटात मांडण्यात आलेल्या मुद्द्याची सर्वत्र स्तुती करण्यात आली.

या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी कॅमियो रोल केला होता, ज्याचं शुटींग त्यांच्याच ‘जलसा’ या बंगल्यात करण्यात आले होते.

बॉम्बे टॉकीज :

 


सिनेमा जगतातील ४ मोठ्या दिग्दर्शकांनी सोबत येऊन एक चित्रपट बनवला होता बॉम्बे टॉकीज.. करण जोहर, अनुराग कश्यप, जोया अख्तर आणि दिबाकर बनर्जी या बड्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना काही फार रुचला नाही.

या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित सिन्सचे शुटींग स्वतः करण जोहर याच्या घरात झाले होते.

संजू :

 

 

संजय दत्त याच्या जीवनावर आणि त्याच्या संबंधित कॉन्ट्रोवर्सीवर आधारित चित्रपट ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तचा रोल रणबीर कपूरने निभावला आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवन आणखी जवळून दाखविण्याकरिता या चित्रपटाची शुटींग संजयच्याच घरी करण्यात आलंय.

===

हे ही वाचा सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version