आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मातील लोक राहतात. त्यांची धर्मस्थळे देखील वेगवेगळी आहेत. तरीही आपल्या भारतामध्ये हे सर्व जाती – धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात.
प्रत्येक धर्मस्थळांची एक वेगळी ओळख आपल्या या भारतामध्ये आहे. त्यातीलच काही धर्मस्थळांचे महत्त्व आणि प्रसिद्धी ही जगभर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धर्मस्थळाची माहिती देणारा आहोत, ज्याची भारताबरोबरच जगात देखील ख्याती आहे. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध मंदिराबद्दल..
नैनीतालपासून ३८ किलोमीटर लांब भवालीच्या रस्त्यामध्ये कैंची धाम लागते. बाबा नीब कोरौरीने या स्थानावर १९६४ मध्ये आश्रम बनवले होते. याच बाबा नीब कोरौरीला हनुमानाचे पृथ्वीवरील दुसरे रूप म्हटले जाते. तसेतर, या बाबाचे खरे नाव लक्ष्मी नारायण शर्मा होते.
आपल्या स्थापनेनंतर आतापर्यंत भव्य मंदिराचे रूप घेतलेले कैंची धाममध्ये देवी दुर्गा, वैष्णोदेवी, हनुमान आणि राधा कृष्ण यांच्या मूर्त्या आहे. या मंदिरात आज देखील बाबाच्या खाजगी वस्तू, गादी, चादर, काठी आज देखील तसेच सुरक्षित आहे, जशी त्यांच्या जीवनामध्ये होती. पर्यटकांसाठी आजही हे दर्शनाचे मुख्य केंद्र आहे.
अलौकिक शक्तींसाठी मानले जातात स्वामी
असे म्हटले जाते की, या मंदिराचे संस्थापक बाबा अलौकिक शक्तींचे स्वामी होते. पण ते दिखाऊपणापासून लांब राहत असत. त्यांच्या गळ्यात कोणत्याही प्रकारच्या माळा नव्हत्या आणि कपाळावर कोणतेही त्रिपुरा नसायचे. त्यांनी कधीही साधूंचे वस्त्र धारण केले नाहीत. या आश्रमात आलेले भक्त जेव्हा त्यांच्या पाया पडायला जातात, तेव्हा ते सांगतात की, मंदिरातील हनुमान बाबाच्या पाया पडा.
कैंची धामवर श्रद्धा ठेवणारे भक्त जगभरात आहेत. जसे विदेशी भक्त आणि प्रसिद्ध लेखक रिचर्ड एलपर्ट ज्यांनी मिरेकल ऑफ लव नावाने बाबावर पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये बाबांच्या चमत्कारांचे विस्तारित रुपात वर्णन केले आहे. हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स देखील बाबांची परम भक्त असल्याचे सांगितले जाते.
याच स्थानापासून प्रभावित होऊन त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. काही वर्षांपूर्वी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग देखील येथे आले होते. कैंची धाम यात्रा अॅपलचे फाऊंडर स्टीव जॉब्सने देखील केली होती आणि बाबांनी दिलेल्या सफरचंदाला आपल्या कंपनीचा लोगो बनवला.
बाबा नीब कोरौरी महाराजांनी एक धाम नैनीताल जिल्ह्याच्या कैंचीमध्ये बनवले आहे, तर दुसरे हिमाचलमध्ये बनवले आहे. १९६२ मध्ये हिमाचलचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर राजा बजरंग बहादूर सिंग जे भद्री रियासतचे राजा होते.
त्यांनी बाबाच्या इच्छेसाठी या मंदिराचे निर्माण करणे सुरु केले. २१ जून १९६६ मंगळवारी याचे शुभारंभ झाला, या मंदिराला एवढे अद्भुत बनवण्यात आले आहे की, शिमल्यामध्ये येणारे पर्यटक येथे गेल्याशिवाय राहत नाही.
जर तुम्हाला या बाबांचे आश्रम असलेल्या कैंची धामचे दर्शन घ्यायचे असेल तर दिल्लीपासून काठगोदामसाठी सरळ रेल्वे आहे. काठगोदाम रेल्वे स्थानकावर उतरून तिथून तुम्ही टॅक्सी करू शकता.
जर तुम्ही रस्त्याने जात असाल, तर हल्द्वानी पोहचा आणि तिथून भूवाली होत अल्मोडाची बस करा किंवा तिथून सरळ टॅक्सी करा. हल्द्वानी आणि काठगोदाम एकाच शहराचे दोन भाग आहेत. पण हे नक्की की, हल्द्वानी बस स्टॉप सुरुवातीला आणि काठगोदाम बस स्टॉप नंतर पडेल.
असे हे आध्यात्मिक धाम जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, दरदिवशी येथे खूप लोक हे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.