छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली आणि सह्याद्रीचा सर्वात उंच साल्हेर जिंकला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच आपले सर्वांच्या हृदयामध्ये मानाचे स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नावानेच शत्रूला अक्षरशः घाम फुटत असे. शिवाजी महाराजांनी मुठभर सैन्याच्या बळावर स्वत: चे राज्य निर्माण केले.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्यांच्या काळात पळता भुई थोडी झाली होती. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गोष्ट काही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही, ती आपल्या सर्वांनाच माहित आहे.
अफजलखानासाख्या बलाढ्य माणसाला देखील महाराजांनी आपल्या युक्तीने फाडून काढला होता, त्यामुळे आज महाराजांचा आदर्श आपल्या सर्वांमध्ये आहे.
पण खंत मात्र एकाच गोष्टीची वाटते की, आपल्या या राज्याच्या महाराष्ट्रात जातीवाद चालू आहे. शिवाजी महाराजांनी कधीही जात-पात, धर्म मानला नाही, त्यामुळे त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये असे होणे चुकीचे वाटते.
असो, पण यावर काही भाष्य न केलेलेच बरे. शिवाजी महाराजांनी खूप गड – किल्ले जिंकले, त्यातीलच एक साल्हेरचा किल्ला आहे. आज आम्ही तुम्हाला याच साल्हेरच्या किल्ल्याचा इतिहास आणि त्याच्यावरचा शिवाजी महाराजांचा विजय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या ऐतिहासिक किल्ल्याबद्दल..
साल्हेर आणि मुल्हेर या जोडीतला साल्हेर हा किल्ला आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरीदुर्ग आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे, तो आता सटाणा या तालुक्यामध्ये समविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वात जास्त किल्ले हे सटाणा तालुक्यामध्येच आहेत.
–
हे ही वाचा – पोर्तुगीजांचे सैन्य…लढाईत फितूर पती; संकटांवर मात करणाऱ्या या राणीच्या शौर्याला सलाम हवाच
–
साल्हेर किल्ल्याची उंची सुमारे १५६४ मीटर आहे. या गडाची चढाई मध्यम आहे, त्यामुळे हा गड चढण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल पण भीती वाटणार नाही. या गडावर जाण्यासाठी वाघांबे किंवा साल्हेरवाडीतून जावे लागते. स्वराज्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता, हे शिवाजी महाराज देखील त्यावेळी जाणत होते.
भगवान परशुराम यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली होती. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यांनतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले.
पहिल्यांदा त्यांचे स्थान प्रचितगडाजवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूचा या सहाव्या अवतार परशुरामाने सर्व जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतःला जागा करण्यासाठी बाण मारून कोकण भूप्रदेश तयार केला, असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.
१६७१ – ७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. आज ५ जानेवारी, आजच्या दिवशीच शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. शिवाजी महाराजांकडून तो परत मिळवण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.
हा वेढा फोडण्यासाठी शिवाजी राजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले. त्यावेळी इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. एका बाजूने त्यांनी लष्कारांची घोडी घेतली आणि एका बाजूने मावळे आत घुसले आणि त्यांनतर मोठे युद्ध झाले.
मोघलांची फौज ही लाखाच्या आजपास होती, तर मराठ्यांची फौज त्यांच्या सुमारे पन्नास हजार इतकीच होती. या युद्धामध्ये खूप मावळे धारातीर्थी पडले. जिवंत सापडलेले ते सहा हजार घोडे राजांकडे गिनतीस आले, सव्वाशे हत्ती सापडले, खूप खजिना देखील सापडला. हे युद्ध मराठ्यांच्या प्रतिष्ठेचे युद्ध होते आणि हे युद्ध मराठे जिंकले.
या मावळ्यांनी शत्रूला सळो कि पळो करून सोडले. या युद्धात शिवाजी राजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे छोट्या तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले. यावेळी महाराज म्हणाले, ‘माझा सूर्याराऊ पडला, तो जसा भरतीचा कर्ण होता.’
या साल्हेरच्या युद्धाचा मोघालांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि ती शिवाजी महाराज अजिंक्य आहेत, असे माणू लागले. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने साल्हेर जिंकला आणि शत्रूला धूळ चारली.
स्त्रोत : विकिपीडिया
–
हे ही वाचा – मुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या या लढाईचा रक्तरंजित इतिहास अंगावर रोमांच उभे करतो
–
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.