आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
असं म्हणतात की स्वप्न बघायला हवेत तेव्हाच आपण त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सध्या याचीच प्रचीत देणारी एक बातमी चर्चेत आहे. दिल्लीच्या आजादपूर येथील एका झोपडीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचे स्वप्न पूर्ण होत आहे.
दिल्लीचा १६ वर्षांचा निसार अहमद हा एक धावपटू आहे. जमैका येथील प्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टच्या क्लबमध्ये ट्रेनिंगसाठी तो दाखल होणार आहे. यामुळे निसारचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
ही बातमी कळताच त्याचे संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी आहे. निसारचे वडील आजादपूरमध्ये एक रिक्षाचालक आहेत आणि दुसऱ्यांच्या घरची धून-भांडी करते. याप्रकारे त्याचं घरं चालत. या दोघांच मासिक उत्पन्न जवळजवळ ५ हजार रुपये एवढ येतं.
अश्या परिस्थितीत निसार ला कधीही वाटले नव्हते की त्याला कधी एक प्रोफेशनल ट्रेनिंग घेता येईल. मग आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग तर दूरच राहिली. पण निसारची मेहनत कामात आली आणि त्याच्या नशिबाने त्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी लाभली.
निसारला इथवर पोहोचविण्यात गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी एंग्लियन मॅडल हंटचा खूप मोठा सहभाग आहे. यांनी केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, ओडीसा आणि दिल्ली येथील एकूण १४ मुलांना या ट्रेनिंग करिता निवडले. ज्यात निसारची देखील निवड झाली. यानंतर किंग्सटन क्लबने या सर्वांची क्षमता आणि त्यांच्यातील प्रतिभा या पाय्रींवर त्यांचे मुल्यांकन करून चार आठवड्यांच्या ट्रेनिंगची परवानगी दिली. आता हे सर्व उसैन बोल्टचे कोच ग्लेन मिल्स यांच्या हाताखाली त्यांच्या छत्रछायेत ट्रेनिंग घेतील.
आता तुम्ही विचार करत असाल की, दिल्लीच्या आजादपूरपरिसरात एका झोपडपट्टीत राहणारा मुलगा इथवर येऊन पोहोचला तरी कसा?
निसारसाठी इथवर येऊन पोहोचणे काही सोपे नव्हते. निसारचे नावं तेव्हा प्रकाशझोतात आले जेव्हा त्यांनी दिल्ली स्टेट अॅथलेटिक्स स्पर्थेत १०० आणि २०० मीटर स्प्रिंट मध्ये गोल्ड मेडल जिंकले. निसारचे हे यश यासठी देखील खास ठरले कारण त्याने १६ वर्षाखालील ऑल इंडिया रेकॉर्ड हे मेडल जिंकून तोडला होता.
ज्यानंतर निसारला ‘दिल्लीचा उसैन बोल्ट’ म्हणून संबोधल्या जाऊ लागले. त्याने आज जे मिळवील आहे ते मिल्विण्य्साठी अनेक लोकं स्पेशल ट्रेनिंग घेतात, लाखो पैसे खर्च करतात पण तरी देखील ते मिळवू शकत नाही.
या १६ वर्षाच्या मुलाने ते करून दाखवलं आहे ज्याने त्याचीच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलून टाकेल. आजही भारताच्या अश्याच कान्याकोपऱ्यात असे अनेक हिरे एक गुमनाम जीवन जगात आहेत ज्यांना केवळ एका संधीची गरज आहे.
निसारने मिळविलेले हे यश केवळ आणि केवळ त्याची मेहनत आणि त्याच्या जिद्दीच फळ आहे. या ट्रेनिंगच्या माध्यमातून तो नक्कीच पुढे जाऊन आणखी काहीतरी मोठं करेल आणि ‘दिल्लीचा उसैन बोल्ट’ नाही तर ‘भारताचा निसार अहमद’ म्हणून नावारूपास येईल अशीच आशा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.