आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्यापैकी सर्वांनाच असं वाटत असत की, हे संपूर्ण जग बघावं. आपल्या देशाबाहेर आणखी काय काय आहे, तिथले लोकं, तिथली संस्कृती कशी आहे बघावं. पण खूप कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होत असते.
तसं तर पूर्ण जग फिरायचं म्हटल तर आपल्याला विमानाची आठवण येते कारण जर दुसऱ्या कुठल्या देशात जायचं म्हटल तर आपल्याकडे विमानाशिवाय पर्याय नसतो. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की, सायकलवरून जगभ्रमंती करू तर नक्कीच तुमच्या भुवया उंचावणार.
पण एक अशी मुलगी आहे जिने सायकलवरून या दुनियेचा चक्कर मारण्याचा निश्चय केला आहे.
ह्या मुलीचे नाव वेदांगी कुलकर्णी आहे. ती १९ वर्षांची असून तिचा जन्म महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. वेदांगीने १३० दिवसांत सायकलवरून या जगाची स्वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या १३० दिवसांत तिला २९ हजार किलोमीटरचे अंतर कव्हर करायचे आहे.
सध्या वेदांगी ही युकेच्या बोर्नमाउथ युनिवर्सिटीमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या द्वितीय वर्षाला आहे. ती तिची ही जगभ्रमंती जून २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरापासून सुरु करणार आहे.
वेदांगी सांगते की,
“मी ऑस्ट्रेलिया पासून सुरवात करून न्युजीलंड, अलास्का, अमेरिका येथून कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, फ्रांस, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रुस, मंगोलिया आणि चीन पर्यंतची यात्रा करील. मी माझ्या या यात्रेकरिता खूप उत्साहित आहे. जग बघणे हा खरच एक मोठा अनुभव असेल. ते पण एक कठीण मार्ग निवडून. मी याला एक चँलेंज म्हणून घेत आहे.”
वेदांगी आपल्या या ट्रीप करिता #StepUpAndRideOn वापरते. तिला निश्चित वेळेत आपली यात्रा पूर्ण करण्यासाठी रोज ३२० किलोमीटर सायकल चालवावी लागणारा आहे. जर ती ही यात्रा पूर्ण करण्यात यशस्वी ठरली तर ती वर्ल्ड रेकॉर्ड देखील घडवू शकते. पण ही यात्रा अतिशय कठीण असणार आहे.
ही काही वेदांगीची पहिली याप्रकारची यात्रा नाही, तर याआधी देखील तीने अश्या यात्रा केलेल्या आहेत. तिने २०१६ साली मनाली ते खरदुंग आणि मग द्रास ची यात्रा केली होती. २०१७ मध्ये देखील तिने बोर्नमाउथ ते जॉन ओ’ग्रोट्स पर्यंतची १९०० किलोमीटरची यात्रा केली होती.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.