Site icon InMarathi

मुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या या लढाईचा रक्तरंजित इतिहास अंगावर रोमांच उभे करतो

battle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारताच्या इतिहासामधील मुघल हे एक महत्त्वाचा भाग आहेत.

मुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवली. अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत भारतामध्ये मुघलांनी आपली सत्ता कायम ठेवली होती.

पण इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी या मुघल साम्राज्याला संपवले आणि भारताला स्वतःच्या अधिपत्याखाली घेतले.

आज आम्ही अशा एका लढाईबद्दल सांगणार आहोत, ज्यात मुघल हरले होते.

 

wordpress.com

 

१० सप्टेंबरला दिल्लीची लढाई लढली गेली होती आणि ब्रिटीश ताकदीने १९ सप्टेंबरला दिल्ली काबीज केली, ज्यानंतर ब्रिगेडियर जनरल जॉन निकल्सन यांचा मृत्यू झाला होता.

दिल्लीची लढाई जवळपास २१४ वर्षा पूर्वी १८०३ मध्ये झालीा होती.

अशाप्रकारे दिल्लीमध्ये कितीतरी लढाया लढल्या गेल्या ज्या ११९१ – ९२ पासून सुरु झाल्या. यामध्ये मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये लढली गेलेली लढाई आहे.

याचबरोबर मंगोलो आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये लढण्यात आलेली लढाई समाविष्ट आहे.

पानिपतमध्ये तीन लढाया लढल्या गेल्या होत्या, बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यामध्ये, अकबर आणि हेमू यांच्यामध्ये आणि मराठे आणि नादिर शाहचे उत्तराधिकारी अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये लढण्यात आल्या होत्या.

 

hunt.in

 

पानिपातच्या लढाया या दिल्ली काबीज करण्यासाठीच लढल्या गेल्या होत्या.

अजूनही कितीतरी ऐतिहासिक तथ्य या शहराशी जोडलेली आहेत. या लढायांमध्ये बहुतेकदा आक्रमणकर्त्यांचाच विजय झाला.

शाह आलमच्या कार्यकाळामध्ये दिल्लीची लढाई सिंधीयाचे मराठे आणि इंग्रजांमधील युद्धाच्या स्वरूपात इतिहासामध्ये याची नोंद आहे.

या मुघल सम्राटाकडून देखील लढण्याचे ढोंग केले जात होते, कारण शाह आलम स्वतः द्विधा परिस्थितीमध्ये होते की, त्यांनी कोणाचे समर्थन करावे.

ही लढाई उत्तर – पूर्व दिल्लीमध्ये ११ सप्टेंबर १८०३ ला लढण्यात आली होती, जो भाग आज देखील पतपडगंज भागामध्ये येतो.

हा भाग युद्धाचा भाग होता. पर्सिव्हल स्पीअर आपल्या ‘ट्वेलाइट इन दिल्ली’ या पुस्तकात लिहितात की,

‘ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलझलीचे ध्येय मुघल सन्मानाचे रक्षण करणे होते आणि ते देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता.

तिथेच शाह आलम आपल्या शाही अभिमानाला कोणत्याही किंमतीवर टिकवून ठेवू इच्छित होते.’

 

guim.co.uk

 

लॉर्ड वेलझलीचे एजंट ब्रिटीश कमांडर इन चीफ लॉर्ड लेक होते आणि त्यांचे दिल्लीमध्ये एजंट सैयद राजा खान होते.

जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान शाह आलमने मराठ्यांना मदत आणि तक्रारीचे पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटनी व्यवहार आणि युद्ध यांच्या भविष्यावर लिहिले होते.

२७ जुलै १८०३ ला लॉर्ड वेलझलीचे खाजगी पत्रामध्ये शाह आलमला आश्वासन दिले कि, जर ते त्यांच्या शरणागतीत येतील तर त्यांना प्रत्येक सन्मान देण्यात येईल.

त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे ब्रिटीश सरकार पूर्णपणे समर्थन करेल आणि त्यांना सुविधा देखील देईल.

पण ही सर्व आश्वासने खोटी असल्याचे देखील स्पीअर सांगतात. शाह आलमने २९ ऑगस्टला इंग्रजांकडून समर्थन मागितले. पण एक सप्टेंबरला फ्रान्सच्या पत्राच्या आधारावर इंग्रजांविरुद्ध लढाईची घोषणा केली.

यानंतर युद्ध सुरु झाले, यामध्ये फ्रेंच कमांडर आणि दिल्लीचे स्थानिक सैनिक होते. गल्लीबोल्यामध्ये भले आणि तलवारींनी युद्ध लढण्यात आले.

 

alamy.com

 

दिल्लीतील लोक आणि लाल किल्ल्यामध्ये असलेला सम्राट आणि त्यांचे कुटुंबीय एखाद्या जादूची कल्पना करत होते, पण तेव्हापर्यंत दिल्ली इंग्रजांनी काबीज केली होती.

१९ सप्टेंबरला या लढाईमध्ये मारल्या गेलेल्या आपल्या पूर्वजांना काही ब्रिटीश पर्यटक श्रद्धांजली देण्यासाठी येतात.

यानंतर ५४ वर्षांनी १८५७ मध्ये इंग्रजांनी परत एकदा दिल्लीकडे कूच केली होती.

अशाप्रकारे ही १८०३ मधील दिल्लीतील लढाई मुघल खूप वाईट परिस्थितीने हरले होते आणि या लढाईनंतर मुघल साम्राज्यचा अंत झाला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version